Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

परीक्षा विभागाचा कारभार लज्जास्पद

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कारभारामुळे केवळ विद्यार्थी वा पालकच नाहीत, तर विद्यापीठाचे कुलगुरूही हवालदिल झाले आहेत. ‘परीक्षा विभागाशी निगडित प्रश्नांना उत्तरे देणे ही शरमेची बाब असली, तरी आता तीच वस्तुस्थिती आहे,’ अशी प्रतिक्रिया कुलगुरूंनीच नोंदविल्याने आता विद्यार्थ्यांनी न्यायाची अपेक्षा ठेवायची तरी कोणाकडून असाच प्रश्न उपस्थित झाला आहे.

मतभेद चालतील; मनभेद नको

$
0
0
‘हिंदुस्थान हे हिंदुराष्ट्र आहे ही डॉ. हेडगेवार यांची ठाम भूमिका होती. आताच्या काळात हा विचार स्पष्ट नसल्याने विपरित गोष्टी घडत आहेत. मतभेद झाले तरी चालतील; मनभेद असता कामा नयेत,’ अशी सूचक स्पष्टोक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी केली.

प्लास्टिक बंदी विरोध : व्यापारी कोर्टात

$
0
0
शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्लास्टिक आणि थर्माकोल ग्लासवर घातलेल्या बंदीविरोधात पालिकेला पुन्हा कोर्टात लढाई लढावी लागणार आहे. प्लास्टिक व थर्मोकोल ग्लासवरील बंदीची अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका कन्व्हर्टेक्स इंडियातर्फे मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.

‘आप’च्या लढाईत आम आदमीच शिलेदार

$
0
0
मोठी नेतेमंडळी, कार्यकर्त्यांची फौज आणि धनदांडग्यांचे पाठबळ अशी यशस्वी राजकीय पक्षासाठीची त्रिसूत्री नसतानाही आम आदमी पक्षाने लोकसभा निवडणूक लढविण्याचे पेललेले शिवधनुष्य आम आदमीच शिलेदार बनून पेलतो आहे! कोणी पक्षाला लॅपटॉप दिलाय, तर कोणी टोनर्ससह प्रिंटरचा संपूर्ण सेट..., काहींच्या पाचशे रुपयांपासून काहींच्या लाखभर रुपयांपर्यंतचे पैसे पक्षाच्या झोळीत पडताहेत.

औषध निरीक्षकाला लाच घेताना अटक

$
0
0
अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक महेश विनायक देशपांडे (३६, रा. गुरुवार पेठ) यांना १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या गुरुवार पेठेतील कार्यालयात हा सापळा रचण्यात आला होता.

बारवकर:तपास पो.उपअधीक्षकांकडे

$
0
0
चाकण येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विलास दत्तात्रय बारवकर (५२) यांच्या आत्महत्येचा तपास वडगाव मावळ येथील पोलिस उपअधीक्षकांकडे सोपविण्यात आला आहे. बारवकर यांनी लिहिलेल्या ‘सुसाइड नोट’मध्ये अनेक बड्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे घालण्यात आल्याने हा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे.

पुण्यात उमेदवारांची ‘हाफ सेंच्युरी’

$
0
0
पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उमेदवारांची भाऊगर्दी झाली असून तब्बल ५० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. पुण्यासह बारामती, मावळ व शिरूर या चार लोकसभा मतदारसंघातून ११२ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला आहे.

राजकीय पक्षांकडून RTIला ठेंगा

$
0
0
माहिती अधिकाराचा कायदा लागू केल्याचा गाजावाजा करणारी काँग्रेस असो, की या कायद्याचा शस्त्र म्हणून वापर करणारी आम आदमी पार्टी; निवडणुकीच्या प्रक्रियेत सर्वच पक्षांनी माहिती अधिकाराच्या कायद्याला ठेंगा दाखविल्याचे समोर आले आहे.

४.५ लाखांची फसवणूक

$
0
0
दौंड येथील एका व्यक्तीला सोन्याच्या शिक्क्यांची विक्री करत असल्याचा बहाणा करून पितळी शिक्के देऊन सुमारे साडेचार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात तरुणासह एका ७५ वर्षीय महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘IM’चे प्रशिक्षण यू-ट्यूबवर

$
0
0
इंडियन मुजाहिदीनचे (आयएम) दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये ‘अल कायदा’कडून प्रशिक्षण घेत असल्याचा एक व्हिडिओ यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. ‘आयएम’चा म्होरक्या यासीन भटकळच्या अटकेनंतर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

पर्याय दिल्यास LBT रद्द

$
0
0
‘आम्ही व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही आणि त्यांना त्रास व्हावा, अशी अजिबात भावना नाही. व्यापाऱ्यांनी चांगला पर्याय दिल्यास स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याची तयारी आहे,’ असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी व्यापाऱ्यांना दिले.

श्रीमंत उमेदवार

$
0
0
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या कन्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे अवघी २५ हजार रुपयांचीच रोकड आहे.

संधी द्या तुमच्यातल्या कलाकाराला!

$
0
0
करिअरच्या एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतरही आपल्यातला कलाकार आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. त्यातून एखाद्या तरी मालिकेत किंवा सिनेमात 'चान्स' मिळावा, म्हणून आपली धडपड सुरू होते.

स्वानुभवाचा कोकण शोध

$
0
0
चहूबाजूंनी असलेली माडाची झाडं, कोकम, करवंद आणि तुळशीच्या मंजिऱ्यांचा अधूनमधून वाऱ्याच्या झोतासरशी येणारा सुवासिक गंध, स्वतःच्या हाताने केलेल्या आंब्याच्या आणि फणसाच्या पोळ्या आणि कुठल्याही अॅक्युप्रेशर मशीनशिवाय केवळ खडी आणि दगडांवर चालण्यामुळे होणारा नैसर्गिक व्यायाम...

भटक्या विमुक्त संघटनेचा निवडणुकीवर बहिष्कार

$
0
0
भटक्या विमुक्त जमातींचा समावेश अनुसूचित जमातीत करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर, हातकणंगले आणि सातारा हे तीन लोकसभा मतदारसंघ वगळता अन्य सर्व लोकसभा निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार घालण्यात येणार असल्याचे भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार लक्ष्मण माने यांनी जाहीर केले.

घरफोडीतील गुन्हेगार अटकेत

$
0
0
गणेश पेठेतील वाडा फोडून २५ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या दोघा आरोपींना फरासखाना पोलिसांनी २४ तासांत अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

‘मेडिकल’चे विद्यार्थी स्कॉलरशिपपासून वंचित

$
0
0
लाखो रुपयांचे कर्ज घेऊन प्रसंगी सोने-घर गहाण ठेवून खासगी विना अनुदानित मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असणारे सात हजार आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसी) विद्यार्थी तीन वर्षांपासून स्कॉलरशिपपासून वंचित राहिले आहेत. तीन वर्षांच्या स्कॉलरशिपपोटी राज्य सरकारकडे ४५ कोटी १२ लाख रुपयांची रक्कम थकीत असताना केवळ सहा कोटी रुपयेच मंजूर करण्यात आले आहेत.

प्रॉपर्टी टॅक्सवाढीविरोधात नाराजी

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाने काही परिसरात प्रॉपर्टी टॅक्समध्ये अंदाजे दहा पटीने वाढ केली असल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. या दरवाढीला काँग्रेसकडून विरोध केला जाणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी हरकती नोंदविण्याचे आवाहन बोर्डाचे माजी उपाध्यक्ष प्रसाद केदारी यांनी केले आहे.

बँक ऑफ इंडियाचा आज, उद्या संप

$
0
0
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे बँकेचे व्यवस्थापन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ फेडरेशन बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन्सने आज आणि उद्या (शुक्रवार व शनिवार) राष्ट्रव्यापी संप पुकारला आहे. देशभरातील साडेचार हजारांहून अधिक शाखांमधील क्लार्क आणि शिपाई या संपात सहभागी होणार आहेत.

जादा गाड्या सोडणार कधी?

$
0
0
लोकसभा निवडणुकीमुळे रेल्वेचे उन्हाळ्याच्या सुटीत प्रवाशांसाठी सोडण्यात येणाऱ्या जादा गाड्यांचे नियोजन कोलमडल्याचे समोर आले आहे. उन्हाळ्याच्या सुटीत किती जादा गाड्या सोडायच्या या संदर्भात मध्य रेल्वेकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, त्यामुळे प्रवाशांना सध्या उपलब्ध असणाऱ्या गाड्यांचा ‘आधार’ घ्यावा लागणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images