Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

क्षयरोग्यांच्या शोधासाठी ‘टीबी नोटिफिकेशन’

0
0
देशात क्षयरोगाचे प्रमाण नियंत्रणात येण्याऐवजी वाढत चालले असून, दर तीन मिनिटांनी दोन क्षयरोगी मृत्युमुखी पडत आहेत. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्थितीही गंभीर असून, सध्या पाच हजार २६६ क्षयरोगी उपचार घेत आहेत.

बारामतीतही मोदींची सभा?

0
0
बारामती लोकसभा मतदारसंघात या वेळी बदल घडविण्यासाठी बारामतीतच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा घेण्याचे प्रयत्न महायुतीतर्फे सुरू आहेत.

वकासच्या ‘पुणे कनेक्शन’वर शिक्कामोर्तब

0
0
जंगली महाराज रोडवरील साखळी स्फोट घडवण्यासाठी मेंगलोर येथून स्फोटके आणि पैसे... बेळगाव आणि पुण्यात सात ‘आयईडी’ (बॉम्ब) तयार करणे.... पुण्यातील कासारवाडी आणि नगर येथील लोणी येथे स्फोट घडवून आणण्यासाठी वास्तव्य... तसेच स्फोटके पेरून पुन्हा बेळगावला पलायन...

वाघोलीत अपघातात कारचालक ठार

0
0
वाघोली येथील उबाळेनगर येथे कार डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात एक ३२ वर्षीय व्यक्ती ठार झाली तर त्याची आई आणि भाऊ-बहीण हे जखमी झाली आहेत. चंद्रपूर येथून पुण्याला येत असताना रविवारी सकाळी हा अपघात घडला.

आरक्षित २५ टक्क्यांची प्रवेशप्रक्रिया सुरू

0
0
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीर्इ) आरक्षित २५ टक्के जागांसाठीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया आजपासून (२४ मार्च) सुरू होणार आहे. www.rtemaharashtra.org या वेबसाइटवरून येत्या २९ मार्चपर्यंत पालकांना या प्रक्रियेसाठीचा अर्ज भरता येणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीची ‘भाऊगर्दी’ नि ‘हातात हात’!

0
0
काँग्रेसचे उमेदवार म्हणून डॉ. विश्वजित कदम यांचे नाव जाहीर झाल्यानंतर, हायकमांडकडून ‘आदेश’ आल्यावर उमेदवाराजवळ ‘भाऊगर्दी’ होऊ लागली आहे.

शिरोळे म्हणतात…मोदी हेच उमेदवार

0
0
‘भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हेच पुण्याचे उमेदवार आहेत, असे मानून संघटनेमार्फत निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. प्रतिस्पर्ध्यांमध्ये काही उमेदवार नवखे, तर काही जण गेली दहा वर्षे अलिप्त आहेत.

एसएसआर’ला भुलू नका

0
0
‘नॅक’च्या तपासणीमध्ये कॉलेजचे सादरीकरण अधिक प्रभावी व्हावे, यासाठी ‘चांगला ‘एसएसआर’ बनवून देतो,’ असे सांगणाऱ्या खासगी संस्था, कन्सल्टन्सी किंवा एजंटपासून सावध राहण्याचा इशारा ‘नॅक’ने देशभरातील कॉलेजांना दिला आहे.

दारूच्या भट्टीवर छापा

0
0
कासारसाई येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याजवळच सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्टीवर हिंजवडी पोलिसांनी छापा टाकून भट्टी काढून टाकली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बारामतीत उमेदवारांचा आठवडे बाजारात संपर्क

0
0
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर आलेल्या पहिल्याच रविवारी बारामती मतदार संघातील उमेदवारांनी आठवडा बाजारांमध्ये जाऊन मतदारांशी संपर्क साधला. बारामती मतदार संघ भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने प्रत्येक गावामध्ये जाऊन मतदारांशी संपर्क साधणे उमेदवारांना शक्य होणार नाही.

शिवाजीनगर निरीक्षणगृहाला प्रतीक्षा निवासी अधीक्षकाची

0
0
शिवाजीनगर येथील मुलांचे निरीक्षण गृह सुमारे दोन वर्षांपासून निवासी अधीक्षकाच्या प्रतीक्षेत असून महिला व बाल विकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही त्याकडे कानाडोळा करण्यात येत आहे.

तरुणीची फसवणूक

0
0
सोशल नेटवर्कच्या माध्यमातून झालेली ओळख घातक ठरत असल्याची अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. घोरपडी गावातील एका तरुणीच्या (वय २२) बाबतीत असाच प्रकार घडला. तिने पोलिसांकडे तक्रार केली आहे.

‘सुरक्षेसाठीच्या पायाभूत सुविधांत भारत मागे’

0
0
‘आपण १९६२मध्ये चीनसोबतच्या युद्धात केलेल्या चुका पुन्हा करत आहोत. लष्कराचे आधुनिकीकरण थांबले आहे. चीन सीमेपर्यंत पायाभूत सुविधा निर्माण करत असताना रस्ते, विमानतळ आणि रेल्वेमार्गांच्या बाबत आपण फारच मागे पडलो आहोत,’ असे परखड मत निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी रविवारी व्यक्त केले.

महिनाभर तरी चेक लवकर वटणार नाहीत

0
0
रिझर्व्ह बँकेतर्फे चेक वटविण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘सीटीएस’ प्रणालीमुळे सर्व बँकांच्या चेक क्लिअरन्समधील गोंधळ किमान आणखी महिनाभराचा अवधी लागण्याची शक्यता आहे.

पुण्याला काय हवंय?

0
0
शिक्षण, नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने अन्य राज्यांबरोबरच महाराष्ट्रातील इतर शहरांमधून पुण्यात सर्वाधिक संख्येने नागरी स्थलांतर होत आहे. शहर व परिसरातील पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. शहराचा अनिर्बंध आणि अनियोजित विकास होत आहे.

पुण्यात १० हजार जणांना टीबी

0
0
पुण्यासारख्या शहर, जिल्ह्यांत आणि पिंपरी- चिंचवडमधील सुमारे दहा हजार जणांना या वर्षी टीबीचा आजार झाल्याचे निदान झाले आहे. तर, अर्धवट उपचार सोडल्याने पुन्हा उपचार घेतल्याने औषधांना विषाणू दाद देत नसल्यानेच ‘एमडीआर’ टीबीच्या पेशंटची संख्या वाढत असून पुण्यात सध्या २०१ पेशंट आहेत.

भाजपकडून अखेर शिरोळेच…!

0
0
अनेक दिवस चाललेल्या चर्चांच्या गुऱ्हाळानंतर भारतीय जनता पक्षाने अखेर शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांच्या उमेदवारीवर रविवारी शिक्कामोर्तब केले. शिरोळे यांच्या रूपाने भाजपने स्वच्छ प्रतिमेच्या बहुजन चेहेऱ्याला पुन्हा संधी दिली आहे. या उमेदवारीमुळे पुण्यातील लढतीचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे.

मेडिकल प्रवेशाचे निकष बदलले

0
0
दहावी किंवा समकक्ष परीक्षा बाहेरच्या राज्यातील शाळेतून दिलेले; पण बारावीची परीक्षा महाराष्ट्रातून देणारे विद्यार्थी यंदा मेडिकल प्रवेशांसाठी पात्र ठरतील. अशा विद्यार्थ्यांना त्यांचे अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) मात्र सादर करावे लागेल.

मोहसीनला अटक कधी होणार?

0
0
जर्मन बेकरी स्फोटातील संशयित, पुण्यातील इंडियन मुजाहिदीनचा (आयएम) प्रमुख दहशतवादी मोहसीन चौधरी याला पाकिस्तानात भेटण्यासाठी पुण्यातील त्याच्या काही खास व्यक्तींनी प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.

सावधान! मृत्यू, वाट पाहतो आहे

0
0
पुलाच्या प्रारंभीच थांबून सातारा, कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांना हात करणारे प्रवासी, रिकामे बॅरेल लावून पुलावर उभे केलेले तात्पुरते दुभाजक, पुलाच्या बाजूला असणाऱ्या सर्व्हिस रोडवर दोन्ही बाजूंनी ये-जा करणारी वाहने अशा परिस्थिती कात्रज-देहूरोड बायपास रस्त्यावरील नऱ्हे पुलाची ओळख मृत्यूला आमंत्रण देणारे ठिकाण अशी बनली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images