Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एसटी स्टँड टाकणार कात

$
0
0
बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना चांगल्या दर्जाची सेवा मिळावी, म्हणून एसटीने शिरूर आणि नारायणगाव बसस्थानकांचा चेहरा बदलण्याचे निश्चित केले आहे. ‘बीओटी’ तत्वावर ही दोन्ही स्थानके बांधण्याचे नियोजन एसटीने केले असून लवकरच त्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

२.५ महिन्यांत ८०० प्रवाशांवर कारवाई

$
0
0
अनाधिकृतपणे रेल्वेमार्ग ओलांडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम रेल्वेने हाती घेतली असली, तरी पुणेकरांना शिस्त लागलेली नाही. म्हणूनच की काय, मार्च महिन्यात पुणे विभागात घेण्यात आलेल्या चार मोहिमांमध्ये ८०० प्रवाशांना पकडण्यात आले.

रेल्वे पोलिसांची दौंडमध्ये जादा कुमक

$
0
0
दौंड रेल्वे पोलिस स्थानकात पन्नास पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून रात्री नगर व सोलापूरच्या दिशेने धावणाऱ्या जलद गाड्यांमध्ये किमान तीन शस्त्रधारी पोलिस पहारा देणार असल्याची माहिती रेल्वे पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांनी दिली.

‘काँग्रेसचा पाठिंबा गृहित धरू नका’

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुका जवळ आल्यानंतरच काँग्रेसची आठवण येते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आमचा पाठींबा गृहीत धरू नये, असा इशारा काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंबर परदेशी यांनी दिला.

आढळरावांना खासदार करण्यात माझीच चूक

$
0
0
‘शिवाजीराव आढळराव-पाटील यांना खासदार करण्यात माझीच चूक झाली आहे. त्यांना मुंबईहून मीच गावी आणले. पक्षाचा तालुकाध्यक्ष केले आणि साखर कारखान्याचे चेअरमनसुद्धा केले. परंतु, त्यांची महत्त्वाकांक्षा मोठी असल्यामुळे ते पक्षाच्या शिस्तीत रमले नाहीत,’ अशी जाहीर कबुली विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

बारामतीत काँग्रेसचा स्वतंत्र उमेदवार?

$
0
0
पुरंदर उपसा व उद्योग हे विकासाचे मुद्दे १९८४ पासून खासदार असणारे पवार यांनी प्रलंबित ठेवून पुरंदरला मागे ठेवले या मुद्यावर लोकसभेची देशात आघाडी असूनही बारामती मतदार संघात स्वतंत्र उमेदवार लढविणार असल्याचा निर्धार काँग्रेस मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.

दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन खून

$
0
0
नऱ्हे आणि सॅलिसबरी पार्क येथे रविवारी रात्री खुनाचे दोन स्वतंत्र प्रकार उघडकीस आले. नऱ्हे येथील कचराकुंडीत तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आला, तर सॅलिसबरी पार्क येथे रिक्षा चालकाचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. दोन्ही घटनांमध्ये आरोपी मिळाले नसल्याने पोलिसांचा शोध सुरू आहे.

होळीच्या पूजेला निघालेल्या महिलेला लुटले

$
0
0
बाइकवरून आलेल्या चोरट्यांनी होळीच्या पूजेसाठी निघालेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याची चेन असा ९० हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना रविवारी सायंकाळी कोथरूडमध्ये घडली. कोथरूडमधील एमआयटी कॉलेजजवळील गिरिजा सोसायटीत सायंकाळी साडेसात वाजता ही घटना घडली.

निवडणुकीच्या रेसमधून बाबरांची माघार

$
0
0
मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणारे खासदार गजानन बाबर यांनी निवडणुकीच्या रेसमधून माघार घेत असल्याचे सोमवारी (१७ मार्च) स्पष्ट केले. कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करू, असे बाबर यांनी नमूद केले.

दादांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

$
0
0
मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आमदार जगताप समर्थक प्रचाराला सरसावले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यास सुरुवात केली आहे.

जगताप ‘राष्ट्रवादी’चेच छुपे उमेदवार

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक उमेदवार मिळेना, म्हणून मुंबईच्या राहुल नार्वेकरांच्या गळ्यात उमेदवारी मारून मतदारांचे लक्ष विचलित करण्याचा हा डाव आहे. तर, दुसरीकडे नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेले आमदार लक्ष्मण जगताप हे शेकापच्या पाठिंब्यावर लढत असल्याची दवंडी पिटत आहेत.

मावळमधील लढतीचे चित्र स्पष्ट

$
0
0
मावळ लोकसभा मतदारसंघातून चारही प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाले असून, येथील लढत श्रीरंग बारणे (महायुती), राहुल नार्वेकर (आघाडी), लक्ष्मण जगताप (शेकाप) आणि मारुती भापकर (आप) यांच्यात होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

आंतरराष्ट्रीय केंद्रातील घोटाळा पुन्हा चर्चेत

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रामधील आर्थिक गैरव्यवहारांबाबत विद्यापीठाने नेमलेल्या दोन वेगवेगळ्या समित्यांनी केंद्राच्या तत्कालीन संचालकांवर ताशेरे ओढल्याचा आरोप विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. श्रीधर देव यांनी रविवारी केला.

दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई

$
0
0
धुळवडीच्या दिवशी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या २१० तळीरामांना वाहतूक पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सकाळपासूनच शहराच्या प्रमुख रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती.

कर्ज फेडण्यासाठी मालकाचे अपहरण

$
0
0
व्यवसायात झालेले ४० लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी पूर्वीच्या ७० वर्षीय मालकाचे अपहरण करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी चौघांना अटक केली. कोर्टाने त्यांना २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

गारपिटीच्या विश्लेषणासाठी विशेष अभ्यास मोहीम

$
0
0
राज्यभर झालेल्या अभूतपूर्व अशा गारपिटीच्या सत्राचे सर्वंकष शास्त्रीय विश्लेषण करण्याची अभ्यास मोहीम पुण्यातील सेंटर फॉर सिटिझन सायन्स (सीसीएस) आणि बारामतीच्या एन्व्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आली आहे.

हुक्का पार्ट्यांना पोलिसांचा दणका

$
0
0
भूगाव येथे धुळवडी​निमित्त दारू, डीजे, हुक्क्याच्या हंडी उभारत एका बड्या हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी कायदेशीर परवानगीही घेण्यात आली. मात्र, हुक्क्यासाठी परवनागी नसल्याने पौड पोलिसांनी कारवाई करत पार्टी बंद पाडली आणि संबंधित पार्टी आयोजकांवर गुन्हा दाखल केला.

टेकड्यांवर कुत्री-डुकरांना ‘मोकळे रान’!

$
0
0
शहरातील पर्यावरणाचा समतोल साधण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या टेकड्यासध्या भटकी कुत्री आणि डुकरांच्या दुष्टचक्रात अडकल्या आहेत. टेकड्यांवरील वन्यप्राण्यांनी केव्हाच धूम ठोकली असून सध्या टेकड्यांवर फिरायला गेल्यावर कळपाने फिरणारी डुकरे आणि पाठलाग करणाऱ्या भटक्या कुत्र्यांचाचे दर्शन पुणेकरांना घ्यावे लागते आहे.

‘फूडमॉल’वर चोरी, प्रवाशांच्या नशिबी उपासमारी

$
0
0
तुम्ही जर रात्री मुंबई-पुणे असा प्रवास एक्स्प्रेस वे वरून करणार असाल, तर सोबत पाणी, चहाचा थर्मास, खाण्याचे पदार्थ घेतले असल्याची खात्री करून घ्या. ही सारी तयारी असणे गरजेची आहे; कारण प्रवाशांच्या सोयीसाठी म्हणून उभे राहिलेले फूडमॉल गेले पंधरा दिवस रात्री ११.३० वाजताच बंद होत आहेत.

आयुक्तांच्या रेकीमुळे पोलिस दलाला जाग

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या घटनाक्रमाची पुण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त सतीश माथूर यांनी नुकतीच ‘ऑन दी स्पॉट’ माहिती घेतली. विशेष म्हणजे, युनिफॉर्म परिधान न करता, तसेच विश्रामबागमधील वरिष्ठ अधिकारीवर्गाला त्याची कल्पनाही न देता आयुक्तांनी रविवारी सकाळी केलेल्या या ‘रेकी’मुळे सारेच पोलिस खाते खडबडून जागे झाले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images