Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अण्णांना घाबरले केजरीवाल!

$
0
0
अण्णा हजारे यांचे एकेकाळचे पट्टशिष्य असलेल्या अरविंद केजरीवालांचे अण्णांशी असलेले संबंध आता दुरावले आहेत. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी अण्णांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यात येण्याचे लांबणीवर टाकले आहे.

क्रॉसपॅथीची मान्यता नाहीच

$
0
0
होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना अॅलोपॅथी अर्थात ‘क्रॉसपॅथी’ची प्रॅक्टिस करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे; मात्र या प्रस्तावाला शासनाच्या विधी व न्याय विभागानेच रेड सिग्नल दाखविल्याने स्वतःच्या पॅथीशिवाय अन्य पॅथीची प्रॅक्टिस करण्याचा मार्ग पुन्हा खडतर झाला आहे.

२० हजार अॅलोपॅथिक डॉक्टर बोगस?

$
0
0
राज्यातील वीस हजारांहून अधिक अॅलोपॅथिक डॉक्टर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे (एमएमसी) परवान्याचे नूतनीकरण न करताच प्रॅक्टिस करत असल्याचे उघडकीस आले आहे. प्रॅक्टिसपूर्वी हा परवाना घेणे बंधनकारक असल्यामुळे डॉक्टरांचे हे कृत्य बेकायदेशीर ठरते. त्यामुळे राज्यातील वीस हजारांहून अधिक डॉक्टर ‘बोगस’ असल्याचा अहवाल देण्यात आला आहे.

मिश्कील आजोबांच्या सहवासातील संध्याकाळ

$
0
0
प्रेमबीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात,प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात!

धग सावित्रीच्या क्रांतिज्वालांची

$
0
0
स्त्री शिक्षणाची आक्रमक पुरस्कर्ती, रुढींनी आव्हान देणारी समाजसुधारक, पतीच्या प्रोत्साहनातून शिकण्याच्या वाटेवर पाऊल ठेवणारी करारी पत्नी, पत्रांतून संवेदनशील मन आणि क्रांतिकारी विचारांची प्रचिती देणारी साहित्यिक, असे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू सोमवारी 'सावित्री वदते' या नृत्यनाटिकेतून उलगडले.

कार्यकर्ताही होतोय ‘व्हाइट कॉलर’

$
0
0
पांढरे कपडे, अंगावर सोन्याचांदीची माया, तोंडात गुटखा नाहीतर तंबाखू, नेत्याच्या नावानं फुशारक्या अशा थाटात वावरणारा कार्यकर्ता आता कालबाह्य होतोय. व्हाइट कॉलर कार्यकर्त्यांची गरज राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे.

सुभाषबाबूंच्या अस्थी भारतात आणणार?

$
0
0
आझाद हिंद सेनेचे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जपानमध्ये असणाऱ्या अस्थी भारतात आणण्यासाठी जपानमधील नेताजी सुभाषचंद्र बोस मेमोरिअल इंडो जपान या संस्थेने पुढाकार घेतला आहे.

६ विभागांमध्ये ऑनलाइन फेरफार

$
0
0
हवेली व मुळशी तालुक्याच्या धर्तीवर राज्यातील सहा विभागामधील प्रत्येकी एका तालुक्यात ऑनलाइन फेरफारची सुविधा लवकरच मिळणार आहे. या सुविधेमुळे फेरफार नोंद घालण्यासाठी तलाठी कार्यालयात होणारे गैरप्रकार थांबण्यास मदत होणार आहे.

FTII चा कोर्स बदलणार

$
0
0
बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटने (एफटीआयआय) अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्याबरोबरच प्रवेश प्रक्रियेला झालेल्या दिरंगाईनंतर यंदा तीन वर्षांच्या सहा डिप्लोमा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून, नव्या शैक्षणिक वर्षांत पुनर्रचित अभ्यासक्रम सुरू होतील.

११ हजार अपंग बोगस

$
0
0
चाळीस टक्क्यांपेक्षा कमी अपंगत्व असलेल्या राज्यातील ११ हजार ४४७ व्यक्तींचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. अपंग कल्याण आयुक्तालयाने सुरू केलेल्या ऑनलाइन नोंदणी मोहिमेअंतर्गत ही बाब उघड झाली आहे.

देहूरोड-सातारा ६ पदरी रस्त्याचे काम रखडणार

$
0
0
मुंबई ते बेंगळुरू हायवेवरील देहूरोड ते सातारा महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण होण्याची मुदत संपत असताना आणखीन अडीच वर्ष हे काम पूर्ण होणार नसल्याचे समोर आले आहे. आणखी काही वर्षे वाहनचालकांना अपघात, वाहतूक कोंडी यांचा सामना करावा लागणार आहे.

नागरिकांना लुटणाऱ्या तोतया पोलिसांना अटक

$
0
0
श्रीरामपूर येथून पुण्यात येऊन पोलिस असल्याची बतावणी करुन नागरिकांना लुटणाऱ्या तिघांना चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्या इतर चार साथीदारांचा शोध सुरु आहे.

नागरिकांना लुटणाऱ्या तोतया पोलिसांना अटक

$
0
0
श्रीरामपूर येथून पुण्यात येऊन पोलिस असल्याची बतावणी करुन नागरिकांना लुटणाऱ्या तिघांना चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्या इतर चार साथीदारांचा शोध सुरु आहे.

RTO तील वाहन फिटनेस चाचणी बंद

$
0
0
वाहनांची फिटनेस चाचणी घेण्यासाठी आवश्यक त्या सुविधा नसल्यामुळे फिटनेस तपासणी स्थ​गित ठेवण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आंळदी रोडवरील आरटीओ कार्यालयात मंगळवारी तपासणी बंद होती.

बारणेंचा ‘जय’, बाबरांचा ‘जय महाराष्ट्र’

$
0
0
​मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे यांना मंगळवारी (११ मार्च) उमेदवारी जाहीर करताच खासदार गजानन बाबर यांनी पक्षश्रेष्ठींवर घणाघाती आरोप करीत शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महायुतीपुढे पेच निर्माण झाला आहे.

‘डायबेटिस’च्या १० हजार पेशंटला किडनीचे विकार

$
0
0
रक्तातील साखरेच्या प्रमाणाचे संतुलन बिघडल्याने होणाऱ्या डायबेटिसच्या आजारामुळे किडनीचे विकार बळावणाऱ्या पुण्यातील पेशंटची संख्या दहा हजारावर गेली आहे.

करणीच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

$
0
0
भावाची करणी काढून देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीशी लग्न केल्याचा बहाणा करत तिचे आणि तिच्या आईचे १८ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख ३० हजार असा साडेपाच लाख रुपयांचा घेवून फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबावर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रस्ते खोदाईतील पुनरावृत्ती टळणार

$
0
0
शहरातील सर्व रस्त्यांवरील खोदाईमध्ये समन्वय साधण्यासाठी अखेर पालिकेला मुहूर्त सापडला असून, मुख्य विभागांसह क्षेत्रीय कार्यालयांमार्फत सुरू असलेल्या कामांमध्ये पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मॉलमध्ये व्यावसायिकावर गोळीबार

$
0
0
कल्याणीनगर येथील डी-मार्ट बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास जिममध्ये चाललेल्या व्यावसायिकावर दोघा हल्लेखोरांनी गोळीबार केला. एक गोळी चुकल्यानंतर दुसरी गोळीही झाडण्यात आली.

राज्यात ८७ कॉपी प्रकरणे

$
0
0
दहावीच्या विद्यार्थ्यांचा मंगळवारचा बीजगणित आणि सामान्य गणित भाग १ चा पेपर शहर आणि परिसरामध्ये सुरळीत पार पडला. पुणे विभागामध्ये कॉपीची ८ प्रकरणे नोंदविण्यात आली असून, राज्यात दिवसभरात एकूण ८७ कॉपी प्रकरणे नोंदविण्यात आल्याची माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (बोर्ड) देण्यात आली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images