Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

केजरीवाल फिरविणार पुण्यात झाडू

$
0
0
देशभरातील राजकीय व्यवस्थेवर झाडू चालविणाऱ्या आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल १२ मार्चला पुण्यात सभा घेणार आहेत. अण्णा हजारे यांच्या ‘बालेकिल्ल्या’त येऊन ते काय ‘केजरी मॅजिक’ करणार, याविषयी राजकीय पक्षांपेक्षाही स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. केजरीवाल यांच्या सभेबाबत आपण त्यांच्या संपर्कात आहोत.

पायगुडे, अमोल कोल्हे रिंगणात?

$
0
0
लोकसभा निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुण्यातून दीपक पायगुडे यांना, तर शिरूरमधून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना तिकीट उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. रविवारी होणाऱ्या मेळाव्यात उमेदवारीची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पहिल्याच ‘TET’त शिक्षक नापास

$
0
0
शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ‘टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट’मध्ये (टीईटी) पहिली ते पाचवीसाठी अवघे ४.४३ टक्के, तर सहावी ते आठवीसाठी केवळ ५.९५ टक्के शिक्षक पात्र ठरले आहेत.

विमानतळावर सोने तस्करास अटक

$
0
0
दुबईहून तस्करीसाठी सोने घेऊन येणाऱ्या एका व्यक्तीला सीमा शुल्क विभागाने शुक्रवारी लोहगाव विमानतळावर अटक केली. त्याच्याकडून १५ लाख रुपयांचे अर्धा किलो सोने जप्त करण्यात आले आहे.

‘CBSE’ परीक्षा पुढे ढकलल्या

$
0
0
आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेत ‘सीबीएसई’ने आपल्या बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये काही बदल केले आहेत. ‘सीबीएसई’च्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार ‘सीबीएसई’ने ९, १०, १२ आणि १७ एप्रिलला होणारे पेपर पुढे ढकलले आहेत.

एकमतावर अडले घोडे

$
0
0
उमेदवारीवरून गटातटांमधील रस्सीखेच तीव्र झाल्यामुळे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या यादीत पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचा समावेश शनिवारी होऊ शकला नाही.

‘टेट’ चा टक्का घसरला

$
0
0
बक्कळ पैसा कमविण्याच्या हेतूने सुरू झालेल्या बी. एड.-डी. एड. कॉलेजांमधून विद्यार्थ्यांपर्यंत खरे शिक्षणशास्त्र पोहोचू न शकल्याने राज्यातील ‘टेट’चा निकाल खालावल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

गॅस अनुदानाची ‘बँक भानगड’ बंद

$
0
0
गॅस सिलिंडरचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेला (डीबीटीएल) पूर्णपणे स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून सर्वच ग्राहकांना अनुदानित दराने सिलिंडर मिळणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकारने हा निर्णय घेतला असून नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

सेनेत महिलाच इच्छुक नव्हत्या

$
0
0
‘लोकसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेत महिला इच्छुक नव्हत्या, त्यामुळे पक्षाने भावना गवळी वगळता इतर महिलांना उमेदवारी दिलेली नाही’, असे आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी स्पष्ट केले. पुणे जिल्ह्यातील चारही जागांवर महायुतीचा उमेदवार विजयी होईल, असा दावाही त्यांनी केला.

होणार भक्तीचा जागर

$
0
0
‘कीर्तनजुगलबंदी परिवारा’तर्फे ‘भक्तिजागरा’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १२ ते १५ मार्च या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात हर्षद जोगळेकर, प्रा. स्मिता आजेगावकर, मिलिंद बडवे, मकरंदबुवा सुमंत आदी कीर्तनकार सहभागी होणार आहेत.

एसएनडीटीत उत्साहपूर्ण संगीत समारोह

$
0
0
अभंग, नाट्यपदं, बंदिशी, ख्याल यातून संपन्न शास्त्रीय संगीताचं दर्शन घडवणाऱ्या सुरेल गायनानं एसएनडीटी कॉलेजचा संगीत समारोह रंगला. श्रीमती विजया घाटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त या समारोहाचं आयोजन करण्यात आलं होतं.

रंगणार नृत्यमालिका

$
0
0
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे (आयसीसीआर) सध्या विविध ठिकाणी होरायझन मालिका सुरू आहे. याच मालिकेअंतर्गत बुधवार (दि. १२) ते शनिवारदरम्यान (दि. १५) रोज विविध ठिकाणी विविध नृत्यप्रकारातील निपुण कलाकारांच्या सादरीकरणाचं आयोजन करण्यात आलं आहे.

घ्या देशोदेशीच्या चवींचा आस्वाद

$
0
0
भारतीय बर्फीयुक्त फ्रेंच डेझर्ट ‘तिरंगा मूस’, श्रीखंड वेलवेट केक, कांदा भजी मांचुरियन... यांसारख्या अतरंगी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येत्या १४ मार्च रोजी आयोजिण्यात आलेल्या फूड फेस्टिव्हलला भेट द्यायलाच हवी.

शहरानं पाहिली तिची मुक्त भरारी

$
0
0
त्या आल्या, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं... शहरातले वर्दळीचे रस्ते, त्यावरून अथकपणे वाहणारं ट्रॅफिकही दोन क्षण थांबलं. त्यांचा सळसळणारा उत्साह, ‘वुमेन्स आर दी बेस्ट’ची घोषणा आणि जल्लोष पाहून प्रत्येकानंच त्यांचं हे मनमोकळं विहरणं डोळ्यात साठवलं.

दूध दरवाढ हवी सरकारनियंत्रित

$
0
0
गेल्या काही दिवसांत आबालवृद्धांच्या आहारातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या दुधाच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. देशातील दुधाची गरज लक्षात न घेता, मागणीच्या नावाखाली भरमसाठ दूध पावडरची निर्यात करण्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे सरकारने या घटनेकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

संयुक्त महाराष्ट्र लढ्याची व्यवस्थित नोंद नाही

$
0
0
‘संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठा लढा झाला, पण त्याची व्यवस्थित नोंद ठेवली गेली नाही,’ अशी खंत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी शुक्रवारी व्यक्त केली; तसेच बेळगाव सीमावासीयांच्या लढ्याकडे तटस्थपणे न पाहता महाराष्ट्र सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

पालिकेच्या मिळकतींमध्ये ४० हजारांची वाढ

$
0
0
वर्षभरात महापालिकेतील मिळकतींमध्ये ४० हजारांनी वाढ झाली असून, आगामी आर्थिक वर्षात तब्बल सात लाख ८५ हजार मिळकतींद्वारे मिळणाऱ्या करातून पालिकेच्या महसुलात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

यंत्रणेच्या दिरंगाईमुळे शिष्यवृत्ती रखडली

$
0
0
आचारसंहितेच्या नावाखाली महापालिका प्रशासनाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या चेकचे वाटप अचानक थांबविल्याने किमान तीन महिने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या चेकपासून वंचित राहावे लागणार आहे.

असुयोतील २.५ लाखांचे धान्य पकडले

$
0
0
अन्न सुरक्षा ही गरीबासाठीची योजना सुरू होते ना होते तोच रेशनिंग प्रमाणे अन्न सुरक्षाचे दुकानदार धान्य लाभार्थीना देण्याऎवजी मार्केटमध्येच खुले बेकायदेशीर विक्री करताना आढळून आल्याने बारामती खळबळ उडाली.

ओली पार्टी तरुणांच्या अंगाशी

$
0
0
भीमाशंकर अभयारण्यातील कलावंतीणीचा महाल परीसरात मांसाहारी जेवण बनवून पार्टीचा बेत करणाऱ्यांना धडा मिळाला. मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, पथकासह भीमाशंकर जंगलातून पाहणी करत असताना पाच युवक पार्टीच्या तयारीत असल्याचे त्यांनी पाहीले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images