Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

'त्या' शाळांची मान्यता रद्द करा

$
0
0
आर्थिक-सामाजिक दुर्बल विद्यार्थ्यांना २५ टक्के आरक्षण नाकारणाऱ्या शाळांची मान्यता त्वरित रद्द करा, अशी मागणी करत वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर बुधवारी आंदोलन केले.

नदीपात्रात पालिकेचीही बांधकामे

$
0
0
पवना नदीच्या पात्रात केवळ खासगी अनधिकृत बांधकामेच नव्हे, तर चक्क पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही आत्तापर्यंत सुमारे शंभरहून अधिक कामे केल्याची बाब उघड झाली आहे.

वारीला जाताना काळाचा घाला

$
0
0
पंढरीच्या विठुरायाच्या दर्शलाना निघालेल्या वारकऱ्यांचा ट्रक नीरा नदीत कोसळून झालेल्या अपघाताचे वृत्त कळताच बारामती तालुक्यातील कांबळेश्वर, पवई माळ, पणदरे आदी गावांवर शोककळा पसरली. वारीला जात असताना काळाने घाला घातलेल्या या वारकऱ्यांबद्दल गावात हळहळ व्यक्त होत होती.

हरकतींपासून पुणेकरांची फारकत

$
0
0
शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केल्यानंतर १५ दिवसांच्या आत नागरिकांनी त्यासंदर्भातील हरकती, सूचना द्याव्यात, असे आवाहान वाहतूक पोलिस करत असले तरी पुणेकर त्याला अपेक्षित प्रतिसाद देत नसल्याचे समोर आले आहे.

'यूडी'च्या नकारावर उपसूचनेचा नेम

$
0
0
महापालिका हद्दीतून जाणाऱ्या कालव्यांवरील रस्ता हा वॉटरबॉडी असल्यामुळे नगरविकास खात्याने (यूडीडी) त्याचा टीडीआर देण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच विकास आराखड्यात उपसूचना आणून टीडीआर पदरात पाडून घेण्याचा खटाटोप केला जात आहे.

रात्रीच्या साफसफाई योजनेचा २ महिन्यात बोजवारा

$
0
0
खडकी कँन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये दिवसपाळी बरोबर रात्रपाळीत साफसफाई करण्याच्या योजनेचा अवघ्या दोन महिन्यांत बोजवारा उडाला आहे. जानेवारी महिन्यापासून रात्रीही साफसफाई करण्याचे काम सुरू झाले होते.

'एमआर'नेच विकली गर्भपाताची औषधे

$
0
0
सिप्ला कंपनीच्या दोन वैद्यकीय प्रतिनिधींनी (एमआर) डॉक्टरांच्या नावे बनावट चिठ्ठ्यांद्वारे गर्भपात औषधांची विक्री केल्याची माहिती उघडकीस आली आहे.

पीएमपीतर्फे सीएनजी बस खरेदी सुरू

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्यावतीने १५० नवीन सीएनजी बस खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी बस खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी बस उत्पादक कंपन्याकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.

पदवीधर विद्यार्थ्यांमध्येही करिअर निवडीबाबत संभ्रम

$
0
0
दहावी बारावीतील मुले विचाराने अपरिपक्व असतात, पण पदवीधर मुलांमध्ये देखील करिअर निवडीबाबत अजूनही संभ्रम आहे. एमबीए आणि युपीएसएसी ही क्षेत्र 'अपमार्केट' असल्याने आम्हाला भविष्यात हेच क्षेत्र निवडायचे असल्याचे उत्तर पदवीधर विद्यार्थी समुपदेशन चाचण्यांमध्ये देत आहेत.

आरोग्य विद्यापीठाला २.५ लाख डॉलर

$
0
0
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यातील चर्चेनुसार 'ट्वेंटी र्फस्ट सेंच्युरी नॉलेज इनिशिएटिव्ह' या उपक्रमांतर्गत अमेरिकेतील युनिव्हसिर्टी ऑफ मिशिगन यांच्यात झालेल्या करारातंर्गत नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाला अडीच लाख अमेरिकन डॉलरचा निधी जाहीर करण्यात आला आहे.

सुरळीत वीजपुरवठ्यासाठी नव्या वाहिन्या

$
0
0
कॅन्टोन्मेंट बोर्ड, लुल्लानगर, कोंढवा या भागातील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी या भागात दोन नवीन भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम महावितरणने हाती घेतले आहे.

ज्ञानेश्वरी, मराठवाडा, कन्नड संघाकडून शर्तभंग

$
0
0
'ऑक्स्फर्ड ऑफ द इस्ट' असे म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात शैक्षणिक विस्तारासाठी घेतलेल्या सरकारी जमिनी अनेक बड्या संस्थांनी पड ठेवल्या असल्याचे निर्दशनास आले आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांना 'बाय बाय'

$
0
0
वारंवार खराब होणारे रस्ते, त्यामुळे होणारे अपघात आणि हे रस्ते सुधारण्यासाठी वारंवार होणाऱ्या दुरूस्त्यांना कंटाळलेल्या नागरिकांसाठी एक खुषखबर आहे. सर्वसाधारण रस्त्यांना पर्याय ठरू शकणारे, झीज न होणारे, अधिक टिकाऊ आणि कालांतराने कोणत्याही भेगा वा खड्डे तयार होण्याला प्रतिबंध करणारे रस्ते तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे.

तत्कालिन अतिरिक्त जिल्हाधिकारींचाही समावेश

$
0
0
धायरी येथील जागेबाबत बनावट युएलसी आदेश प्रकरणात पुणे नागरी समूहाचे तत्कालिन अप्पर जिल्हाधिकारी भालचंद आवढाळ यांचाही सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

सातारा, सांगलीतही काविळीचे संकट

$
0
0
इचलकरंजी, कोल्हापूर पाठोपाठ आता सांगली भागातही काविळेचे रुग्ण आढळू लागले असून येथील महापालिकेने केलेल्या जलदगती सर्वेक्षणात काविळीचे २५ रुग्ण आढळून आले आहेत.

पुणे तिथे आर्थिक-सामाजिक दुर्बल उणे

$
0
0
शाळांमध्ये २५ टक्के जागा या आर्थिक-सामाजिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा निकाल खुद्द सुप्रीम कोर्टाने दिला असला, तरी पुण्यात मात्र असे विद्यार्थी औषधालाही नसल्याचा दावा आघाडीच्या शाळांचा आहे. कारण गेल्या तीन आठवड्यांत या शाळांकडे एकही गरीब पालक प्रवेशासाठी फिरकलेला नाही!

संत भेटीचा मुहूर्त यंदा अशक्य

$
0
0
कैवल्यमूर्ती संत ज्ञानेश्वर महाराज, त्यांचे गुरू मोठे बंधू निवृत्तीनाथ, धाकटे सोपानदेव आणि बहिण मुक्ताई या चारही संत भावंडांची भेट व्हावी, या संदर्भातील निर्णयाबाबत येत्या तीस जूनला पंढरपूरात बैठक होणार आहे.

उपेक्षित स्टेशन मास्तरांना रेल्वेकडून 'तारीख पे तारीख'

$
0
0
पंधरा वर्षांपूर्वी (१९९७) संपात सहभागी झालेल्या स्टेशन मास्तरांना पुन्हा सेवेत घ्या....स्टेशन मास्तरांचे ग्रेड पे चार हजार ६०० रुपये करा....अशा अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी झटणा-या स्टेशन मास्तरांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

'त्या' अधिकाऱ्याची अन्य प्रकरणांतही चौकशी

$
0
0
जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने मावळातील दहा एकर जमिनीवरील पुनर्वसनाचा शेरा कमी करण्याचा प्रताप करणाऱ्या 'त्या' अधिकाऱ्याची अन्य तक्रारींच्या प्रकरणांत चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

'बीआरटी'च्या बळींचा आकडा पालिकेकडे नाही

$
0
0
कात्रज ते हडपसर हा बीआरटीचा मार्ग नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला असताना, या मार्गावर आतापर्यंत किती अपघात झाले आणि त्यामध्ये कितीजणांचे बळी केले, याची माहिती पुणे महापालिकेकडे नसल्याचे उघड झाले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images