Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पडद्याआडून इशारे नि दिल्लीप्रयाण

0
0
उमेदवारी निश्चित करण्यासाठी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षादरम्यान पडद्याआडून जोरदार हालचाली सुरू झाल्या असून, दोन्ही पक्षांमधील काही इच्छुकांनी थेट दिल्ली गाठली आहे. दरम्यान, उद्या (शनिवारी) भाजपच्या केंद्रीय निवड समितीची दिल्लीत बैठक होत असून, त्यानंतर जाहीर होणाऱ्या यादीत पुण्याचा समावेश होणार का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

मतदारनोंदणी १६ मार्चपर्यंत

0
0
लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करावयाचे असेल आणि मतदारयादीत नाव नसेल, तर येत्या १६ मार्चपर्यंत मतदारयादीत नाव नोंदविण्याची अखेरची संधी नागरिकांना मिळणार आहे.

पोलिसांना मिळणार हक्काची घरे

0
0
पोलिसांच्या हक्काच्या घरासाठी लोहगावमधील शेती व शेती ना विकास विभागाची तब्बल ११० एकर जमीन निवासी क्षेत्रात रूपांतरीत करण्याची शिफारस नगर रचना विभागाने राज्य शासनाला केली आहे. मात्र, हा फेरबदल करताना पोलिसांना प्राधान्याने घरे देण्याचा करार विकसक बिल्डरने करावा, अशी अट घालण्यात आली आहे.

पिण्याचे पाणी महागणार!

0
0
राज्यातील शेती व पिण्याच्या पाण्याच्या दरात १० ते १५ टक्के दरवाढ करतानाच उद्योगांच्या पाणीपट्टीत तुलनेने कमी वाढ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना पाण्याचा व्यावसायिक दर न लावता सवलतीने पाणीपुरवठा करण्याचा घाटही घातला जात आहे.

एका वाक्याने मी अभिनेता बनलो : मिलिंद गवळी

0
0
मराठी सिनेमात अजूनही सर्व स्तरावर पैसा पोहोचला नाही पण एका जीवनात वेगवेगळी आयुष्य जागून आणि माझ्या पत्नीने त्यासाठी मला दिलेल्या खंबीर प्रेमामुळे मी जीवनात आनंदी आहे असे प्रतिपादन येथे अभिनेता मिलिंद गवळी यांनी केले.

स्त्री गझलकारांची संगीत मैफील

0
0
‘ऊर्मिला विरहात जळते एकटीने, जानकीचा गाजतो वनवास नुसता’ सुप्रिया जाधव यांची अबोल वेदना व्यक्त करणारी ही गझल एका बाजूला, तर ‘शहारते बघून आरसा पुन्हा पुन्हा, खुणावते दुरून पाहणे अजूनही’ ही मनीषा नाईक यांच्या लेखणीतून उतरलेली स्त्रीच्या मनातील नाजूक, हळूवार भावना व्यक्त करणारी गझल...

‘माझा गाव’ सर्वोत्कृष्ट लघुपट

0
0
पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडीजतर्फे तिसरा राष्ट्रीय लघुपट महोत्सव आयोजिण्यात आला होता. ‘माझा गाव’ हा लघुपट या महोत्सवातील सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला, तर ‘रंगीत घर’नं आणि ‘दॅट एलिफंट ऑन द ब्रिज’ या लघुपटांनी अनुक्रमे दुसरं आणि तिसरं पारितोषिक पटकावलं.

पुणे-मुंबर्इ रेल्वे धावणार शिवाजीनगरवरून?

0
0
पुणे ते लोणावळा दरम्यान प्रस्तावित असणाऱ्या तिसऱ्या लाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्या शिवाजीनगर स्टेशनवरून चालवण्याचा विचार रेल्वेने सुरू केले आहे.

‘प्रॉपर्टी टॅक्स’ची वाढ मागील ३ वर्षांनाही?

0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाने प्रॉपर्टी टॅक्समध्ये यावर्षीपासून दरवाढ करताना मागील तीन वर्षांसाठी ही वाढ लागू करण्याचा अजब आदेश काढला आहे. मागील तीन वर्षांची थकबाकी नव्या दराने भरण्याच्या नोटिसा बोर्डाने पाठ​विल्या असल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आहे.

दुकान फोडणाऱ्या चोराला अटक

0
0
औंध परिसरातील व्यापाऱ्याच्या धैर्यामुळे दुकान फोडून चोरी करणाऱ्या टोळीतील चोर सापडला. औंध येथील परिहार चौकामध्ये शटर फोडून किराणा मालाच्या दुकानातील तिजोरी फोडून रोख रक्कम लंपास करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार जणांच्या टोळीतील एकाला पकडण्यात यश आले.

पोलिस आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

0
0
बाणेर, सांगवी आणि पिंपळे निलख येथे बुधवारी मध्यरात्री पडलेल्या दरोड्याची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त सतीश माथूर यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. दरोड्याची खबर आल्यानंतर कोणत्या अधिकाऱ्यांनी पावले उचलली आणि कोण साखर झोपेत होते, याचीही ‘कंट्रोल’ रूममधून त्यांनी माहिती घेतली.

निम्म्या मुदतीत काम फक्त २० टक्के

0
0
पुणे-मुंबई रस्त्यावरील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या (सीओईपी) चौकातील उड्डाणपुलाची निम्मी मुदत संपूनही कामाची प्रगती २० टक्क्यांपर्यंतही पोहोचलेली नाही. सर्वाधिक गर्दीच्या चौकात उभारल्या जाणाऱ्या शहरातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलासाठी नागरिकांना आणखी काही वर्षे सर्वाधिक त्रास सहन करावा लागणार आहे.

अनधिकृत फ्लेक्समुळे मारणेसह ५ अटकेत

0
0
स्वारगेट एस. टी. स्टँड परिसरात अनाधिकृतपणे वाढदिवासाचा फ्लेक्स लावल्याप्रकरणी गजानन मारणेसह पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे. गजानन मारणे (वय ३०, रा. शास्त्रीनगर, कोथरूड), रूपेशदादा मारणे (वय ३०), संतोषअण्णा शेलार (वय ४२, दोघे रा. शास्त्रीनगर, कोथरूड), अतुल उर्फ पप्पूशेठ कुडले (वय ३०, रा. दत्तवाडी), सुनील बनसोडे (वय ३२, रा. श्रीकृष्णनगर, कोथरूड) यांना अटक करण्यात आली आहे.

PMP प्रवासासाठी स्मार्टकार्डची सुविधा

0
0
पीएमपीच्या प्रवाशांना आता बस प्रवासासाठी स्मार्टकार्डची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे. या नव्या सुविधेमुळे येत्या वर्षभरात पीएमीच्या बसेसमधून तिकीट हद्दपार होणार आहे. स्मार्ट कार्डसाठी पीएमपी प्रशासनाने निविदा काढल्या असून, त्याची पूर्तता झाल्यानंतर ही योजना कार्यान्वित होणार आहे.

पात्र-अपात्र ठरविताना नियमांची पायमल्ली

0
0
गेल्या काही महिन्यांपासून वृक्ष प्राधिकरण समितीवरून सुरू असलेले वाद शमण्याची चिन्हे नाहीत. या समितीवर स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांच्या नेमणुकीसाठीचे अर्ज नियम डावलून पात्र आणि अपात्र ठरविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संसार सावरणारी ‘यलो गँग’

0
0
आपल्या वस्तीत डोळ्यासमोर होणारा महिलांचा छळ त्यांच्या नित्याचाच झाला होता. कधी नवरा रात्री दारू पिऊन शिवीगाळ करतोय, तर कधी अमानुष मारहाण. सासू-सासरा, दीर, नणंदाच्या टोमण्यांनी घुसमटून मरण यातना भोगणाऱ्या विवाहिता तर घराघरात दिसायच्या...

स्वसंरक्षणासाठी सज्ज व्हा..!

0
0
‘पोळपाट लाटण्याचं अस्त्र हातात घेऊन तिची लढाई सुरू होते ती दिवस संपताच संपत नाही. तिला चिंता असते उद्याची. मुलांच्या शाळा, डबा, परीक्षा असे सगळे नियोजन आधीच तयार असते; पण मैत्रीणींनो, घरासाठी आपण सगळ्याच धडपडत असतो.

ST स्टँडवरही आता ‘ATM’ सेवा

0
0
प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी प्रत्येक स्थानकावर एटीएम सुरू करण्यासाठी बँकाना जागा उपलब्ध करून देणार आहे. काही दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यातील प्रत्येक स्थानकावर एटीएमची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे एसटीच्या पुणे विभागाचे नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी सांगितले.

उमेश चांदगुडेंचा शिवसेनेला रामराम

0
0
खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळत असल्याचा आरोप करून शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख उमेश चांदगुडे आणि जुन्नरचे माजी तालुकाप्रमुख शिवाजी सोनवणे यांनी पक्ष सोडत असल्याचे शुक्रवारी (सात मार्च) जाहीर केले.

‘प्रौढांसाठी’ नाटकांवर कात्री

0
0
‘त्या चार योनींची गोष्ट’, ‘गुपीत योनींच्या गुप्त गोष्टी’, ‘कामजीवन जगूया... सुखी करूया’ अशा ‘फक्त प्रौढांसाठी’च्या नाटकांना रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) चाप लावणार आहे. सध्या सुरू असलेल्या काही नाटकांतील आक्षेपार्ह भाग वगळण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images