Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दत्तक स्पेशल मॅट्रिमोनी वेबसाइट

0
0
दत्तक घेतलेल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न कसे होणार, हा अनेक पालकांना सतावणारा प्रश्न आता चुटकीसरशी सुटणार आहे. खास दत्तक विवाहेच्छुक मुला-मुलींसाठी ‘मॅट्रिमोनी फॉर अॅडॉप्टेड’ या वेबसाइटची निर्मिती करण्यात आली असून, अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा करण्यात आला आहे.

‘ईगलनेस्ट’वर स्लाइड शो

0
0
जगातील २५ ‘बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट’पैकी एक असलेल्या पूर्व हिमालयातील अरूणाचल प्रदेशाच्या भागातील दुर्मीळ वन्यसंपदा अनुभवण्याची संधी येत्या शनिवारी (दि. ८) पुणेकरांना मिळणार आहे.

अनधिकृत प्रवेशाचा थरार

0
0
एका पदवीधर युवकाने तिकीट न काढता त्याने रेल्वे स्टेशनवर प्रवेश केला...मधल्या ट्रॅकवर थांबलेल्या मालगाडीच्या खाली घुसून त्याने अनाधिकृतपणे रेल्वेमार्ग ओलांडला. समोर थांबलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना पाहताच त्यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी त्याने रेल्वे रूळांवरून धावण्यास सुरुवात केली, आणि अखेरीस रेल्वे कर्मचाऱ्यांने पाठलाग करून त्याला पकडले...

‘मोबाइल’ शॉपिंगमध्ये पुणेकर ‘स्मार्ट’

0
0
पूर्वी केवळ फोन, मेसेजिंगपुरताच मर्यादित असलेला मोबाइल ‘स्मार्ट’ झाल्यापासून त्याच्या माध्यमातून अनेक गोष्टी बसल्याजागी करता येऊ लागल्या आहेत. अगदी शॉपिंगही.

उड्डाण पुलासाठी दोन महिन्यांची प्रतीक्षा

0
0
सिंहगड रोडवरील धायरी फाटा उड्डाणपुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले, तरीही उर्वरित कामांवर अखेरचा हात फिरवून पूल वाहनचालकांना खुला होण्यासाठी आणखी दोन महिन्यांची तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मतदारांनी मागाव्यात आरोग्य सुविधा

0
0
‘भारतीय मतदार अजूनही ‘रोटी, कपडा और मकान’ यातच अडकले आहेत. मतदारांकडूनही चांगल्या आरोग्यसुविधांची आग्रही मागणी होत नाही. तसेच, राजकीय नेतेही आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष करतात. नागरिकांकडून सरकारतर्फे चांगल्या आरोग्यसुविधांची मागणी होत नसल्याने निर्माण होणारी दरी खासगी हॉस्पिटलचालक भरून काढत आहेत,’ असे मत नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटलचे (एनएबीएच) अध्यक्ष डॉ. नरोत्तम पुरी यांनी गुरुवारी व्यक्त केले.

खासगी थांब्यांवर आता एसटीने वळवला मोर्चा

0
0
एसटीने मार्च महिन्यात पुणे जिल्ह्यामध्ये एक कोटी आठ लाख ४५ हजार प्रवासी मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे प्रवास मिळविण्यासाठी एसटी बस आता शहर व उपनगरांमधील खासगी थांब्यांवर थांबणार आहेत.

विमा रकमेसाठीच्या लढ्यास अखेर यश

0
0
लातूर येथून चोरीला गेलेल्या कारचा विमा मिळविण्यासाठी सैन्यदलातील एका माजी अधिकाऱ्याला न्यायिक अधिकारक्षेत्राच्या तांत्रिक मुद्द्यावर ग्राहक मंचापुढे द्याव्या लागलेल्या लढ्यात अखेर यश आले. ग्राहक मंचाने विमा कंपनीला चार लाख ९७,२७१ रुपये तक्रारदाराला देण्याचा आदेश दिला आहे.

फसवणाऱ्या नवरोबाला ४० हजारांच्या पोटगीचे आदेश

0
0
पहिली पत्नी आणि दोन मुले असताना तिला फसवून दुसरे लग्न केलेल्या पतीला पत्नीने कोर्टात खेचले आहे. पतीने दुसरे लग्न करून आपला मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत कोर्टात दाखल केलेल्या दाव्यात तक्रारदार पत्नीला २० हजार रुपये आणि दोन्ही मुलांना प्रत्येकी दहा हजार रुपये असे मिळून ४० हजार रुपयांची पोटगी देण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.

जर्मनीमध्ये अद्यापही वर्णद्वेष

0
0
‘जर्मनीतील काळ्या इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये याचे धडे शालेय शिक्षणातच दिले जातात. मात्र, आधुनिक जगातही काही कट्टरवादी विशिष्ट धर्माला लक्ष्य करत असल्याने जर्मन नागरिकांना वर्णद्वेष आणि ‘फॅसिझम’ला अजूनही तोंड द्यावे लागते आहे,’ असे जर्मन विद्यार्थ्यांनी सांगितले.

मेंटल हॉस्पिटलमधील स्वयंपाकघर ‘गॅसवर’

0
0
येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असणारा स्वयंपाकाच्या गॅसचा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’ आहे. सध्या पेशंटसाठी बनविण्यात येणाऱ्या दैनंदिन स्वयंपाकासाठी पाच मोठे सिलेंडर आणण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

पुलाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांचे जलआंदोलन

0
0
मुळशी ते वाघवाडी या पुलाच्या मागणीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे माजी आमदार शरद ढमाले यांच्यासह शिवसैनिकांनी मुळशी धरणाच्या पाण्यात आंदोलन केले. धरणामुळे पारंपरिक रस्ते पाण्यात बुडाल्याने ग्रामस्थांना होणारा त्रास सरकारला दिसावा यासाठी त्यांनी धरण पोहून पार केले.

अतिक्रमण कारवाईला लोकप्रतिनिधींचा विरोध

0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा चंग प्रशासनाने बांधला असताना, प्रशासनाच्या प्रयत्नांवरच लोकप्रतिनिधी आणि पोलिसांनी हातोडा मारला आहे. कारवाई कोणावर आणि का करणार, याची माहिती द्या, अशी भूमिका लोकप्रतिनिधी आणि पोलिसांनी घेतल्यामुळे बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांचा पूर्वेतिहास शोधत बसण्याची वेळ आली आहे.

भरती परीक्षेबाबत आक्षेप

0
0
महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवेसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेबाबत ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांकडून आक्षेप घेण्यात आले आहेत. जलदाय, मलनिस्सारण आणि स्वच्छता विभागातील पदांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरचे, तसेच पदाच्या कार्याला अनुसरून नसणारे प्रश्न विचारण्यात आल्याची तक्रार उमेदवारांनी केली आहे.

हम सब भाई भाई!

0
0
महायुतीने ऐनवेळी राष्ट्रीय समाज पक्षाला बारामतीत उमेदवारी देताना कोणतेही फिक्सिंग केलेले नाही. महायुतीतील ‘हम सब भाई भाई’ असे म्हणून फिक्सिंग आरोपावर पडदा टाकण्याचा प्रयत्न महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत महादेव जानकर यांनी केला.

वादमुक्तीच्या दिशेने राज्याची वाटचाल...

0
0
पुण्या-मुंबईसारखी महानगरे असोत, की गावागावांमधील शेती असो; जमिनीचे वाद ही राज्यापुढील समस्या होऊन बसली आहे. जमिनीच्या मालकीवरून वादच निर्माण होणार नाहीत, अशी व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने राज्य सरकार पावले उचलत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘गेमचेंजर’ ठरतील, अशा योजना हाती घेण्यात आल्या आहेत.

सिगरेटविक्रीवर बंदीचा पानविक्रेत्यांचा मानस

0
0
शरीराला घातक असलेल्या सिगरेट, निकोटिनयुक्त च्युईंगम विक्रीतून प्रचंड प्रमाणात महसूल मिळत असल्याने राज्य सरकार त्यावर बंदी घालत नाही. मात्र, अनेक वर्षांची परंपरा असलेल्या तंबाखूवर सरकारचा रोष आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात चळवळ उभी करण्यासाठी आगामी काळात सिगरेट विक्री बंद करण्याचा सूर राज्य पान व्यापारी संघाच्या महामेळाव्यात आळवण्यात आला.

अतिक्रमणांना लोकप्रतिनिधींचा पाठिंबा

0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा चंग प्रशासनाने बांधला असताना, प्रशासनाच्या प्रयत्नांवरच लोकप्रतिनिधी आणि पोलिसांनी हातोडा मारला आहे. कारवाई कोणावर आणि का करणार, याची माहिती द्या, अशी भूमिका लोकप्रतिनिधी आणि पोलिसांनी घेतल्यामुळे बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांचा पूर्वेतिहास शोधत बसण्याची वेळ आली आहे.

लाचखोर बँक अधिकाऱ्याला अटक

0
0
शेतीसाठी तीन लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यासाठी तीन टक्के दराने लाच देण्याची मागणी करणाऱ्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या कोळवण शाखेच्या मॅनेजरला नऊ हजार रुपयांची लाच घेताना सीबीआयने सापळा रचून अटक केली.

‘१०८’ची सेवेवरील डॉक्युमेंटरी लवकरच

0
0
महामार्गावर होणाऱ्या अपघातापासून ते हृदयविकाराचा झटका आलेल्या पेशंटपर्यंत सर्वांनाच ‘इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस’च्या ‘१०८’ या सेवेची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र डॉक्युमेंटरी तयार करण्याचे आदेशच आरोग्य खात्याने दिले आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images