Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

टी-स्कूलच्या बॅचसाठी आज चाचणी

$
0
0
अभिनयाच्या क्षेत्रात ज्यांना कारकीर्द घडवायची आहे, अशांना योग्य आणि सखोल मार्गदर्शन करण्यासाठी स्थापन झालेल्या टी-स्कूलच्या आगामी बॅचच्या नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

ट्रकचालकांना लुटणारे दरोडेखोर गजाआड

$
0
0
शेवाळवाडी येथे रस्त्याच्या कडेला झोपी गेलेल्या ट्रकचालकांना मारहाण करत लुटमार करणारे तसेच फुरसुंगी येथील खंडोबाच्या माळावरील घरावर दरोडा घालणाऱ्या पारधी आरोपींना हडपसर पोलिसांनी शिताफीने अटक केली.

दूषित पाणी पिण्यायोग्य करण्याचे तंत्रज्ञान विकसित

$
0
0
पुणेस्थित युनिकफ्लक्स मेंब्रनेस या कंपनीने ‘रिव्हर्स ओस्मोसिस मेंब्रनेस’ अर्थात दूषित पाणी पिण्यायोग्य करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार असून, भारतात पहिल्यांदाच हे तंत्रज्ञान विकसित झाल्याचा दावा कंपनीने केला आहे.

हरकतींच्या सुनावणीसाठी आचारसंहितेचा अडसर नाही

$
0
0
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावरील (डीपी) हरकती-सूचनांच्या सुनावणीला स्थायी समितीच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीनंतर सुरुवात होऊ शकणार आहे. या दरम्यान आचारसंहिता जाहीर झाली, तरी या प्रक्रियेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

‘बालग्राम’चे उपोषण मागे

$
0
0
‘एसओएस’ बालग्राम संस्थेची मान्यता रद्द झाल्याची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्याने मागील एक महिन्यापासून सुरू असलेले उपोषण मंगळवारी मागे घेण्यात आले.

हडपसरच्या उड्डाणपुलाचा नागरिकांना मनस्तापच

$
0
0
शहरातील सर्वांत गजबजलेल्या हडपसर चौकातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सुरुवातीला उड्डाणपूल आणि त्याच पुलाला आता आणखी जोड देऊनही नागरिकांचा मनस्ताप कमी झालेला नाही. तसेच, पुण्याहून सासवडला जाणाऱ्या पुलाचे काम पूर्ण होण्यास आणखी सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

पासपोर्ट छपाईवर आली संक्रांत

$
0
0
पासपोर्ट प्रक्रियेसाठी सुरू झालेली ऑनलाइन प्रक्रिया आत्ता कुठे सुरळीत झाली तोच पासपोर्टच्या पुस्तकांचे ‘शॉर्टेज’ असल्याने पुन्हा पासपोर्ट छपाईला दिरंगाई होते आहे. पुणे विभागात पोलिसांकडून हिरवा कंदिल मिळालेल्या अर्जांपैकी तब्बल तीन हजार पासपोर्ट सध्या पुस्तके नाहीत म्हणून रखडले आहेत.

हवामानाच्या माहितीसाठी नवे डेटा सेंटर

$
0
0
भारतीय हवामानशास्त्र विभागामध्ये (आयएमडी) नवीन नॅशनल क्लायमेट डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. पूर्णतः ऑटोमेटेड स्वरूपाच्या या सेंटरच्या माध्यमातून भू-विज्ञान मंत्रालयाच्या हवामानाशी संबंधित सर्व विभागांमधील माहिती एकाच यंत्रणेवर उपलब्ध होणार आहे.

सीटी स्कॅन, सोनोग्राफी अल्पदरात

$
0
0
जिल्हा हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या पहिल्या डायग्नोस्टिक सेंटरचे आचारसंहिता आणि एमआरआय मशिनच्या उपलब्धतेअभावी अखेर उद‍्घाटन न करताच ट्रायल रन सुरू करण्यात आले. त्यामुळे रोग निदानाच्या सोयी सुविधा पेशंटला अल्पदरात उपलब्ध होणार आहेत.

बोर्डाचा कारभार सुधारण्याची अपेक्षा

$
0
0
हॉलतिकीट आणि बैठकव्यवस्थांमधील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा दुसरा पेपर बुधवारी सुरळीत पार पडला. हिंदीचा पेपर सुरळीत पार पडला असला, तरी पालक आणि विद्यार्थ्यांकडून बोर्डाचा कारभार सुधारला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती.

अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुधारणार

$
0
0
अकरावीच्या केंद्रीय प्रवेश पद्धतीतून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यापुढे ‘स्टुडंट इन्फर्मेशन मॅनेजमेंट सिस्टिम’ विकसित केली जाणार आहे. त्याआधारे प्रक्रियेतून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच बारावीचे परीक्षा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देत, प्रक्रियेमध्ये घुसखोरांना आणि गुणवत्तेची तडजोड करणाऱ्यांना चाप लावण्याचे प्रयत्न शिक्षण विभागाने सुरू केले आहेत.

‌महिला व तृतीयपंथीयांसाठी नवे धोरण विकासात्मक

$
0
0
राज्याच्या तिसऱ्या महिला धोरणात देहविक्री व्यवसायातील महिला आणि तृतीयपंथी यांच्या सामाजिक समावेशक विकासासाठी विशेष तरतूद करून राज्य शासनाने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.

प्लास्टिक, थर्माकोल कचरा वेगळा गोळा करणार

$
0
0
शहरात सतत निर्माण होणारी कचऱ्याची समस्या लक्षात घेऊन त्यावर उपाय करण्यासाठी प्लास्टिक, थर्माकोल आणि इ वेस्टसारखा कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे.

लोकसभा लढण्यास डॉ. भटकर यांचा नकार

$
0
0
‘लोकसभा निवडणूक लढणे हे माझे काम नाही. तो माझा प्लॅटफॉर्म नाही. माझी भूमिका मी भारतीय जनता पक्षाला कळविली आहे. त्यामुळे माझ्यापुरता हा विषय संपला आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ कम्प्युटरतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी बुधवारी आपली भूमिका स्पष्ट केली.

बस भाडेकपात दिरंगाईच्या डेपोत

$
0
0
खासगी ट्रॅव्हल कंपन्यांप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाच्या शिवनेरी बससेवेचे भाडेदेखील ऑफ सीझनला ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आला आहे. परंतु, जनहिताची केवळ भाषाच करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून तो दिरंगाईच्या डेपोत ठेवण्यात आला आहे.

बारामती जिंकण्यासाठीच रिंगणात!

$
0
0
बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीने कोणतेही फिक्सिंग केले नसून, ही निवडणूक जिंकण्यासाठीच आपण रिंगणात आहोत, असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांनी बुधवारी केला. दरम्यान, फिक्सिंग संदर्भात आपण केवळ लोकभावना व्यक्त केल्या, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी दिले.

हॉलतिकिटाला पर्याय बायोमेट्रिक

$
0
0
दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉलतिकिटांच्या अडचणी यापुढे हद्दपार होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना हॉलतिकीट पुरविण्याऐवजी त्यांच्या बायोमेट्रिक माहितीच्या आधारेच त्यांना परीक्षेला बसण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार राज्याच्या शिक्षण खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.

पोळ यांच्या बदलीचे गूढ गुलदस्त्यातच

$
0
0
नवनियुक्त पोलिस आयुक्त सतीश माथूर यांनी बुधवारी सकाळी पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. दरम्यान, मावळते पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांची अचानक बदली करण्यात आल्यामुळे पोलिस दलात चर्चेला उधाण ​आले आहे.

मराठा आरक्षण ओबीसींमध्ये नको

$
0
0
मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यास आमचा तीव्र विरोध असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल, तर त्यांनी वेगळे आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

गहुंजे स्टेडियमवर सेनेचा हल्ला

$
0
0
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप असणारे ‘सहारा उद्योग समूहा’चे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्या निषेधार्थ मावळमधील शिवसैनिकांनी गहुंजे येथील सहारा स्टेडियमच्या नामफलकाची बुधवारी तोडफोड केली. तसेच, स्टेडियमला संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याचीही मागणी करण्यात आली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images