Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बारकोडमुळे नियोजनाची ‘ऐशी की तैशी’

0
0
अखेरच्या क्षणी हाती पडलेली बैठकव्यवस्थेची योजना आणि बोर्डाकडून बारकोड स्टीकर्स पाठविण्यात झालेला विलंब या दोन कारणांमुळे शहरातील बहुतांश परीक्षा केंद्रांवरील बैठकव्यवस्था जाहीर होण्यामध्ये विलंब झाल्याचे समोर आले आहे.

थंडी-उन्हाच्या ‘खो-खो’मुळे सर्दी, खोकल्याचे ‘लोण’

0
0
हवेतील बदल आणि ढगाळ हवामानाचे वातावरण गेल्या काही दिवसांपासून असल्याने लहान मुलांसह प्रौढ सर्दी, खोकला, तापाने त्रस्त झाले आहेत. वाढत्या विषाणूंमुळे हे आजार शहरात आढळून आल्याने शहराच्या विविध भागातील क्लिनिकमध्ये पेशंटची गर्दी दिसू लागली आहे.

उन्हाळ्याच्या प्रतीक्षेतील पुणेकरांना पावसाची ‘भेट’

0
0
थंडीला गुडबाय करून उन्हाळ्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांनी दिवसभराच्या ढगाळ वातावरणानंतर सायंकाळी चक्क जलधारा अनुभवल्या. सायंकाळी साडेसातच्या सुमारास शहराच्या काही भागात पावसाने हजेरी लावली.

अटकेच्या कारवाईचा ‘अॅक्शन प्लॅन’

0
0
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुमारे साडेचार हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे.

‘राष्ट्रवादी’त अस्वस्थता, ‘सेने’त संभ्रमावस्था

0
0
राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष आझमभाई पानसरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम; तसेच अनधिकृत बांधकामे नियमित होण्याच्या निर्णयाला कायदेशीर अडथळ्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातून ‘राष्ट्रवादी’चा उमेदवार जाहीर होण्यास विलंब होत आहे.

‘मुक्ता’ म्हणताहेत... माझी बाइक, माझं लाइफ

0
0
पुण्यात गेल्या काही वर्षांत शहराच्या विकासात पुरुषांच्या जोडीनं अगदी तेवढंच महत्त्वाचं योगदान दिलं ते शहरातल्या तमाम स्त्रीवर्गानं... करिअरसाठी, एका ध्येयासक्तीनं बाहेर पडलेल्या या ‘मुक्तां’ना खरा आधार दिला तो दोन गोष्टींनी.

व्यापारी बांधकामाला डोंगरउतारावर परवानगी

0
0
महापालिका हद्दीबाहेरील प्रादेशिक योजनेतील ‘हायवे’लगतच्या डोंगरमाथा व डोंगरउताराच्या जमिनीवर व्यापारी बांधकामाला परवानगी देण्याची शिफारस नगररचना विभागाने राज्य सरकारला केली आहे.

‘बीडीपी’तील २७० एकर जमीन बांधकामासाठी खुली

0
0
‘बीडीपी’च्या आरक्षणातून वगळण्याची शिफारस असलेल्या कमिटेड डेव्हलपमेंटमधील १०८ हेक्टर (२७० एकर) जमिनीवर बांधकाम करणे शक्य होणार आहे.

कचराकोंडी सोडविण्यास नव्या जागा शोधा

0
0
कचरा प्रश्न सोडविण्यासाठी शहराच्या आसपासच्या परिसरात नव्या जागा शोधण्याच्या सूचना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी महापालिकेस दिल्या. त्यासाठी उत्खनन संपलेल्या खाणींचाही विचार करा, अशा जागांबाबत काही प्रश्न निर्माण झाल्यास आपण स्वतः लक्ष घालून स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करू, असे पवार म्हणाले.

BDPवरून राष्ट्रवादीला घरचा आहेर

0
0
‘जैववैविध्य पार्कचे (बीडीपी) आरक्षण असलेल्या जागेत चार टक्के बांधकामाला परवानगी देण्याचा निर्णय अन्यायकारक असून, ‘बीडीपी’मध्ये किमान दहा टक्के बांधकामाला परवानगी द्यावी,’ अशी मागणी आता जोर धरत आहे. ‘बीडीपी’वरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला यामुळे पुन्हा घरचा आहेर मिळाला आहे.

विकास नको; पण कामे आवरा

0
0
सातारा रोडवर आधी बीआरटी आणि आता भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलाच्या अविरत सुरू असलेल्या कामांमुळे ‘विकास नको; पण कामे आवर’ अशी येथील नागरिकांची अवस्था झाली आहे.

पोलिस अधिकाऱ्यांची झाडाझडती

0
0
गेल्या दोन महिन्यांत शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत १३ आरोपी अटकेत आहेत, ते सध्या काय करतात, शहरात १८०० हून अधिक गुन्हेगार वॉटेंड आहेत, ते कधी सापडणार... अशा विविध प्रश्नांची सरबत्ती करून पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी पोलिस अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

‘ऑपरेशन’ PMP चे; तोटा पालिकेचा

0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचलनातील तूट (ऑपरेशनल लॉसेस) भरून काढण्याचे बंधन राज्य सरकारने पालिकांवर लादले असून, त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकेवरील बोजा आणखी वाढणार आहे.

बोरीवलीसाठी आता २ ‘शिवनेरी’

0
0
पुण्याहून बोरीवलीला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने दोन मार्गाने शिवनेरी व्होल्वोसेवा चालवण्याचे निश्चित केले आहे. या नव्या मार्गांमुळे जोगेश्वरी, विक्रोळी, एअरपोर्ट याठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचा फायदा होणार आहे.

पिण्याचे पाणी महागणार

0
0
राज्यातील शेती व पिण्याच्या पाण्याच्या दरात १० ते १५ टक्के दरवाढ करतानाच उद्योगांच्या पाणीपट्टीत तुलनेने कमी वाढ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना पाण्याचा व्यावसायिक दर न लावता सवलतीने पाणीपुरवठा करण्याचा घाटही घातला जात आहे.

बारामतीत ‘मॅच फिक्सिंग’

0
0
राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांवर असलेला रोष प्रकट करण्याची संधी बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्या उमेदवारीमुळे मिळाली होती; परंतु आपल्याला उमेदवारी न दिल्याने बारामतीत लढतीपूर्वीच मॅच फिक्सिंग झाले असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत, अशा शब्दांत शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी मंगळवारी आपली नाराजी व्यक्त केली.

मधुराष्टकाची ‘सृजन’शील अनुभूती

0
0
महिषासुराचा वध करताना देवीनं धारण केलल्या रौद्र रूपाचं वर्णन करणारी देवी स्तुती, मृदंगाच्या तालावर प्रचंड तांडव नृत्य करणाऱ्या शिवाचं दर्शन घडविणारी ‘शिवस्तुती’ तसेच श्रीकृष्णाच्या मधुर रूपाचं वर्णन करणारं ‘मधुराष्टकम्’ या सगळ्याची अनुभूती ‘सृजन’ या भरतनाट्यमच्या कार्यक्रमात आली.

ऑल विमेन बाइक रॅलीची धूम

0
0
महाराष्ट्र टाइम्स हिरो प्लेजर ऑल विमेन बाइक रॅलीची हवा आत्तापासूनच तापू लागली आहे. येत्या शनिवारी (८ मार्च) शनिवारवाडा येथून सकाळी आठ वाजता ही रॅली सुरू होणार आहे.

अंतर्नाद मैफिलीची मोहिनी

0
0
तबल्यावर दमदारपणे सादर झालेला तीन तालातला सोलो, मंत्रमुग्ध करणारा धनकोनी कल्याण, हर्मोनिअममधून साकारलेला हंसध्वनी अशा भावविभोर रचनांनी रंगलेल्या अंतर्नाद मैफिलीला रसिकांची दाद मिळाली.

अविस्मरणीय ‘बर्मन’मय संध्या

0
0
वाद्यांच्या आवाजात शब्द हरवू न देणारे एस. डी. आणि पाश्चिमात्य संगीताचा प्रभाव असलेले लयीचे बादशहा आर. डी. बर्मन या प्रतिभावान पिता-पुत्रांच्या गाजलेल्या गाण्यांची मैफील नुकतीच कोथरूडच्या बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात झाली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images