Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आयुर्वेद, युनानी डॉक्टरांना आता अॅलोपॅथी प्रॅक्टिस शक्य

$
0
0
होमिओपॅथीप्रमाणे आयुर्वेद व युनानीच्या डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची मुभा असली तरी त्या निर्णयाची आता कायद्यात दुरुस्ती करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रॅक्टिस करताना या डॉक्टरांना येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.

सॉफ्टवेअर इंजिनीअरच्या मृत्यूला जबाबदार कोण?

$
0
0
सॉफ्टवेअर इंजिनीअर इंद्रजित चव्हाण याचा मुतखड्याच्या ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, उपचारादरम्यान घडलेल्या अनेक घटनांबाबत शंका आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित करताना इंद्रजितच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल डॉक्टरांना केला आहे.

ही दोस्ती तुटायची नाय...

$
0
0
‘लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची जागा निवडून आणणे, ही काँग्रेसची जबाबदारी आहे आणि काँग्रेसची जागा निवडून आणणे ही राष्ट्रवादीची जबाबदारी आहे,’ अशा शब्दांत काँग्रेसच्या नेत्यांनी शनिवारी निवडणुकीच्या तोंडावर आघाडीच्या धर्माचे पालन करण्याची हमी दिली.

पक्षासाठी ताकदीने लढणार!

$
0
0
विश्वजीतसाठी मी कोणाला फोन करणार किंवा कोणाचीही भेट घेणार नाही. त्याला उमेदवारी दिली अथवा नाही तरी आम्ही पक्षाच्या उमेदवारासाठी ताकदीने लोकसभेची निवडणूक लढणार आहोत, अशी माहिती राज्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

मी पुणेकरच!: विश्वजीत कदम

$
0
0
‘माझा जन्म पुण्यातील असून शिक्षणही पुण्यात झाले आहे. आमच्या कुटुंबाचे राजकीय कामही पुण्यात असून गेली अनेक वर्षे मीही पुण्यात काम करीत आहे,’ अशा शब्दांत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभा निवडणुकीतील इच्छुक विश्वजित कदम यांनी शनिवारी आपण पुणेकरच असल्याचे स्पष्ट केले आहे.

पीएमपीचा निधी परत जाणार?

$
0
0
केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेतून (जेएनएनयूआरएम) पीएमपीला पाचशे बस खरेदीला मंजुरी मिळाली असली, तरी अद्याप त्यासाठी ‘वर्क ऑर्डर’च देण्यात आलेली नाही. त्यामुळे, त्यासाठीचा निधी मिळण्यापूर्वीच परत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्लास्टिक ग्लास महिनाभरात हद्दपार

$
0
0
प्लास्टिकचे ग्लास, थर्मोकोलच्या थाळ्या आणि मोफत मिळत असल्याने सहज उपलब्ध असणारी प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर आता फक्त महिनाभर तुम्ही करू शकणार आहात. त्यानंतर, प्लास्टिक पिशवीसाठी तुम्हाला १५ रुपये मोजावे लागणार असून, प्लास्टिक ग्लास आणि थर्मोकोलच्या थाळ्या वापरल्यास दंड भरावा लागणार आहे.

भीमा नदीपात्रालगत राडारोडा

$
0
0
राजगुरुनगर येथील भीमा नदी पात्रालगतच्या रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात बांधकामाचा राडारोडा टाकण्यात येत आहे. तर काही राडारोडा थेट नदी पात्रात ढकलून दिला जात आहे. रात्रीच्या वेळी किंवा मध्यरात्रीच्या सुमारास हा राडारोडा टाकला जातो.

भीमसेन जोशी नाट्यगृहात दुरवस्थेचे दशावतार

$
0
0
औंध येथील पं. भीमसेन जोशी नाट्यगृह समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. काही महिन्यांपूर्वीच या भागातील नागरिकांच्या सांस्कृतिक गरजा भागविण्यासाठी या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे. मोठा खर्च करून व्यासपीठावरील बंद पडलेला पडदा, तसेच कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे नाट्यकलावंत याकडे पाठ फिरवत आहेत.

रोहयो मजुरांना नुकसान भरपाई

$
0
0
जिल्हा आणि परिसरातील रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांना पंधरा दिवसांमध्ये मजुरी न दिल्यास नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. इतकेच नव्हे, तर मजुरी देण्यास विलंब करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ती वसूल करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत.

पुणे-सोलापूरसाठी ‘शिवनेरी’ची सेवा

$
0
0
पुण्याहून सोलापूरला जाणाऱ्यांचा प्रवास आरामदायी व्हावा, म्हणून एसटी महामंडळाने पुणे ते सोलापूर मार्गावर व्होल्वो शिवनेरी बसची सेवा करण्याचे निश्चित केले आहे.एसटीच्या ताफ्यात नवीन व्होल्वो बसेस आल्यानंतर या सेवेला सुरुवात होणार असल्याचे राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी ‘मटा’ ला सांगितले.

शहरातील नद्या घेणार मोकळा श्वास

$
0
0
पुण्यासह राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि मोठ्या गावांलगत असलेल्या नद्या आता मोकळा श्वास घेऊ शकणार आहेत. नद्यांना प्रदूषण मूक्त करण्यासाठी राज्य सरकारने नदी संवर्धन योजना तयार केली असून त्याअंतर्गत महापालिकांवर अनेक बंधने घातली आहेत.

‘इमर्जन्सी’ अॅम्ब्युलन्सचा होणार आणखी काही जिल्ह्यांत विस्तार

$
0
0
राज्यातील सात जिल्ह्यांत ‘ट्रायल’ स्वरूपात सुरू असलेल्या ‘इमर्जन्सी’ मेडिकलच्या अॅम्ब्युलन्सच्या योजनेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. इतकेच नव्हे तर आणखी सात जिल्ह्यात नव्यानेही योजना सुरू करण्यात आली.

‘पुणे महापालिकेने द्यावी जकातीची थकीत रक्कम’

$
0
0
पुणे महापालिकेकडे जकातीपोटी असलेली सुमारे ३२ कोटी ७९ लाख रुपयांची थकबाकी देण्याची मागणी पुणे कँटोन्मेंट बोर्डातील नगरसेवकांनी उपमहापौर बंडू उर्फ सुनील गायकवाड यांच्याकडे केली. ही रक्कम येत्या दहा दिवसांमध्ये देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन उपमहापौर गायकवाड यांनी दिले.

नाटकांच्या तारखांचे धोरण ठरविणार

$
0
0
तारखांच्या वाटपावरून होणारे वाद थांबविण्यासाठी महापालिकेने धोरण आखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात चौमाही तारखा वाटपामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि खासगी कार्यक्रमांचे प्रमाण निश्चित करण्यात येणार आहे.

‘प्रत्येकालाच हवे तिकीट’

$
0
0
‘हल्ली प्रत्येकालाच तिकीट हवे आहे, त्यामुळे राजकारण निवडणूक केंद्रीत झाले आहे,’ अशी खंत भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केली. केवळ सत्ताकारण न करता समाजकारण केले, तरच जनतेचे अधिक समर्थन मिळेल, असे त्यांनी सांगितले.

‘आप’ची केवळ तात्पुरती हवा

$
0
0
‘प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय म्हणून आम आदर्मी पार्टी पुढे आली असली, तरी आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांची डाळ शिजणार नाही. ‘आप’ ही राजकारणातील केवळ तात्पुरती हवा आहे’, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी ‘आप’वर टीका केली.

गांधीजींच्या फोटोची इंग्रजांना धडकी

$
0
0
अहिंसावादी तत्त्वाने इंग्रजांशी लढा देत असतानाही, गांधीजींच्या फोटोमुळे इंग्रजांना धडकी भरत होती, अशा आशयाच्या तत्कालीन पत्रव्यवहाराच्या नोंदी जुन्नर नगर वाचनालयाच्या दप्तरात मिळाल्या आहेत. त्यामुळे गांधीजींचे लढ्याचे तत्त्व अहिंसक असले, तरी इंग्रजांना त्यांच्या व्यक्तिमत्वाची चांगलीच चपराक बसत होती.

४ वर्षांची मुलगी अपहरणमुक्त

$
0
0
चार वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्या आई- वडिलांकडे खंडणी मागणाऱ्या जोडप्याला देहूरोड पोलिसांनी छत्तीसगड येथे अटक करून मुलीची सुटका केली. उदयराम गुहिराम बंजारी उर्फ उदय खाटकर (वय २९) आणि पूजा खाटकर (३५, दोघे रा. छत्तीसगड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

महामार्गावर भीषण अपघात, ४ ठार

$
0
0
पुणे-बंगळुरू महामार्गावर सोमवारी दुपारी झालेल्या एका अपघातात चारजण ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. नागठाणेजवळ सुमो-एसटी आणि ओम्नी गाडी यांच्यात विचत्र अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले आणि जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images