Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘रिगाटा’त यंदा कनू बोटीचं आकर्षण

$
0
0
चित्तथरारक सादरीकरण आणि भन्नाट उपक्रमांनी सजलेला अतरंगी रिगाटा यंदाही ‘नौकानयन’प्रेमींसाठी सज्ज झाला आहे. येत्या दोन मार्च रोजी (रविवारी) संध्याकाळी पाच वाजता सीओईपीच्या बोट क्लब इथं हा इव्हेंट रंगणार आहे.

जाणू चतुःश्रृंगीचा इतिहास हेरिटेज वॉक

$
0
0
पुणे शहर चहुबाजूनं टेकड्यांनी वेढलेलं. त्या टेकड्यांवर विविध दैवतांचीही स्थापना झाली आहे. चतुःश्रृंगी देवी हा असाच पुणेकरांच्या श्रद्धेचा विषय. यंदाचा हेरिटेज वॉक चतुःश्रृंगी मंदिराच्या परिसरातच होणार आहे.

जुन्या रिक्षांचा निर्णय हरित लवादाकडे

$
0
0
रिक्षाचालक संघटना आणि राज्यसरकार यांच्यातील वादाने आता कोर्टाची पायरी चढली असून जुन्या रिक्षांचे करायचे काय याचा निर्णय आता सरकार नव्हे तरा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण देणार आहे.

‘COEP’च्या अहवालांना केराची टोपली

$
0
0
मुठा नदीतील प्रदूषणासंदर्भात अहवालांचे कागदी घोडे नाचविणाऱ्या महापालिकेने इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी (सीओईपी) तयार केलेल्या अहवालांना गेली आठ वर्षे केराची टोपली दाखविली आहे. परिणामी, हे अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्याचा विचार करण्यात येत आहे.

‘ESIC’ हॉस्पिटलकडे केंद्र, राज्य सरकारचे दुर्लक्ष

$
0
0
गरीब कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन’च्या (ईएसआयसी) हॉस्पिटल्सकडे केंद्र आणि राज्य सरकारांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ‘ऑल इंडिया इएसआयसी एम्लॉइज फेडरेशन’ने केला आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी पालिकेचे खास धोरण

$
0
0
पालिकेतील महिला सदस्यांसाठी ‘स्पेशल ट्रेनिंग आणि सपोर्ट सेल’..., महिला कर्मचाऱ्यांसाठी पालिकेच्या आवारात विश्रांती कक्ष, जिम, डे-केअरसारख्या सुविधा..., स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी ‘वन स्टॉप इन्फर्मेशन सेंटर’..., महिलांसाठी सुरक्षा धोरण..., आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी कॅबमध्ये जीपीएस यंत्रणा...

गावाकडील हुरडा पार्ट्यांवर संक्रांत

$
0
0
धावपळीची जीवनशैली, वाढती महागाई, विभक्त कुटुंब पध्दती, ऊस भाजीपाला यासारख्या नगदी पिकाखालील क्षेत्रात झालेली वाढ, ग्रामीण भागातून दुभत्या जनावरांबरोबर बैलजोड्यांचीही घटलेली संख्या या कारणांमुळे एकेकाळी ग्रामीण भागातील पाहुणचाराचे, आदरातिथ्याचे प्रतीक असणारा हुरडा पार्टीसारखा प्रकार लोप पावत चालला आहे.

डॉक्टरांचा पालिकेवर मोर्चा

$
0
0
वैद्यकीय परवाना शुल्क आकारणीच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निर्णयाच्या विरोधात शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) मोर्चा काढला. ही शुल्कवाढ रद्द करण्याचे आश्वासन महापौर मोहिनी लांडे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

ज्युनिअर कॉलेज शिक्षकांचा बारावी परीक्षेवरील बहिष्कार मागे

$
0
0
ज्युनिअर कॉलेज शिक्षकांच्या संघटनेने बारावीच्या पेपर तपासणीवर घातलेला बहिष्कार शुक्रवारी मागे घेतला. पेपर तपासणी आणि परिणामी बारावीच्या निकालाला होऊ शकणारा उशीर, ही दोन्ही संकटे त्यामुळे टळली आहेत.

केशरी रेशनकार्डधारकांनाही मार्च महिन्यापासून ‘अन्नसुरक्षा’

$
0
0
अन्नसुरक्षा योजनेच्या पात्रता यादीतून वगळण्यात आलेल्या दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) रेशनकार्डधारक कुटुंबांना मार्च महिन्यापासून सवलतीच्या दराने धान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुणे शहर व ग्रामीण भागातील साडेपाच लाख कुटुंबांना महागाईच्या काळात स्वस्त धान्याचा आधार मिळणार आहे.

आझम पानसरे काँग्रेसमध्ये जाणार

$
0
0
मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार लक्ष्मण जगताप यांची उमेदवारी निश्चित मानली जात असल्यामुळे नाराज झालेले राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष आझम पानसरे यांनी ‘राष्ट्रवादी’ला धक्का देत काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याचे शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) जाहीर केले.

नाट्यगृहांमध्ये मनुष्यबळाची उणीव

$
0
0
शहराच्या उपनगरांमध्ये नाट्यगृहे उभारून नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या महापालिकेने नाट्यगृहांमध्ये पुरेसे मनुष्यबळ देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कर्मचारी भरतीच न केल्याने यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बालगंधर्व रंगमंदिर आणि गणेश कला क्रीडा केंद्र या तीन नाट्यगृहातील मनुष्यबळावर ताण येत असून, याच नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांवर नव्याने बांधलेल्या नाट्यगृहांची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

बोगस मार्कशीटप्रकरणी तक्रार

$
0
0
प्रथम वर्ष इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाची बनावट गुणपत्रिका सादर केल्याप्रकरणी पुणे विद्यापीठाने मॉडर्न इंजिनीअरिंग कॉलेजच्या संकेत सखाराम नाईकरे या विद्यार्थ्याच्या विरोधात चतुःश्रुंगी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सुपर कम्प्युटरची क्षमता वाढविणार

$
0
0
‘हवामानाचा अंदाज अधिक अचूक येण्यासाठी मानवी कौशल्याबरोबरच सुपर कम्प्युटिंग’ क्षमतेचीही आवश्यकता आहे. ही क्षमता वाढविण्यासाठी भू-विज्ञान मंत्रालयाने पुढाकार घेतला असून सध्याची सहा पेटा फ्लॉप क्षमता २०१७ पर्यंत दहा पेटाफ्लॉपपर्यंत वाढविण्यात येणार आहे,’ अशी माहिती भू-विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. शैलैश नायक यांनी शुक्रवारी दिली.

पवारांच्या कारखान्याची 'दादा'गिरी

$
0
0
जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित बारामतीच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गरीब जनतेला रेशनवर सवलतीत देण्यात येणारी साखर अडविली आहे. केवळ पुणेच नव्हे राज्यातील २३ जिल्ह्यांची ८० हजार क्विंटल लेव्हीची साखर देण्यासही कारखान्याने नकार दिला आहे.

सामाजिक कार्यकर्त्याला बलात्कारप्रकरणी शिक्षा

$
0
0
बांधकामावर मजुरीचे काम करत असलेल्या एका महिलेला मदतीचे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी निगडी येथील एका सामाजिक कार्यकर्त्याला कोर्टाने सात वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सावकारी करणाऱ्या महिलेला जन्मठेप

$
0
0
व्याजाचे पैसे देत नाही म्हणून कर्जदार महिलेच्या तीन वर्षाच्या मुलाला वाहत्या कालव्यात फेकून देऊन त्याचा खून केल्याप्रकरणी सावकारी करणाऱ्या एका म​हिलेला जन्मठेपेची शिक्षा आणि एक हजार २५० रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. पी. धोटे यांच्या कोर्टाने सुनावली आहे.

विद्यार्थी पदवीप्रदानाला मुकणार

$
0
0
‘मला माझी पदवी माझ्या हातानेच घ्यायची होती. पदवी घेऊन त्या टोप्या उडवून, फोटोसेशन करायचे होते. आता ऐन वेळी कार्यक्रमाची ई-मेल पाहिली. ऐन वेळी मी रजा घेऊ कशी आणि कार्यक्रमाला हजर राहू तरी कसा...’

‘नॉर्थ-ईस्ट’च्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची दक्षता घेणार

$
0
0
‘नॉर्थ-ईस्ट’चा विद्यार्थी असलेल्या निदो तानियाच्या खुनाच्या घटनेनंतर केंद्रीय गृहसचिवांनी देशातील २१ पोलिस आयुक्तालयांच्या प्रमुखांची बैठक घेत ‘नॉर्थ-ईस्ट’च्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. म्यानमार दंगलीनंतर पुण्यातील नॉर्थ-ईस्टच्या तरुणांवर हल्ले झाले होते.

यशवंत नडगम यांची दलित पॅँथरमधून हकालपट्टी

$
0
0
पक्षशिस्त मोडणे, मनमानी करणे, पक्षाच्या अपरोक्ष आर्थिक व्यवहार करणे अशा गंभीर कारणामुळे दलित पँथरच्या पुणे विभागीय कार्यकर्ते यशवंत नडगम यांना संघटनेतून काढून टाकण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भात संघटनेच्या अध्यक्षा मल्लिका नामदेव ढसाळ यांनी पत्रकाद्वारे माहिती कळविली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images