Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

घोळकेबाज वाहतूक पोलिसांना पाचशेचा दंड

$
0
0
वाहतूक पोलिस रस्त्यावर घोळक्याने थांबलेले दिसल्यास त्यांना ५०० रुपयांचा दंड आणि संबधित विभागाच्या प्रमुखांना २०० रुपयांचा दंड करणार असल्याचे शहराचे वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.

ट्रक कोसळून ९ वारक-यांचा मृत्यू

$
0
0
आषाढी वारीने पंढरपूरला निघालेल्या बारामती तालुक्यातील कांबळेश्वर गावच्या दिंडीचा ट्रक मंगळवारी नीरा पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात ९ वारकरी ठार तर, ७ जण जखमी झाले.

फॅशन स्ट्रीटवरील अतिक्रमण हटवा

$
0
0
कँपमधील फॅशन स्ट्रीट परिसरामध्ये अनधिकृत पथारीवाल्यांनी केलेले अतिक्रमण लवकरात लवकर हटविण्याची मागणी एम. जी. रोड हॉकर्स अँड पथारी असोसिएशनने केली आहे.

विद्यानगर गोळीबारप्रकरणी आणखी ४ अटकेत

$
0
0
विद्यानगर परिसरामध्ये रविवार (ता. १७) तीन भावांवर गोळीबार व कोयत्याने वार केल्या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा आणखी चार आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या चौघांना न्यायालयाने २२ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लख्ख सूर्यप्रकाशात मान्सून गुडूप

$
0
0
कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा करायला लावणाऱ्या मान्सूनने खान्देश वगळता राज्याचा उर्वरित सर्व भाग मंगळवारी व्यापला आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून आणखी काही भागांत दाखल होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

लोणावळ्यात कच-याचे साम्राज्य

$
0
0
लोणावळा नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या उदासिनतेमुळे शहरातील बहुतांश प्रभागात घाणींचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना घाण आणि दुर्गंधीशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांना गतवर्षीप्रमाणेच मदत

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिकाच्या रकमेत कपात न करता गेल्यावषीर्प्रमाणेच योजना कार्यान्वित ठेवण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (१९ जून) घेण्यात आला.

जिल्हाधिका-यांचा आदेश केराच्या टोपलीत

$
0
0
कॉलेज अॅडमिशनसाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन नागरी सुविधा केंद्रात अधिक कर्मचारी उपलब्ध करून देण्याची जिल्हाधिका-यांची घोषणा हवेतच विरली आहे.

भा. द. खेर यांचे निधन

$
0
0
ज्येष्ठ कादंबरीकार, कथालेखक आणि पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर (९५) यांचे गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. चरित्रात्मक वाङ्मयप्रकार मराठीत रुजविणाऱ्या खेर यांनी तब्बल शंभरहून अधिक पुस्तके लिहिली होती.

गुजरातमधील पर्यटकांमध्ये पाचपटीने वाढ

$
0
0
राज्यातील छोट्या-मोठ्या पर्यटनस्थळांचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी पुरेशा निधीची तरतूद, पर्यटकांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधा आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 'अॅग्रेसिव्ह ब्रँडिग'च्या माध्यमातून गुजरातमधील पर्यटकांमध्ये अवघ्या पाच वर्षांत चौपटीहून अधिक वाढ झाली आहे.

राजकीय पक्षांची 'आर्थिक गुपिते' उलगडणार

$
0
0
निवडणूक निधी, पक्षनिधीच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी जमविणा-या राजकीय पक्षांना लवकरच कडक ऑडिट नियमांचा सामना करावा लागणार आहे.

कोरेगाव पार्कमध्ये मॉलला आग

$
0
0
कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या 'कोरेगाव पार्क प्लाझा'या मॉलमध्ये गुरुवारी सायंकाळी लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मॉलमधील 'शॉपर्स स्टॉप' या विभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझविण्यात आली.

दिंडीप्रमुखांचा अखेरचा प्रवास!

$
0
0
आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना पंढरपूरला घेऊन जाणारा ट्रक आज पहाटे पाणेतीनच्या सुमारास निरा नदीच्या पुलावरून पडून झालेल्या अपघातात नऊ जण ठार झाले.

जूनमधील पाऊस 'राम भरोसे'च

$
0
0
राज्यातील पाणीटंचाईमुळे दुष्काळाची छाया गडद होत असतानाच, मान्सूनच्या लहरीपणाचा फटका पुन्हा बसण्याची शक्यता आहे. पॅसिफिक समुदात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सून वा-याचा प्रभाव ओसरला आहे.

पवना पाणलोट क्षेत्रातून माती चोरी

$
0
0
मृदा (माती) चोरांनी मावळातील माळरान, डोंगर-टेकड्यानंतर आता धरणातील पाणलोट क्षेत्रातील मातीकडे मोर्चा वळविला असून, पवना धरणातील पाणलोट क्षेत्रामधून भरदिवसा दररोज शेकडो ट्रक मातीची चोरी केली जात आहे.

'दोन ध्रुवांवर दोन पावलं'

$
0
0
'जगभरात ठिकठिकाणी परंपरा, ऐतिहासिक संचित यांचा प्रभावी वापर करून पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असताना, महाराष्ट्रात पूर्वजांनी दिलेल्या गोष्टींचा खुबीने वापर करण्यात कमी पडत आहोत', अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी व्यक्त केली.

वीजबिल वसुलीवरून 'जनमित्रा'ला मारहाण

$
0
0
थकीत वीजबिल वसुलीची कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या जनमित्राला मारहाण करण्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाजणाला अटक करण्यात आली आहे.

पालिका शाळेतील विद्यार्थी अद्यापही बुटांशिवायच

$
0
0
पिंपरी- चिंचवड परिसरातील सर्व शाळा १५ जूनला सुरू झाल्या असल्या, तरीही शिक्षण मंडळाकडून उद्यापही बूट खरेदी करण्यात आलेली नाही. संत रोहिदास चमोर्द्योग आणि चर्मकार विकास महामंडळाकडून बूट खरेदी करण्याचा मंडळाचा प्रस्ताव आयुक्त श्रीकर परदेशी यांनी परत पाठविला आहे.

वाहतुकीच्या कामांचे अधिकार पोलिसांना द्या

$
0
0
दिशादर्शक फलक लावणे...पांढरे पट्टे आखणे....सिग्नलची दुरुस्ती...अशा अनेक कामांसाठी वाहतूक पोलिसांना महापालिकेवर अवलंबून राहावे लागते. वाहतुकीशी संबधित कामे करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना द्यावेत आणि त्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी वाहतूक पोलिसांनी राज्य सरकारला वाहतूक सुधारणा प्रस्ताव दिला आहे.

पुणे विद्यापीठ वाढविणार रोजगारक्षमता

$
0
0
भाषा, समाजशास्त्र, विज्ञान या शाखांतील विद्यार्थ्यांमधील रोजगारक्षमता (एम्प्लॉयाबिलिटी) वाढविण्याकरिता त्यांच्या पदवी अभ्यासक्रमांतच कौशल्य शिक्षणाचा समावेश करण्याची भूमिका पुणे विद्यापीठाने घेतली आहे. त्यासाठी उद्योग क्षेत्राची मदत घेतली जाणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images