Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

महापालिकेकडे नकोत बोर्डाची कामे

0
0
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनर्निर्माण योजनेअंतर्गत (जेएनएनयूआरएम) बोर्डाच्या हद्दीत उभारण्यात येणारे विकास प्रकल्प महापालिकेकडून राबविण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशाला बोर्डाच्या आजी-माजी नगरसेवकांकडून विरोध करण्यात आला आहे.

संशोधक शोधण्याचा ‘एनसीएल’चा उपक्रम

0
0
मेंदूच्या उजव्या व डाव्या भागाचे कार्य... शरीराबाहेर हृदय तयार करणे.. पेशीतील गुणसूत्रांचे कार्य.. भूमितीच्या त्रिकोणाच्या बाजूचा नियम... नैसर्गिक रंगाचा कलाजीवनातील आविष्कार यासारख्या संशोधनात्मक माहितीबरोबरच शालेय मुलांमध्ये संशोधक वृत्ती करण्यास प्रवृत्त करून ‘बाल संशोधक शोधन’चे कार्य गेल्या चार वर्षांपासून एनसीएल (नॅशनल केमिकल लॅबरोटरी) च्या वतीने करण्यात येत आहे.

‘नॅनो’ पाणी... ना धड द्रव, ना स्थायू

0
0
सजीवांच्या पेशींमध्ये आढळणारे, नॅनो स्वरूपातील पाणी द‍्रव नव्हे, तर एखाद्या जेल किंवा केचपसारखी ‘ना धड द्रव, ना धड घन’ अवस्थेतील गुणर्धम दाखवित असल्याचे पुण्यातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’मधील (आयसर) संशोधकांनी दाखवून दिले आहे.

उलगडले अवकाशाचे कोडे

0
0
रेडिओ वेव्ह म्हणजे काय, रेडिओ अॅस्ट्रोनॉमीमध्ये नेमक्या कोणत्या प्रकारचा अभ्यास केला जातो...रेडिओ टेलिस्कोपचे काम कशा प्रकारे चालते... आपल्या जगाची निर्मिती कशी झाली ते अगदी आपल्याला एखादा अंतराळातला ‘शेजारी’ सापडू शकतो का...

फिरत्या प्रयोगशाळेचा ‘विज्ञान प्रयोग’

0
0
विज्ञान प्रकल्प तर दूरच प्रयोगशाळा देखील कधी पाहायची संधी मिळाली नाही अशा खेड्यांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण व्हावे, या उद्देशाने ‘स्व’-रुपवर्धिनीने सतरा वर्षांपूर्वी फिरती प्रयोगशाळा सुरू केली. बघता बघता मुळशी खोरे, राजगुरूनगर, हवेलीतील खेडी पिंजून काढली आणि मुलांना विज्ञानाची गोडी लावली.

धनादेश न वटल्याप्रकरणी ६० हजार दंडाची शिक्षा

0
0
फ्लॅट खरेदी करताना मालकाला दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी कोर्टाने एकाला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि ६० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गिरीजेश कांबळे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

‘आप’ देणार तरुणांना हाक

0
0
तरुणाईच्या सक्रीय पाठिंब्याच्या जोरावर दिल्ली विधानसभेत जोरदार मुसंडी मारलेल्या आम आदमी पक्षाने (आप) आता तरुणाईच्या संघटनांकडे आपला मोर्चा वळवला आहे. युवावर्गाचा उत्साह, क्षमता आणि ताकद ओळखून पक्षातर्फे आता युवा वर्गाची स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार आहे.

शंभर टक्के बिले दिल्यास भीती नको

0
0
मार्च महिन्यापासून राज्यात ‘शेड्युल एच १’ची अंमलबजावणी होत असल्याने रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक आहे. त्यावेळी केमिस्टांनी शंभर टक्के बिले दिल्यास या नव्या नियमाने घाबरून जाऊ नये, असा मौलिक सल्ला राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिला.

‘जीआर’ निघेपर्यंत बहिष्कार कायम

0
0
राज्यातील ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांच्या दोन मागण्यांसाठीचे अध्यादेश (जीआर) राज्य सरकारने गुरुवारी काढले. मात्र, २००८-०९ पासूनच्या प्रस्तावित पदांच्या मान्यतेचा अध्यादेश सरकारने राखून ठेवल्याने, या अध्यादेशासोबतच इतर मागण्यांसाठीचे अध्यादेश निघेपर्यंत आपला बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने गुरुवारी घेतला.

विनापरवाना पार्टी आयोजकांना जोरदार दणका

0
0
विनापरवाना पार्ट्यांचे आयोजन केल्यास ठोठावण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत महसूल विभागाने मोठी वाढ केली आहे. आता अशा विनापरवाना पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्या संयोजकांना पंचवीस हजार रूपयांचा दंड आणि पाचपट करमणूक शुल्काची आकारणी करण्यात येणार आहे.

फार्मसिस्टला आता वर्षभर प्रशिक्षण

0
0
फार्मसीच्या विद्यार्थ्यांना चांगले भवितव्य असले तरी डॉक्टरनंतर फार्मसिस्टला आता महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे. फार्मसिस्टला सद्या हवे तसे ज्ञान नसल्याने येत्या वर्षभरात राज्य फार्मसी कौन्सिलमार्फत फार्मसिस्टला प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

गारपिटीचा अहवाल दोन दिवसांत द्या

0
0
नागपूर, अमरावती व पुणे विभागासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत झालेली गारपीट आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याचा अहवाल दोन दिवसांत देण्याची सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी केली.

पीएसआय, एमपीएससी लेखी परीक्षांचे निकाल जाहीर

0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदा (पीएसआय)साठीच्या मुख्य परीक्षेचे निकाल बुधवारी जाहीर झाले. राज्यसेवा परीक्षेच्या निकालाप्रमाणेच यंदा या परीक्षेचा ‘कट्ऑफ’ घसरला असून, यंदा २०० पैकी ३४ गुण मिळविणारे उमेदवारही मुलाखतीसाठी पात्र ठरल्याचे चित्र या निकालामधून समोर आले आहे.

‘आप’चाही राष्ट्रवादीवर हल्लाबोल

0
0
‘बीडीपीच्या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे यांचे हितसंबंध जपण्यासाठी लाखो पुणेकरांचा बळी दिला जात आहे’, अशा शब्दांत आम आदमी पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढविला. शहरातील जैववैविध्य उद्यानांसाठी (बीडीपी) आरक्षित जागांबाबत वारंवार भूमिका बदलणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धरसोड वृत्तीवरही ‘आप’ने टीकास्त्र सोडले.

मनसे स्वतंत्रपणे लढणार?

0
0
आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात किमान १८ ते २० जागा लढविण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विचार सुरू आहे. मात्र, ऐनवेळी महायुतीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यास स्वबळावर लढविण्याच्या मनसेच्या भूमिकेत बदल होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

गारपीटीमागे ‘जागतिक’ कारण

0
0
राज्यात बुधवारी सर्वदूर झालेल्या गारपिटीमागे हवामानाची फक्त स्थानिक कारणे नसून, पश्चिमेकडून हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या थंड वाऱ्यांचीही त्यात महत्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट होत आहे. अमेरिकेत आणि काश्मीरमध्ये होणारी बर्फवृष्टी आणि विदर्भ - मराठवाड्यात झालेली गारपीट यांच्यामागे मध्य अक्षांशांवरून वाहणारे थंड वारेच असल्याचे हवामानतज्ञ सांगत आहेत.

संजय दत्त हा ‘स्पेशल कैदी’ नाही

0
0
मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटप्रकरणी बेकायदा शस्त्र बाळगल्याबद्दल येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्तच्या ‘पॅरोल’ वाढीवरून एकच वादंग उठले आहे. मात्र, येरवडा जेलमध्ये पॅरोलवर सुटलेल्या २५५ कैद्यांपैकी २०४ कैद्यांना ९० दिवसांचा पॅरोल मिळाला असल्याची माहिती उघड झाली आहे.

मातृभाषेची प्रेमाने गोडी लावावी

0
0
‘माणसाचा त्याच्या मातृभाषेतून विकास घडतो. मातृभाषेतूनच स्वतःचा शोध घेता येतो. मराठीविषयी जबरदस्तीने नाही, तर प्रेमाने गोडी निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी पोषक वातावरण तयार करण्याची गरज आहे,’ असे मत अभिनेते-लेखक गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

स्कॉलरशिप परीक्षा लांबणीवर

0
0
एकाच दिवशी आलेल्या होळी आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेमुळे यंदा स्कॉलरशिपच्या परीक्षेचा बेरंग झाला आहे. होळीमुळे राज्यातील चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षा एका आठवड्याने पुढे ढकलण्याची नामुष्की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर ओढावली आहे.

रंगला माउंटन फिल्म फेस्टिव्हल

0
0
हजारो फूटांचा सरळसोट उभा कडा, कुठल्याही साधनाशिवाय रॉक क्लाईंबिंग करणारा ट्रेकर, क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा, कडा चढणाऱ्याचा तोल जाताच प्रेक्षकांमधून उमटणारी हळहळ आणि माणसाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची प्रचिती देणारा ‘रिअल रॉक-सेव्हन’ हा लघुपट.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images