Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तोतया डॉक्टरला अटक

$
0
0
अमरावती येथील डॉक्टरचे नाव वापरून गेल्या आठ वर्षांपासून पुण्यात खुलेआमपणे प्रॅक्टिस करत असलेल्या एका तोतया डॉक्टरला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. त्याने बनावट मृत्यूपत्र, फिटनेस प्रमाणपत्र देण्याबरोबरच डॉक्टरांच्या सरकारी पॅनेलवर काम केल्याची माहिती समोर आली आहे.

युवकाचा खून: तिघांना वानवडीत अटक

$
0
0
युवतीची छेडछाड करण्याच्या कारणावरून चाकूने भोसकून युवकाचा खून केल्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांना कोर्टाने २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल विक्रेत्याची २ कोटी रुपयांची फसवणूक

$
0
0
डेक्कन येथील ड्रीम अॅनेक्स या मोबाइल विक्रेत्याची दोन कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. या दुकानातून मोबाइल खरेदी करून हे पैसे देण्यास टाळाटाळ केल्यामुळे रवींद्र मधुकर ढेकणे (रा. नारायण पेठ) यांच्याविरूद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वाढत्या उन्हांमुळे कलिंगड, द्राक्षांना मागणी

$
0
0
उन्हाचा कडाका वाढू लागल्यामुळे कलिंगड, खरबूज आणि द्राक्षे या फळांना चांगली मागणी आली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कलिंगड आणि खरबुजाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्राहकांची मागणी वाढल्याने किरकोळ बाजारपेठेत त्याचे दर वाढले आहेत.

‘परवान्यांच्या जाचामुळे हॉटेल व्यवसाय संकटात’

$
0
0
अबकारी शुल्कामधील प्रचंड वाढ, पार्किंगचे कडक नियम, पोलिस परवाना मिळण्यासाठी होणारा जाच यामुळे पुण्यातील हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. परवाने देण्याची क्लिष्ट पद्धत रद्द करतानाच अबकारी शुल्क व पार्किंगच्या नियमात सवलत मिळण्याची मागणी पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनने केली आहे.

परराज्यांतील भाजीपाल्यांनी मंडई बहरली

$
0
0
वातावरणात झालेल्या बदलामुळे बाजारपेठेमध्ये भाजीपाल्यांची आवक वाढली आहे. कांदा आणि आल्याच्या दरामध्ये किरकोळ वाढ झाली असून फ्लॉवरचे दर उतरले आहेत. पालेभाज्यांबरोबरच अन्य भाज्यांचे दर स्थिर आहेत. रविवारी मार्केटयार्डमधील घाऊक बाजारपेठेत भाजीपाल्याच्या २०० गाड्यांची आवक झाली.

हवालदिल पित्याला रुपी बँकेचा ठेंगा

$
0
0
मुलीच्या नावावर असलेली सत्तर हजार रुपयांची मुदत ठेव (एफडी) गरजेवेळी काढण्याची मागणी केलेल्या खातेदारालाच पैसे देण्यास रुपी बँकेने नकार दिला. मुलीच्या किडनी ऑपरेशनसाठी काढलेले कर्ज फेडण्यासाठी पैसे मिळत नसल्यानेच हवालदिल झालेल्या खातेदाराने अखेर शनिवारी बँकेच्या मुख्य शाखेतच ठिय्या दिला!

बाजारपेठेत तेजी; बंद व मोर्चांची

$
0
0
बाजार समितीच्या प्रशासनाकडून सुरु असणाऱ्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी दि पूना मर्चंट्स चेंबरच्या प्रतिनिधींनी २५ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. दुसरीकडे, स्थानिक स्वराज्य संस्था कराची (एलबीटी)अंमलबजावणी जाचक पद्धतीने होत असल्याचा आरोप करीत ‘फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन्स ऑफ पुणे’ने आज (२४ फेब्रुवारी) पुणे बंदचा इशारा दिला आहे.

केबल टाकण्यासाठी साइड पट्ट्यांची ‘वाट’

$
0
0
चाकणजवळील वाकी गावाच्या हद्दीत व इंद्रायणी नदीच्या अलीकडे असलेल्या चिंबळी गावाच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गाला लागून असलेल्या साइड पट्ट्या खोदून खासगी कंपनीकडून ओएफसी केबल टाकण्याचे काम वेगात सुरू आहे.

‘कुटुंब’ कर्मचाऱ्यांचा लसीकरणावर बहिष्कार

$
0
0
अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय कुटुंब कल्याण कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिओ लसीकरणाच्या मोहिमेवर रविवारी बहिष्कार घातला. त्यामुळे सरकारी कर्मचारी असलेले ८० बूथ बंद होते.

पगार मिळावा म्हणून केले अपहरण

$
0
0
गेल्या १० महिन्यांपासून पगार दिला नाही म्हणून संतापलेल्या सिक्युरिटी गार्डने एका व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी घडला. सिंहगड रोडवरील सनसीटीजवळ एका हायप्रोफाइल सोसायटीत ही घटना घडल्यानंतर काही तासांच्या आतच त्या सिक्युरिटी गार्डला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

प्लास्टिक पिशवीसाठी मोजा १५ रु.

$
0
0
फळांपासून ते किराणामालापर्यंत कोणत्याही गोष्टीची खरेदी केल्यावर मिळणारी प्लास्टिक बॅग यापुढे ग्राहकांना १५ रुपयांना विकतच घ्यावी लागणार आहे. तसेच, प्लास्टिक आणि थर्माकोलच्या थाळ्या आणि ग्लासवरही पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेने शुक्रवारी घेतला. यामुळे, प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरात घट होण्याचा अंदाज आहे.

‘अनुनाद’ मांडणार खेळकर जीवनशैली

$
0
0
एकपात्री कलाकार आणि प्रसिद्ध निवेदिका मंजिरी धामणकर यांच्या ‘अनुवाद’ या नव्या पुस्तकाच्या निमित्तानं ‘अनुनाद’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शुभारंभाचा प्रयोग येत्या २ मार्च रोजी एस. एम. जोशी सभागृहात सकाळी १०.३० वाजता होणार आहे.

स्वरभूमीत रंगलेली ‘गीतसंध्या’

$
0
0
‘झिणीझिणी वाजे बीन’, ‘अरे कृष्णा, अरे कान्हा’ ही तुफान दाद मिळवणारी एकनाथांची गौळण, ‘खेळ मांडियेला’ आणि ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांनी सभागृहात एक वेगळीच वातावरणनिर्मिती केली.

स्वरांतून व्यक्त झालं सखीमन

$
0
0
मधुवंती रागातील ‘मोरे अंगनवा आयो रे’नं झालेली भावपूर्ण सुरुवात आणि उत्तरोत्तर सादर झालेल्या सुंदर रचनांनी सखीमन मैफिल रंगली. चित्रा आपटे, स्मिता भागवतवार आणि रंजना काळे यांच्या गोड स्वरांतून जणू सखीमन व्यक्त झाल्याचा अनुभव रसिकांनी घेतला.

उलगडली कर्नाटकी रागदारी

$
0
0
‘आद अनाद अनामय’ या बंदिशीनं संदीप देशमुख यांनी मैफिलीची दमदार सुरुवात केली. अंतऱ्यातील ‘निरंजन निराकार’वरील जोरकस, तरीही नजाकतीदार हरकती उपस्थित रसिकांना ‘वाहवा’ म्हणायला भाग पाडत होत्या.

अग्निटोत आरजे सोनालीची धमाल

$
0
0
मॉडर्न इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटतर्फे आयोजित ‘अग्निटो’ या मॅनेजमेंट फेस्टमध्ये मॅनेजमेंट गेम्स आणि विविध खेळांचा स्पोर्ट़्स फेस्ट अशी दुहेरी धमाल सुरू आहे. या दोन्ही उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

आज भेटणार ‘किचन क्वीन’

$
0
0
‘मेजवानी किचन क्वीन’च्या पुण्यातील फेरीतून निवड झालेल्या दहा स्पर्धकांपैकी दोघीजणी आज दुपारी ई-टीव्हीवरच्या या कार्यक्रमात दिसणार आहेत. त्या आहेत स्वप्ना ताम्हाणे आणि पूनम फिरोदिया.

दिसली खरी बाग!

$
0
0
‘आपण ज्याला अशोकाचं झाड म्हणतो, ते अशोकाचं नाहीच. मुळात खऱ्या अशोकाच्या झाडाचं नाव आहे आसूपालव. त्याला सितेचा अशोक असंही म्हणतात. आपण ज्याला शिरीषाचा वृक्ष समजतो, तोही खरा नाही.

दमदार ताल बहार

$
0
0
बिन्ध्याचल वाजपेयी मेमोरियल ट्रस्टतर्फे स्वतंत्र तबला वादन आणि गायन सभा आयोजिण्यात आली होती. तबला वादक मिलिंद पोटे आणि त्यांचे शिष्य हृषिकेश जगताप यांनी त्रितालात स्वतंत्रपणे एकल तबला वादन केलं.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images