Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विद्यापीठ चौकाला वाहतूक कोंडीचा विळखा

$
0
0
विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीमुळे मध्यमवर्गीय नोकरदार त्रस्त झाले आहेत. विद्यापीठ चौकामध्ये औंध, बाणेर व पाषाण रस्त्यावरून पुण्यामध्ये जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक समस्या निर्माण होत आहे. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी विविध संस्थांच्या सहकार्याने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर सुरेश पाटील

$
0
0
ग्रीन थंब संस्थेचे प्रमुख कर्नल सुरेश पाटील पुण्यातून आगामी लोकसभा निवडणूक तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर लढवणार आहेत. तृणमूल काँग्रेसकडून तिकीट मिळविण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले असून, लवकरच पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कुटुंब कल्याण कर्मचाऱ्यांचा पोलिओ मोहिमेवर बहिष्कार

$
0
0
स्वयंसेवी संस्थांमध्ये कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने अखिल भारतीय कुटुंब कल्याण कर्मचारी संघटनेने २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ मोहीमेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

‘शब्दरूप आले मुक्या भावनांना’

$
0
0
नाट्यसंस्कार कला अकादमीच्या भालबा केळकर स्मृती करंडक बालनाट्य स्पर्धेत भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालयाच्या शब्दरुप आले मुक्या भावनांना या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला.

स्वस्ताईच्या स्वप्नाला ब्रेक?

$
0
0
मोठा गाजावाजा करून मांडलेल्या फळे व भाजीपाला विनियमनाचे धोरण महिन्याभरातच लागू होण्यापूर्वीच अडगळीला गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या विरोधामुळे या धोरणाच्या मार्गात अडथळे आले असून, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘राष्ट्रवादी’ला चुचकारण्याचे धोरण घेण्यात आल्याने काँग्रेसनेही या विषयावर आस्ते कदम जाण्याचे ठरविल्याचे समजते.

कुत्र्यामागे मोजावे लागणार ६७५ रुपये

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असताना, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्डाकडून अॅनिमल बर्थ कंट्रोल मोहीम राबविली जाणार आहे. त्यानुसार बोर्डाला कुत्र्यांचे निर्बिजीकरण करावे लागणार असून, प्रत्येक कुत्र्यामागे ६७५ रुपये खर्च येणार आहे.

उकाड्याची चाहूल; गारवा ओसरला

$
0
0
शहरातील कडाक्याची थंडी आता कमी झाली असून वाढत्या तापमानामुळे उन्हाळ्याची चाहूल लागू लागली आहे. सकाळी दहा वाजल्यापासून वातावरणात उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. दिवसा उकाडा असला रात्री उशिरा मात्र अजूनही काही प्रमाणात गारवा जाणवत आहे.

बोर्डाचे राज्य सरकारकडे साकडे

$
0
0
आर्थिक घडी विस्कटलेल्या पुणे कँटोन्मेंट बोर्डाने आता राज्य सरकारकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य सरकारने करांमधील हिस्सा द्यावा आणि ‘प्रोफेशनल टॅक्स’वरील ​अधिभार वाढवून देण्याच्या मागणीचे पत्र बोर्डाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहे.

बजेट मांडताना ‘स्थायी’चा दुजाभाव

$
0
0
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चार हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचे बजेट मांडताना स्थायी समितीच्या अध्यक्षांनी दुजाभाव केल्याची टीका सेना, भाजपच्या नगरसेवकांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत केली.

अभिषेकी महोत्सवाची सुरुवात

$
0
0
पतियाळा घराण्याचा युवा गायक रमाकांत गायकवाड, युवा गायिका अंजली दाते आणि तरुण सतारवादक चिराग कट्टी यांचं सादरीकरण पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवातील ‘युवा संगीत संमेलना’त अनुभवता येणार आहे.

‘वुमनिया’ मांडणार ‘ती’ची भूमिका

$
0
0
स्वतंत्र थिएटरतर्फे लवासा सिटीच्या साहाय्यानं २० मिनिटांचं एक पथनाट्य सादर होणार आहे.

भटक्या कुत्र्यांना आवरण्यासाठी शिफासरी द्या

$
0
0
अभयारण्य आणि वनक्षेत्रात उपद्रव करणाऱ्या भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर असून याविषयी मार्ग काढण्यासाठी अभ्यासकांनी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यासाठी शिफारसी सुचवाव्यात, पुढील बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्याचा निर्णय राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

दौंड आणि लोणावळा लोकल आता लगतच्या फलाटांवरून

$
0
0
दौंडवरून लोणावळ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी, म्हणून मध्य रेल्वेने पुण्याहून लोणावळ्याकडे जाणारी लोकल आणि दौंडकडे जाणारी पॅसेंजर जवळच्या प्लॅटफॉर्मवरून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे स्टेशनवर या उपक्रमाची सुरुवात नुकतीच झाली असून, यामुळे प्रवाशांचा त्रास कमी झाला आहे.

जुन्या-नव्यांचा एकत्र गोंधळ

$
0
0
बारावीच्या परीक्षांचा पहिलाच दिवस जुन्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी काहीसा त्रासदायक ठरल्याचा अनुभव शहरातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी गुरुवारी घेतला. जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमांच्या वेगळ्या बैठकव्यवस्थेकडे या विद्यार्थ्यांनी गांभीर्याने लक्ष न दिल्याने त्यांची ऐन परीक्षेच्या तोंडावर धावपळ झाली.

चीफ मॉडरेटरची बैठक पुण्यात उधळली

$
0
0
पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने बोर्डाच्या राज्यभरातील वरिष्ठ नियामकांची (चीफ मॉडरेटर) बैठक गुरुवारी उधळली. शिक्षकांच्या मागण्यांना मान्यता देण्याबाबतचा राज्य सरकारचा अध्यादेश प्रसिद्ध होईपर्यंत पेपर तपासणीची कोणतीही कामे होऊ दिली जाणार नसल्याचेही या वेळी संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले.

‘स्टँडिंग’च्या मंजुरीअभावी कोर्ट मात्र ‘स्टँडिंग’

$
0
0
नगरसेवकनिधी खर्च करून लोकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले बाकडी रस्तोरस्ती दिसतात. मात्र शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात पक्षकारांसाठी बाकडी उपलब्ध करून दिल्यावर त्यावर कायद्याने आपले नाव छापले जाणार नाही म्हणून नगरसेवकांकडे अनेकदा पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात असल्यामुळे कोर्टातील वकिलांनी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीतर्फे २०० बाक मिळावेत म्हणून अर्ज केला आहे.

गल्लीत ‘काँक्रिट’ गोंधळ!

$
0
0
शहरातील सुस्थितीत असलेल्या रस्त्यांची ‘खोदाई’ सुरू असताना, आगामी आर्थिक वर्षात गल्लीबोळांच्या काँक्रिटीकरणासाठी तब्बल १५० कोटी रुपये खर्च करण्याची तयारी पालिकेने ठेवली आहे. त्यासाठी छोट्या-मोठ्या पाचशेहून अधिक रस्त्यांचे प्रस्ताव नगरसेवकांनी पालिकेला सादर केले आहेत.

शासकीय विश्रामगृहांत खेळाडूंना आरक्षण

$
0
0
जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय विश्रामगृहांत अर्जुन पुरस्कार विजेते, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, ध्यानचंद व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना सवलतीच्या दराने आरक्षण देण्याचा आदेश राज्य सरकारने काढला आहे.

सीएनजी वाहनांची संख्या वाढली

$
0
0
पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी सीएनजीवरील वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. शहरामध्ये सध्या पीएमपीच्या ८५४ बसेस आणि सुमारे ३० हजार रिक्षा सीएनजीवर धावत आहेत.

आजही भारनियमनाची शक्यता

$
0
0
महावितरणने अनेक महिन्यांनी पुण्यात गुरुवारी भारनियमन केले. केंद्रीय विद्युत यंत्रणा वाहिनीच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी सुमारे दोन तास भारनियमन करावे लागले. वाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्यास आजही (२१ फेब्रुवारी) भारनियमन होण्याची शक्यता आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images