Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आरोपी मिळाले… ‘तपासा’चे काय?

$
0
0
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांच्याकडे पोलिसांनी केलेल्या तपासात काहीही निष्पन्न झालेले नाही. आरोपींची ‘नार्को टेस्ट’ करण्याची पोलिसांची विनंती कोर्टाने फेटाळली असल्याने दाभोलकर तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

निकमांची उमेदवारी… ‘डोंगर पोखरून उंदीर’

$
0
0
शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेला उमेदवार म्हणजे `डोंगर पोखरून उंदीर निघाला` अशातील प्रकार असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी बुधवारी व्यक्त केली.

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सर्वाधिक प्रगत

$
0
0
राज्याने गेल्या दहा वर्षांत ज्ञानाच्या बळावर सर्व क्षेत्रांत प्रगती केली असून राज्याच्या काम‌गिरीशी स्पर्धा करणारे एकही राज्य नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

हिंजवडी, तळवडे होणार लाइट रेलने ‘कनेक्ट’

$
0
0
पुण्यातील मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आता हिंजवडी आयटी पार्क आणि आयटी कंपन्यांचा समावेश असलेल्या तळवडे येथील एमआयडीसीला लाइट रेलच्या माध्यमातून ‘कनेक्ट’ करण्यात येणार आहे. या भागात मेट्रो योग्य ठरणार नसल्याने लाइट रेल प्रकल्प राबविण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी केली.

‘बीडीपी’चा निर्णय राष्ट्रवादीशी चर्चा करूनच

$
0
0
महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांच्या हद्दीतील टेकड्यांवर जैववैविध्य उद्यानाचे (बीडीपी) आरक्षण टाकण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर वर्षेभर चर्चा करून मगच घेण्यात आला होता. मात्र बीडीपीमध्ये अनेक नागरिकांची घरे जात असतील तर त्याचा विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी स्पष्ट केले.

वन्यप्राणी महत्त्वाचे, ‌की भटकी कुत्री?

$
0
0
पुण्यासह राज्यातील वनक्षेत्रात शिरून सांबर, हरिण आणि सशांची भर दिवसा कळपाने शिकार करणाऱ्या भटक्या कुत्र्यांचे करायचे तरी काय? जंगलातील वन्यप्राणी महत्त्वाचे की भटक्या कुत्र्यांचा स्वैराचार योग्य या विषयावर महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळांची बैठक यंदा रंगण्याची शक्यता आहे.

बारावीच्या ‘हेल्पलाइन’ला हवी मदत

$
0
0
बारावीच्या परीक्षांच्या तोंडावर विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी बोर्डाच्या पुणे विभागीय मंडळाने सुरू केलेल्या ‘हेल्पलाइन’ सेवेलाच आता ‘हेल्प’ची गरज पडली आहे. हेल्पलाइन सेवेसाठी बोर्डाने जाहीर केलेले क्रमांक बुधवारी बंद आढळून आल्यानंतर, ‘आता आम्ही आमच्या अडचणी विचारायच्या तरी कोणाला,’ असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

राष्ट्रवादीची ‘खरी’ यादी?

$
0
0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरमधून देवदत्त निकम यांचे नाव जाहीर केल्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा कानोकानी सुरू झाली आहे. पक्षाच्या उमेदवारांची घोषणा येत्या शनिवारपर्यंत अपेक्षित आहे; मात्र, व्हॉट्स अॅप मेसेंजरवरून पक्षाच्या संभाव्य यादीचे मेसेज बुधवारी फिरू लागले.

दगाफटका करणार नाही

$
0
0
‘पुणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून आमदार गिरीश बापट, अनिल शिरोळे किंवा अन्य कोणताही उमेदवार असला, तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) कार्यकर्ते उमेदवार निवडून आणण्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहतील. कोणीही दगाफटका करणार नाही,’ अशी ग्वाही आरपीआयचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिली.

सुरेश खोपडेंना ‘आप’ची ऑफर

$
0
0
निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांना आम आदमी पक्षातर्फे लोकसभेच्या उमेदवारीबाबत विचारणा करण्यात आली आहे. पक्षाच्या सर्च कमिटीने भिवंडीसह राज्यात त्यांनी केलेली कामगिरी लक्षात घेत त्यांच्याकडे भिवंडी अथवा बारामतीतून निवडणूक लढविण्याबाबत विचारणा केली आहे.

मराठा आरक्षण महिनाअखेरीस

$
0
0
मराठा आरक्षण देताना भविष्यात कोणतीही कायदेशीर आव्हाने उभी राहू नयेत, याची काळजी घेऊनच निर्णय महिनाअखेरीस घोषित केला जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी किल्ले शिवनेरीवर बोलताना बुधवारी सांगितले.

ओमप्रकाश बकोरिया अतिरिक्त आयुक्त

$
0
0
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी ओमप्रकाश बकोरिया यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) पदभार स्वीकारणार आहेत. नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून दोन वर्षांहून अधिक काळ सक्षम काम केल्यांतर बकोरिया यांना पुण्यात काम करण्याची संधी मिळणार आहे.

आमचे क्षेत्र ‘अनहेल्दी’

$
0
0
‘राम कदम हे काही गोड संगीतकारांपैकी एक आहेत. शरद पवार यांच्या नावाचे प्रतिष्ठान, अजितदादांच्या हस्ते पुरस्कार आणि राम कदम यांचे नाव यासारख्या तिहेरी संगमामुळे हा पुरस्कार स्वीकारताना खूप समाधान आणि आनंद होत आहे,’ असे उद‍्‍गार प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांनी काढले.

शाळा-कॉलेज, हॉस्पिटलच्या आवारात मोबाइल टॉवरला बंदी

$
0
0
शाळा-कॉलेज किंवा हॉस्पिटलच्या आवारात मोबाइल टॉवर किंवा अँटेना उभारण्यास नव्या नियमावलीनुसार बंदी घालण्यात आली आहे. नगरविकास विभागाने तयार केलेल्या मोबाइल टॉवरविषयक नियमावलीला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नुकतीच मान्यता देण्यात आली आहे.

नाटकी भाषेमुळे नाटक साहित्यापासून दूर गेले

$
0
0
‘माणसाचे जीवन नाट्यमय असले, तरी नाटकाची भाषा माणसाच्या जीवनाशीच निगडित असली पाहिजे. पूर्वीच्या काळातील नाटकी भाषेने नाटकाला साहित्यापासून दूर नेले. त्यामुळे इतर साहित्यप्रकारांमध्ये नाटक कायमच मागे राहिले,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांनी व्यक्त केले.

गुंठेवारीतील वतन जमिनींच्या नजराण्यासाठी मुदतवाढ

$
0
0
गुंठेवारी कायद्यांतर्गत बांधकामे नियमित केलेल्या वतन व इनाम जमिनींचा नजराणा भरण्यासाठी दिलेली सवलत आणखी एक वर्षासाठी वाढविण्यात आली आहे. अशा जमिनींवर सध्या ७५ टक्क्यांऐवजी बाजारमूल्याच्या फक्त २५ टक्केच नजराणा भरून घेण्यात येत आहे.

नोटिशीच्या ‘पाया’वर सहा मजली बिल्डिंग

$
0
0
पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विकास दांगट यांच्या भावावर प्राणघातक हल्ला करण्यास कारणीभूत ठरलेली वडगाव बुद्रुकमधील इमारत बेकायदा असल्याचे उघड झाले आहे. महापालिकेने सुमारे सात महिन्यांपूर्वी बेकायदा बांधकाम थांबविण्याच्या नो​टिसा देऊनही सहा मजली इमारत उभारली गेली आहे. संबंधित इमारत पाडण्याची मागणी करण्यात आली आहे.

फ्लेक्सबाजी बंद झाल्याने ‘समाधान’

$
0
0
रहिवास, जात, उत्पन्न दाखले यासह विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी शहर व ग्रामीण भागात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘समाधान योजने’चा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर होऊ लागला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेबाबत होणारी राजकीय फ्लेक्सबाजी टाळण्यासाठी तूर्त असे कार्यक्रम बंद करण्यात आले आहेत.

दाभोलकरांकडून संतविचारांचा प्रसार

$
0
0
‘संत ज्ञानेश्वरांनी ७०० वर्षांपूर्वी मांडलेला विवेकाचा विचारच डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी आपल्या कार्यातून पुढे नेला. कोणत्याही धर्माच्या, जातीच्या, व्यक्तीच्या विरोधात नसलेल्या डॉ. दाभोलकरांनी संतविचारांचीच चळवळ पुढे नेली,’ असा सूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे गुरुवारी आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमात व्यक्त झाला.

‘भामाआसखेड’च्या पाण्यासाठी १९ कोटी रुपये मंजूर

$
0
0
भामाआसखेड धरणातील सुमारे अडीच टीएमसी पाणी पुणे शहराला देण्याच्या योजनेला अखेर निधीचा टेकू मिळाला असून राज्य सरकारने १९ कोटी ८४ लाख रुपयांचा पहिला हप्ता महापालिकेला वितरीत केला आहे. मात्र हा निधी वितरीत करताना दर तीन महिन्यांनी योजनेची गती व खर्चाचा आढावा घेतला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images