Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मध्यवर्ती भागातील जमीन नागरी सुविधांसाठी वापरणार

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाने खान्या मारुती चौकाजवळील भाडेतत्त्वावर दिलेल्या जागेपैकी मोकळी जमीन बोर्ड सुमारे २२ वर्षांनी ताब्यात घेणार असून, त्या जागेचा वापर शाळा आणि कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.

भाजीमंडईची बिल्डिंग वापराविना

$
0
0
सिंहगड रोडवर भाजी मंडई करण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी पु. ल. देशपांडे उद्यानासमोर नवश्या मारुती मंदिरामागे महापालिकेने मोठी इमारत बांधली. इमारत पूर्ण होऊन दोन वर्षे झाली, तरी तिचा अद्याप वापर सुरू झालेला नाही.

कबड्डीचे मोफत प्रशिक्षण तीस वर्षांपासून अव्याहत

$
0
0
वाघोली ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील स्थानिक मुलांना कबड्डीचे प्रशिक्षण कोणतेही फी न भरता मिळत आहे. कोणाकडूनही मदत न घेता मागील तीस वर्षांपासून हा उपक्रम राजेंद्र पायगुडे चालवित आहे.

शिवनेरीची यशोगाथा पोहोचविणारी संस्कारगाथा

$
0
0
किल्ले शिवनेरीवर राज्याच्या विविध भागांतून शालेय सहली येतात. मात्र, किल्ल्यावर गाइडची सुविधा उपलब्ध नसल्याने शिवनेरीचा माहितीपट विद्यार्थ्यांना मोफत दाखविण्याचा उपक्रम येथील विद्यासंस्कार प्रतिष्ठानकडून गेल्या सहा वर्षांपासून जुन्नरमध्ये सुरू आहे.

किल्ल्यांच्या विकासाचा सरकारकडून आराखडा

$
0
0
‘गड किल्ले हे राज्याचे प्रेरणास्त्रोत आहेत. हे ध्यानात घेऊनच किल्ले शिवनेरीचे संवर्धन केले जात आहे. याच धर्तीवर राज्यातील इतर किल्ल्यांचेही संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने किल्ले संवर्धन व विकास आराखडा करण्यात येत आहे,’ असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी सांगितले.

भीमा नदी अतिक्रमणाने गुदमरली

$
0
0
भीमा नदीचे पात्र भीमाशंकर येथे उगमस्थानी अतिशय अरुंद आहे. त्यातच मंदिर परिसरात नदीपात्रात दोन्ही बाजूंना अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या अवैध बांधकामामुळे ती आणखी गुदमरली आहे. मंदिराच्या पाठीमागे भीमेचे पात्र झाकून त्यावरही अवैध बांधकामे करण्यात आली आहेत.

रौप्यमहोत्सवी ‘चंद्रसूर्य’

$
0
0
पुणे शहरात जवळपास वर्षभर नाट्यस्पर्धा सुरू असतात. त्यात नाटके दीर्घांक, एकांकिका, एकपात्री अशा अनेक स्पर्धांचा समावेश असतो. यात एका स्पर्धेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ती स्पर्धा म्हणजे वसंतदादा पाटील स्मृती करंडक होय. माध्यमिक शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेतली जाते.

प्रलंबित नोंदीसाठी सर्कल ऑफिसला नोटीस

$
0
0
सातबारा आणि फेरफारच्या नोंदी प्रलंबित ठेवल्याबद्दल जिल्हा प्रशासनाने एका सर्कल ऑफिसरवर (मंडलाधिकारी) कारवाई केली आहे. हवेलीतील एका सर्कलला याबाबत ‘शो कॉज’ नोटीस बजाविण्यात आली आहे. गेल्या काही काळात प्रथमच अशी कारवाई करण्यात आली आहे.

महापौरांचीही जागृती मोहीम

$
0
0
शहरातील कचराकोंडी दूर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच, शहराच्या प्रथम नागरिक महापौर चंचला कोद्रे यांनीही विविध भागांत जनजागृती फेऱ्यांद्वारे नागरिकांच्या प्रबोधन मोहिमेस सुरुवात केली आहे.

मतदार यादीत हवीत साडेसात लाख छायाचित्रे

$
0
0
लोकसभा निवडणुकीपूर्वी पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमधील तब्बल साडेसात लाख मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत समाविष्ट करण्याचे आव्हान निवडणूक कर्मचाऱ्यांना पेलावे लागणार आहे.

‘रोडमॅप’… स्वतंत्र महापालिकेचा

$
0
0
नव्याने वसलेल्या पुण्याचा वेध घेत पूर्व पुण्यासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्यासंदर्भात जनतेकडून मोठ्या प्रमाणात मागणी होती आहे. त्यासाठी सर्वपक्षीय ठरावदेखील करण्यात आले. पूर्व पुण्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी पुणे महापालिकेत सहभागी होण्याऐवजी स्वतंत्र महापालिका स्थापन करून त्यात स्थान देण्याची मागणी केली आहे.

पानविक्रेत्यांनी उचलला राजकीय दबावाचा ‘विडा’

$
0
0
गप्पागोष्टी करण्यासाठीचा मस्त कट्टा असलेल्या पानाच्या टपऱ्यांवर आता राजकीय चर्चांना जोर येणार आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या पानविक्रेत्यांना संघटित करून ‘महाराष्ट्र पान व्यापारी संघ’ या राज्यव्यापी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे

मुळा-मुठेच्या काठी, गांजाची शेती!

$
0
0
मुंढवा परिसरातील झेन्सर कंपनीच्या दक्षिणेकडे मुळा-मुठा नदीपात्रालगत सुमारे अडीच ते तीन एकर जमिनीवर गांजाचे भरघोस पीक घेतले असल्याचे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत उघड झाले आहे.

‘एसटी’च्या रात्रसेवेचा प्रवासी टक्का वाढला

$
0
0
रात्री सोडण्यात येणाऱ्या बसेसचे भाडे १५ टक्यांनी कमी करण्याच्या निर्णयाचा एसटीला फायदा झाला आहे. रातराणी बसेसचे भाडे कमी केल्यामुळे पुणे विभागातील एसटीच्या प्रवाशांच्या संख्येत पाच टक्यांनी वाढ झाली आहे.

कर्नाटकमध्ये भाषेचे राजकारण होते

$
0
0
‘मराठी आणि कन्नड साहित्यामध्ये आजवर मोठी देवाणघेवाण झाली आहे. भाषा समृद्धीसाठी पुण्यात कन्नड भाषक शाळा आहेत, तशाच कर्नाटकातही मराठी शाळा असल्या पाहिजेत. मात्र, कर्नाटकामध्ये भाषेचे राजकारण मोठ्या प्रमाणावर होते,’ अशी खंत साहित्य अकादमी पारितोषिक विजेत्या प्रख्यात कन्नड लेखिका वैदेही यांनी व्यक्त केली.

अखंड वीजेपुरवठ्यासाठी ब्रेकडाउन व्हॅन

$
0
0
औद्योगिक वसाहतींमधील वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी हिंजवडी, चाकण, भोसरी आणि आकुर्डी एमआयडीसी परिसरात महावितरणने ब्रेकडाउन अटेंडिंग व्हॅनची २४ सेवा नुकतीच सुरू करण्यात आली आहे.

‘गोखले’ अनुभवायला मिळणे दुर्मिळ

$
0
0
‘नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांचे राजकारण हे समाजाभिमुख आणि मानवतावादी उदारमतवादाने प्रेरित होते. राजकारणाच्या आध्यात्मिकीकरणावर त्यांनी भर दिला होता. मात्र, देशातील राजकारण्यांमध्ये आता दुर्दैवाने असे ‘गोखले’ अनुभवायलाच मिळत नाहीत,’ अशी खंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी बुधवारी येथे व्यक्त केली.

गोपाळ कृष्ण गोखले यांच्या स्मृतींना वंदन

$
0
0
नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त शहरात त्यांना अभिवादन करण्यात आले. पुणे शहर जिल्हा कॉँग्रेस कमिटीतर्फे शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड यांनी नामदार गोखले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. उत्तम भूमकर, सचिन आडेकर, राजेंद्र भुतडा, यासीन शेख या वेळी उपस्थित होते.

तुळशीबागेतील वस्तू आता मॉलमध्येही

$
0
0
लक्ष्मी रोड आणि तुळशीबागेतील छोटे व्यावसायिक आणि पथारीवाल्यांना एअर कंडिशन दुकानांमध्ये व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे. सिफस मॅक्स रिटेल ही कंपनी लक्ष्मी रोडवरील फॅशननेबल वस्तूंच्या विक्रेत्यांना मॉलमध्ये नेण्याची अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणत असून, या प्रकल्पासाठी न्यूयॉर्कमधील ‘टाइम्स स्वेअर’चे मॉडेल डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.

रात्रीच्या अपघातांमध्ये वाढ

$
0
0
झूप-झाप, झूम....करीत रात्रीच्या वेळी रॅश ड्रायव्हिंग, नो-एंट्रीतून करण्यात येत असलेला सर्रास प्रवास नागरिकांच्या जिवावर बेतला आहे. गेल्यावर्षी रात्री आठनंतर सकाळी सहापर्यंत सुमारे अडीचशे अपघात झाले आहेत. त्यातील १५२ अपघातांमध्ये पावणे दोनशे नागरिकांचा बळी गेला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images