Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘झेडपी’च्या सदस्यांचीही टोलमाफीची मागणी

$
0
0
सर्वसामान्यांना होत असलेला टोलचा जाच आता जिल्हा परिषदेच्या सदस्यांनाही होऊ लागला आहे. आपल्यालाही टोलमाफी द्यावी, अशी आग्रही मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत केली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी संबंधितांशी याबाबत चर्चा करण्याचे आश्वासनही सदस्यांना देऊन टाकले.

पूर्व पुण्यात उद्या पाणीपुरवठा बंद

$
0
0
पालिकेच्या बंडगार्डन केंद्राअंतर्गत येणाऱ्या ठाकरसी टाकीवरील एक्स्प्रेस लाइनच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (२१ फेब्रुवारी) येरवडा, विमाननगर, लोहगाव परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असेही पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

रस्ते खोदाईविरोधात प्रशासनावर हल्लाबोल

$
0
0
सीसीटीव्ही कॅमेरा केबल टाकण्याच्या नावाखाली शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या रस्ते खोदाईचे जोरदार पडसाद मंगळवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले.

स्थायी समितीवर आठ सदस्यांची नियुक्ती

$
0
0
महापालिकेच्या स्थायी समितीच्या नवीन आठ सदस्यांची नियुक्ती मंगळवारी करण्यात आली. स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत येत्या २८ फेब्रुवारीला संपत असल्याने मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नवीन सदस्यांच्या नावांची घोषणा महापौर चंचला कोद्रे यांनी केली.

हंजरच्या मदतीला पालिका

$
0
0
शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या उरुळी देवाची येथील हंजर प्रकल्पाच्या मदतीला महापालिका धावली असून या कंपनीला तोट्यात‌ून बाहेर काढण्यासाठी ८० लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

पालिकेला मिळणार बांधकाम मंजुरीतून भरघोस महसूल

$
0
0
शहराच्या हद्दीलगत सुरू असलेल्या बांधकामांसह शहरामध्येही मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असल्याने नव्या पुण्याच्या नव्या पालिकेला बांधकाम मंजुरीतून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळण्याची शक्यता आहे. सध्या पुणे पालिकेत होणाऱ्या एकूण बांधकामांपैकी सुमारे १५ टक्के बांधकामे हडपसरसह इतर भागांमध्ये होत आहेत.

डीएसकेंचे आरोप हास्यास्पद

$
0
0
लोकसभेसाठी ज्या जागांवर भ्रष्ट नेते उभे राहणार आहेत, अशा जागा आपच्या नेत्यांनीच लढवाव्यात, असा निर्णय पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनीच जाहीर केला होता. त्यानुसार पुण्यात सुरेश कलमाडींविरोधात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुभाष वारे यांना उमेदवारी देण्यात आल्याचे आपच्या गोटातून सांगण्यात आले.

‘आप’ म्हणजे नाटक कंपनी

$
0
0
प्रामाणिक आणि पारदर्शी कारभाराची ग्वाही देणारा आम आदमी पक्ष इतरांपेक्षा वेगळा नाही. या पक्षाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. ‘आप’ म्हणजे नाटक कंपनी असल्याची खरमरीत टीका लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी केली.

शिरूरचा बिगुल वाजला

$
0
0
शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबाबत चाचपणी चालू असताना शिवसेनेने मात्र प्रचाराचा बिगुल वाजविला आहे. खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या ‘संघर्ष’ अहवालाचे प्रकाशन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी (१९ फेब्रुवारी) झाले.

इच्छुकांच्या नजरा हायकमांडकडे

$
0
0
सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेचा ठरविलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर होण्यासाठी निवडप्रक्रियेच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत वाट पहावी लागणार, अशी चिन्हे आहेत. पक्षांतर्गत वाद किंवा गटबाजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी हे धोरण आखल्याचे सांगण्यात येत आहे.

संजय दत्तला तिसऱ्यांदा पॅरोल

$
0
0
मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्तला पोलिसांच्या शिफारशीवरून तिसऱ्यांदा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता २१ मार्चपर्यंत तो पॅरोल रजेवर असणार आहे. या वर्षातील ही त्याची शेवटची रजा असणार आहे.

पुण्यासाठी वेळ कधी देणार?

$
0
0
शहराचे गेले अनेक महिने आणि वर्ष प्रलंबित राहिलेले प्रश्न आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुटावेत, यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रयत्न करणार तरी कधी, असा सवाल पुणेकर विचारत आहेत.

स्वप्न मोनोरेलचे

$
0
0
नर्सिंग कॉलेज, मोनोरेल, उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर, रस्ते सफाईसाठी ट्रक माउंटेड रोड स्वीपर, अंधांसाठी कम्प्युटर प्रशिक्षण, तर अपंगांसाठी व्हील-चेअर सुविधा, कामगारांसाठी कल्याण भवन आदी विविध योजनांची स्वप्ने पुणेकरांना दाखविणारा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी मंगळवारी सादर केला.

शिरुरमध्ये NCPकडून निकम

$
0
0
खासदार शिवाजीराव आढळराव- पाटील यांच्यासारख्या तगड्या उमेदवारांविरोधात शिरुर लोकसभा मतदारसंघात लढण्यास नाखूश असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर आपल्या उमेदवाराची निवड जाहीरच केली आहे.

'दाभोलकर कुटुंबीयांनी 'पद्मश्री' स्वीकारू नये'

$
0
0
‘डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी जोपर्यंत सापडत नाहीत, त्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत दाभोलकर कुटुंबीयांनी ‘पद्मश्री’ पुरस्कार स्वीकारू नये,’ असे भावनात्मक आवाहन ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी केले.

‘दिवसेंदिवस अस्वस्थता वाढतेय’

$
0
0
‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे कसून चौकशी करून त्यांच्या निष्कर्षापर्यंत पोलिसांनी पोहोचायला हवे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येला सहा महिने पूर्ण झाले असतानाच अद्यापी त्यांचे मारेकरी सापडत नसल्याने दिवसेंदिवस अस्वस्थता वाढत आहे,’ अशा शब्दांत डॉ. हमीद दाभोलकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

महापालिकेचा… आठवावा प्रताप!

$
0
0
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणाऱ्या पुणे महापालिकेने शिवजयंती मिरवणुकीसाठी उभारलेल्या स्वागत मंडपा‌तील फ्लेक्सवर शिवाजी महाराजांऐवजी संभाजी महाराजांचा फोटो लावण्याचा प्रताप बुधवारी केला.

महावितरणला वीजपुरवठा कंपन्यांचा ‘शॉक’

$
0
0
महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळातर्फे (महावितरण) वीजपुरवठा करण्यासाठी करार करण्यात आलेल्या कंपन्यांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

कमर्शियल दरानेच प्रॉपर्टी टॅक्स

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील निवासी जागेमध्ये व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना कमर्शिअल दरानेच प्रॉपर्टी टॅक्स आकारणे आणि ‘इ​न्स्टिट्यूशनल झोन’मध्ये बांधकामे करण्यास परवानगी देणे हे महत्त्वाचे निर्णय बोर्डाने घेतले आहेत.

विकासाकामांना निधीचा अडसर

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाने हाती घेतलेली कामे निधीअभावी रखडली असताना, नव्याने करोडो रुपयांची विकासकामे करण्याचे नियोजन बोर्डाने केले आहे. त्यामध्ये अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यापासून समाज मंदिरे, सभागृहे, व्यायामशाळा, अभ्यासिका बांधण्यापर्यंतची कामे आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images