Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मराठी माणसाला ‘राष्ट्रवादी’ने डावलले

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना पाठिंबा काढून घेण्याची धमकी देऊन विजय कांबळे यांना मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावर येऊ दिले नाही. राकेश मारिया यांच्याकडे कर्तृत्व आहे; पण स्वकर्तृत्वावर मोठ्या झालेल्या मराठी माणसाला डावलले गेले.

राम नदी प्रदूषणमुक्तीसाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार

$
0
0
समाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून येथील ‘सागरमित्र संस्थे’च्या विद्यार्थ्यांनी राम नदी स्वच्छ करण्याचा वसा घेतला आहे. रामनदीच्या पात्रात पडणारे सुमारे सातशे किलो प्लास्टिक सागरमित्रांनी संकलित करून पाषाण तलावासह एकूण तीन तलाव प्रदूषणापासून वाचविण्याचा संकल्प सोडला आहे.

भोसरीतील शिवसृष्टीचे आज उद्घाटन

$
0
0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित शिवसृष्टी भोसरीतील लांडेवाडी चौकात उभारण्यात आली असून, या प्रकल्पाचे उद् घाटन शिवजयंतीच्या मुहूर्तावर आज, बुधवारी (१९ फेब्रुवारी) होत आहे.

श्रीकर परदेशीं पाठोपाठ शहाजी उमाप यांची बदली

$
0
0
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी यांनी अनधिकृत बांधकामांच्या विरोधात घेतलेल्या धोरणांमुळेच त्यांची मुदतपूर्व बदली करण्यात आली. हे प्रकरण ताजे असतानाच अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करणारे पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांचीही मुदतपूर्व बदली करण्यात आल्याची चर्चा पोलिस वर्तुळामध्ये आहे.

आर्थिक योजनांची ‘विशाल’ जंत्री

$
0
0
वास्तववादी बजेट मांडण्याच्या स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देऊनही सलग दुसऱ्या वर्षी महापालिकेच्या बजेटने चार हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नव्या योजना जाहीर करून स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी ४ हजार १५० कोटी रुपयांचे बजेट मंगळवारी सर्वसाधारण सभेपुढे मांडले.

फुगविलेल्या आकड्यांचा डोलारा सांभाळणार कसा?

$
0
0
पालिका आयुक्तांनी मांडलेल्या बजेटचा आकड्यात विविध विकासकामांचा समावेश करून बजेटचा फुगवटा निर्माण करण्याचे काम सातत्याने होत आहे. गेल्या काही वर्षांपासून पालिकेचे वार्षिक उत्पन्न तीन हजार कोटींच्या आसपासच राहिले असतानाही, बजेटचे आकडे मात्र फुगतच आहेत.

लक्षवेधी तरतुदी...

$
0
0
शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचा उपयोग करून घेत पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘टूरिस्ट हब’ ही संकल्पना मांडण्यात आली आहे. त्याअंतर्गत, हेरिटेज पार्क, हेरिटेज व्हिलेज, आर्ट अँड क्राफ्ट सेंटर, नानावाडा येथे फ्रीडम फायटर म्युझियम, मिनी बस टूर, कलाग्राम अशा विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

महसूल अधिकाऱ्यांच्या आता घाऊक बदल्या

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील ३७ तहसीलदार व १३ उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे शहरच्या तहसीलदार मीनल मिरजकर, मावळचे देवदत्त ठोंबरे, मुळशीचे हेमंत निकम आणि उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, किशोर पवार, शिरीष यादव आदींचा समावेश आहे.

एसटीच्या पॅकेज टूर लोकप्रिय

$
0
0
प्रवाशांना पर्यटनाची गोडी लावण्यासाठी ‘एसटी’तर्फे सुरू करण्यात आलेल्या पॅकेज टूर्सला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या टूर्सच्या माध्यमातून गेल्या पाच महिन्यात ‘एसटी’च्या तिजोरीत १४ लाख रुपये जमा झाले आहेत.

गायीचे दूध महागले

$
0
0
गायीच्या दूधाच्या खरेदी दरामध्ये दोन रुपयांनी आणि विक्रीमध्ये तीन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय राज्यातील खाजगी आणि सहकारी दूध उत्पादकांनी घेतला आहे. येत्या २४ फेब्रुवारीपासून नवीन दरवाढ लागू करण्यात येणार आहे.

सोसायट्या कचरा प्रक्रियेकडे

$
0
0
सोसायटीत निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या नागरिकांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलत देण्याच्या महापालिकेच्या योजनेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

‘हेरिटेज वॉक’ला राष्ट्रीय पुरस्कार

$
0
0
पुणे शहराच्या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिकेने जनवाणीच्या सहकार्याने सुरू केलेल्या ‘हेरिटेज वॉक’ उपक्रमाला मंगळवारी राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

संस्कृत नाट्य स्पर्धेत पुणे आहे उणे

$
0
0
सांस्कृतिक राजधानी, असे बिरूद मोठ्या अभिमानाने मिरवणारे पुणे संस्कृत नाट्य स्पर्धेतून उणे झाले आहे. राज्य सरकारच्या संस्कृत हौशी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये यंदा पुण्याच्या एकाही नाट्य संघाने सहभाग घेतला नसल्याचे स्पष्ट झाले.

तेंडुलकरच्या तिकिटांनी टपाल खाते करोडपती

$
0
0
''भारतरत्न'' सचिन तेंडुलकर याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी क्रिकेटप्रेमींचे त्याच्यावरील प्रेम कायम आहे. कारण टपाल खात्याने तेंडुलकरवर काढलेल्या तिकिटाला क्रिकेटरसिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने दोन महिन्यांमध्ये तिकीट विक्रीत कोटीचा टप्पा गाठला गेला आहे.

आयत्या वेळचा घोळ टाळा

$
0
0
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्यभरात गुरुवारपासून घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षांची तयारी पूर्ण झाल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली. मात्र, हॉल तिकिटांपासून बैठक व्यवस्थेचा आयत्या वेळेपर्यंत होणारा घोळ टाळणारा कारभार करावा, अशी विद्यार्थ्यांची आजही अपेक्षा आहे.

‘आयटी’च्या ज्ञानाची होणार चाचणी

$
0
0
मोबाइल, लॅपटॉप, आयपॅडसारखी गॅजेट्स हाताळत सोशल नेटवर्किंगसह कायम ‘अपडेट’ राहणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना आपले माहिती तंत्रज्ञाना(आयटी) संदर्भातील ज्ञान सिद्ध करण्याची संधी लवकरच मिळणार आहे.

बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार

$
0
0
राज्य सरकारने ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांच्या मागण्यांना मान्यता दिल्याचा निर्णय सरकारने जाहीर न केल्याने शिक्षकांनी आपला स्थगित केलेला बहिष्कार मंगळवारी पुन्हा सुरू केला.

शिवरायांच्या व्यवस्थापन शैलीवर पीएचडी

$
0
0
शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि व्यवस्थापन कौशल्याचे अनेक पैलू आजपर्यंत समाजासमोर आलेले नाहीत. आजच्या सामाजिक परिस्थितीतही शिवाजी महाराजांनी सांगितलेली व्यवस्थापन कौशल्ये कशी सुसंगत आहेत, हे सिद्ध करणारे संशोधन पुण्यातील अजित आपटे यांनी केले आहे.

वीजग्राहक झाले टेक्नोसॅव्ही

$
0
0
टेक्नोसॅव्ही पुणेकरांनी गेल्या महिन्याभरात तब्बल ४३ कोटी रुपयांची वीजबिले ऑनलाइन भरली आहेत. जानेवारी महिन्यात पुणे परिमंडळातील तब्बल तीन लाख वीजग्राहकांनी ऑनलाइन वीजबिले भरल्याचे महावितरणने म्हटले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी वादाचे झेडपीत पडसाद

$
0
0
इंदापुरातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या वादातून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी गोंधळ झाला. अखेर या गोंधळातच सभेच कामकाज उरकण्यात आले. गेल्या आठवड्यात दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रस्त्यावर झालेल्या हमरीतुमरीचे पडसाद सभेतही उमटले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images