Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

राजीव गांधी हॉस्पिटल बंदच!

$
0
0
येरवड्यातील स्वर्गीय राजीव गांधी हॉस्पिटलचे मुख्य प्रवेशद्वाराचे शटर गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे रुग्णांना छोट्याशा दारातून प्रवेश करताना अडचणीचे होत आहे. १८० खाटांची क्षमता असलेले येरवड्यातील हे सर्वात मोठे महापालिकेचे हॉस्पिटल आहे.

शासकीय रुग्णालयाची दूरवस्था

$
0
0
बारामती आणि परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयाला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवून दिला. या निधीतून या रुग्णालयाच्या इमारतीचे विस्तारीकरण करून अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

द्राक्षांवर वटवाघळांचा डल्ला

$
0
0
वड अथवा तत्सम झाडांची फळे खायला मिळणे दुरापस्त झाल्याने वटवाघळांनी आता द्राक्षपिकांवर मोर्चा वळवला आहे. ऐन काढणीतल्या द्राक्षांचे घड वटवाघळे फस्त करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

सासवडला १५ कोटी

$
0
0
सासवड नगरपरिषदेचा कोणतीही करवाढ नसलेला ४१ कोटी ४९ लाख १९,४१४ चा अर्थसंकल्प मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी सादर केला. नगराध्यक्ष नीलिमा चौखंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.

सांगवीत घरफोडी

$
0
0
दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून घरातील पावणेदोन लाखाचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना नवी सांगवीमध्ये उघडकीस आली. मनीष विजयकुमार चिंचोलीकर यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचोलीकर (वय ३८) हे नवी सांगवीतील समर्थनगर भागातील गौरव रजनी राहतात.

तिरुपती भक्तीवर तरुणाईचे ‘क्लिक’

$
0
0
मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात तसेच स्वप्न प्रत्यक्षात अवतरले म्हणून कृतज्ज्ञता व्यक्त करण्यासाठी तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पुणेकरांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. तिरूमला तिरुपती देवस्थान ‘ई - दर्शन काउंटर’ वर वर्षभरात एक लाख भाविकांची नोंद होत असे. मात्र, यंदा केंद्राने सहा महिन्यांत एक लाख नोंदणीचा टप्पा पार केला आहे.

छत्रपतींच्या जगभरातील छबी पुण्यात

$
0
0
सोळाव्या आणि सतराव्या शतकापासून आजपर्यंत जगभरात ज्या मराठी नावाची दखल घेतली गेली, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराज नेमके कसे दिसायचे, हे आपल्याला इतिहासानंच सांगितलं असलं, तरी विविध कालखंडात जगभरातील चित्रकारांना या व्यक्तिमत्त्वाची दखल घेतली आहे.

‘रसिया’च्या आर्ततेतील मोहक संध्या

$
0
0
व्हायोलिनचे हृदयाला साद घालणारे भावपूर्ण सूर, हार्मोनियमवरील सुरेल ‘श्री’ राग आणि गायनातून रसिकांवर मोहिनी घालणारा राग मारू बिहाग... अशा भारावलेल्या वातावरणात रसिकांची संध्याकाळ अविस्मरणीय, श्रवणीय ठरली. ही मैफील मनात चिरकाल टिकून राहाणारी ठरली.

वेदांतचं ‘साई’दर्शन

$
0
0
वयामुळे किंवा इतर काही कारणांमुळे जर एखाद्याला शिर्डीला जाता येत नसेल, तर त्यांनी काय करावं, असा प्रश्न पडला स. प. महाविद्यालयाच्या वेदांत गोयलला. मग त्यानंच उपाय शोधला आणि सुरू केलं एक संकेतस्थळ. साईबाबांचं दर्शन घडवणारं आणि तिथल्या व्यवस्थेसंदर्भात मार्गदर्शन करणारं.

संस्कृत नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी शुक्रवारी

$
0
0
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २१ आणि २२ फेब्रुवारीला ५३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी संस्कृत नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेचे उद्घाटन २१ फेब्रुवारीला भरत नाट्य मंदिर इथं सकाळी १० वाजता होणार आहे.

‘स्वरसाज’तर्फे हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम

$
0
0
सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजविलेल्या मोहम्मद रफी, आशा भोसले, किशोर कुमार, लता मंगेशकर, मन्ना डे, गीता दत्त, सुरेश वाडकर, शमशाद बेगम यांनी गायलेली निवडक गीते पुन्हा ऐकण्याची संधी ‘प्यार हुआ, इकरार हुआ’ या कार्यक्रमाद्वारे रसिकांना उपलब्ध झाली आहे. ‘स्वरसाज’तर्फे येत्या शनिवारी (दि. २२) या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

वाहिली कथकची अथक गंगा

$
0
0
९५ वर्षीय दस्तुरखुद्द सितारादेवी यांनी ‘ऐसे पनघट पर नैना लडे श्याम से’ ही पारंपरिक रचना सादर करत रसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. बनारस घराण्याच्या खुबी त्यांच्या केवळ हातवारे आणि हावभावांतून उलगडत गेल्या.

आमच्या जीवाला धोकाः नागोरी

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांनी आपल्या​ जिवाला येरवडा जेलमध्ये धोका असून, ओळख परेडसाठी ठाणे जेलमधून येरवडा जेलमध्ये हलविण्यात येऊ नये, असा अर्ज कोर्टात केला.

निरोप... शाळेचा

$
0
0
आजच्या पिढीची भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असेल, यापू्र्वीच्या विद्यार्थ्यांनी सेंड ऑफच्या दिवशी एकमेकाला रडत-रडत निरोप दिला असेल आणि आता या मुलांच्या या भावना, या सर्वांमागे नक्कीच समान सूत्र आहे. सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. फक्त व्यक्त करण्याच्या पद्धती, साधनं वेगळी! न्यू इग्लिश स्कूल, रमणबाग शाळेतही दहावीच्या मुलांना ‘सेंड ऑफ’ देण्यात आला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मनोगत त्यांच्या शब्दांत...

गरजूंना ‘गूंज’ करणार मदत

$
0
0
कपडे, चपला-बूट, खेळणी, फर्निचर, अशा गोष्टी जुन्या झाल्यावर आपण त्या कचऱ्यात टाकून देतो. पण, याच गोष्टी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवता आल्या तर...याच भावनेतून पुण्यातील काही युवक-युवतींनी एकत्र येत मोठ्या प्रमाणावर टाकाऊ साहित्य गोळा केले असून, लवकरच ते गरजूंपर्यंत पोहोचविले जाणार आहे.

प्रबोधनकार ठाकरे साहित्य संमेलनाचे आयोजन

$
0
0
बहुजन विकास साहित्य परिषदेतर्फे प्रबोधनकार ठाकरे साहित्य संमेलनाचे आयोजन २३ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. या संमेलनाचे उदघाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहराज्यमंत्री गजानन किर्तीकर यांच्या हस्ते होणार आहे.

सर्वसामान्यांनी राजकारणात जाण्याचा प्रश्नच नाही

$
0
0
‘आमदार-खासदार होण्यासाठी करोडो रुपये लागत असतील ,तर साहित्यिक, कवी, सामान्य माणसांनी तिथे जाण्याचा प्रश्न उरतो का,’ असा सवाल करीत ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी राजकारणातील वास्तवावर प्रकाश टाकला.

‘बायोइन्फर्मेटिक्स’साठी स्वतंत्र सुपर कम्प्युटर

$
0
0
‘सध्या बायोलॉजी आणि पर्यायाने बायोइन्फर्मेटिक्सला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच नव्याने तयार करण्यात येत असलेल्या ‘राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन’मध्ये बायोइन्फोर्मेटिक्सवर भर देण्यात येणार आहे.

केंद्राचे सुपर कम्प्युटिंग मिशन

$
0
0
देशातील विविध क्षेत्रातील संशोधनाला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी ‘नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन’ राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत देशभर सुपर कम्प्युटरचे जाळे निर्माण करण्यात येईल. त्याचबरोबर अॅप्लिकेशन बेस्ड रिसर्च, हाय पॉवर कम्प्युटिंगमधील संशोधन आणि उपकरणांची निर्मिती; तसेच हाय पॉवर कम्प्युटिंगचा वापर करण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळाच्या निर्मितीवर भर दिला जाणार आहे.

मुंढव्यापर्यंत भिडली महापालिकेची हद्द

$
0
0
गेल्या दशकामध्ये पुण्याचा मोठा विस्तार झाला आहे. काही प्रमाणातील नियोजित विकासाबरोबरच जनतेच्या रेट्यामुळे शहराच्या सर्व बाजूंना उपनगरे वसली आहेत. काय आहे तेथील पायाभूत सुविधांची स्थिती? तेथील नागरिकांच्या महापालिका प्रशासनाकडून अपेक्षा काय आहेत? विकेंद्रित कारभार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या क्षेत्रीय कार्यालयांची अवस्था काय आहे, अशा परिस्थितीचा वेध घेणारे हे साप्ताहिक सदर...
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images