Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

लिंगनिदान : डॉक्टरांचे निलंबन

$
0
0
बेकायदा लिंगनिदान करणे गुन्हा असतानाही चुकीची प्रॅक्टिस करणाऱ्या राज्यातील दोन डॉक्टरांवर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने ‘गर्भलिंग निदान व प्रसूतीपूर्व चाचणी’ (पीसीपीएनडीटी) कायद्यान्वये निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच, पुण्यासह चार डॉक्टरांना ताकीदही दिली आहे.

आदिवासी तरुणांसाठी मानधनवाढीचा प्रस्ताव

$
0
0
आदिवासींच्या परंपरागत कलाकौशल्यांचे संवर्धन करण्यासाठी आदिवासी प्रशिक्षण केंद्रातर्फे विशेष कार्यशाळा आयोजित केल्या जात असल्या, तरी तुटपुंज्या मानधनामुळे आदिवासींच्या मुलांनी केंद्राकडे पाठ फिरवली आहे. या मुलांना प्रशिक्षणाकडे आकर्षित करण्यासाठी अद्ययावत प्रशिक्षण आणि मानधनवाढीचा नवीन प्रस्ताव केंद्राने तयार केला आहे.

पुण्याहून सुटणार ३ नव्या गाड्या

$
0
0
रेल्वेच्या बुधवारी सादर झालेल्या अंतरिम बजेटमध्ये पुण्यातून तीन नवीन गाड्या सोडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय दक्षिणेकडून मुंबईला जाणाऱ्या तीन गाड्यांना पुण्यात थांबा मिळणार आहे. पुणे ते लखनऊ आणि गोरखपूर ते पुणे दरम्यान आठवड्यातून एकदा गाडी सोडण्यात येणार आहे.

साहित्य संमेलनासाठी १० निमंत्रणे

$
0
0
आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्य महामंडळाकडे दहा निमंत्रणे आली आहेत. त्यात उस्मानाबाद, ठाणे, सातारा, कल्याण, जळगाव यांच्यासह राज्याबाहेरून पंजाब, बडोदा शाखेनेही संमेलन आयोजित करण्याची तयारी दर्शवली आहे.

‘भांडारकर’मध्ये साकारणार अद्ययावत संग्रहालय

$
0
0
भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतील प्रेस बिल्डिंगचे अद्ययावत संग्रहालयामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. संस्थेने अनेक वर्षांपासून जतन करून ठेवलेल्या विविध विषयांवरील हस्तलिखितांचा ऐतिहासिक आणि दुर्मिळ ठेवा या संग्रहालयामध्ये ठेवला जाणार असून, या संग्रहालयासह संस्थेच्या वेबसाइटवर ग्राफिक इफेक्टसारख्या तंत्रज्ञानाचा वापर असलेले व्हर्च्युअल संग्रहालयही करण्यात येणार आहे.

उत्पन्नात घट अन् विकासकामांवर मर्यादा

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०१४-१५ चे दोन हजार १०६ कोटी रुपये खर्चाचे बजेट नवनियुक्त आयुक्त राजीव जाधव यांनी स्थायी समितीला बुधवारी (१२ फेब्रुवारी) सादर केले. जेएनएनयूआरएमसह एकत्रित बजेट तीन हजार ४०० कोटी रुपयांचे आहे.

NCC फायरिंग : शिक्षकाचा अर्ज फेटाळला

$
0
0
सेनापती बापट रोडवरील राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) सरावादरम्यान १३ वर्षीय विद्यार्थ्याच्या डोक्यात गोळी लागून तो जखमी झाल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या सदोष मनुष्य वधाच्या आरोपातून वगळण्यात यावे म्हणून लॉयला स्कूलचे शिक्षक आमोद घाणेकर यांनी कोर्टात दाखल केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे.

IBM कंपनीकडून कर्मचारी कपात

$
0
0
खर्चात कपात करण्यासाठी ‘आयबीएम’ने कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली असून, त्यात पुणे आणि बेंगळुरू येथील केद्रांचा समावेश आहे. पुण्यात सुमारे शंभर कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मनमानी खोदाईवर पालिकेची नजर

$
0
0
विकासाची कामे करण्यासाठी खोदकामाची परवानगी न घेता बिनधास्तपणे खोदकाम सुरू करण्यात आल्याने शहरातील मध्यवर्ती भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मनमानी पद्धतीने केल्या जाणाऱ्या खोदकामाला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासन सरसावले आहे.

जीपचालकाला लुटणारे अटकेत

$
0
0
कात्रज परिसरातील संतोषनगर ते आगम मंदिर रोडने चाललेल्या सांगलीतील फोटोग्राफर आणि त्याच्या मित्राला लुटणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी रंगेहाथ पकडले. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला होता.

दंडवसुलीची ‘ठेकेदारी’ बंद

$
0
0
वाहतुकीचे नियम धुडकावून बेजबाबदारपणे गाडी चालविणाऱ्या वाहनचालकांकडून ठेकेदारामार्फत दंड आकारण्याची ‘आयटीएस’ योजना महपालिकेने गुंडाळली आहे. नियम तोडणाऱ्या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्याचे कोणतेही अधिकार पालिका आणि संबंधित ठेकेदार नसल्याचा साक्षात्कार झाल्याने ही योजना पोलिसांकडे देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

पुण्यात बसची तोडफोड

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनाला शहरात हिंसक वळण लागले. कोथरूड, लक्ष्मी रोड, टिळक रोड, हडपसर परिसरात पंधरा ‘पीएमपी’ बसवर दगडफेक करण्यात आली. हडपसर येथे बस पेटविण्याचा प्रयत्नही करण्यात आला. पोलिसांनी ‘मनसे’च्या १५३ कार्यकर्त्यांना अटक केली. तसेच, २०३ जणांना ताब्यात घेऊन सायंकाळी सोडून दिले. पुणे जिल्ह्यात लोणीकंद आणि लोणावळा परिसरात आंदोलन करण्यात आले.

पुणे मेट्रो अखेर ट्रॅकवर

$
0
0
सरकारच्या ट्रॅकवर गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या ‘पुणे मेट्रो’ला केंद्रीय नगरविकास खात्याने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. केंद्राच्या ‘ग्रीन सिग्नल’मुळे मेट्रोच्या प्रवासाला गती मिळण्याची चिन्हे आहेत. आता केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी बाकी राहिली आहे.

बालभारतीच्या संचालकांना घेराव

$
0
0
‘बालभारती’मधील विविध गैरव्यवहारांविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी ‘बालभारती’च्या संचालकांना घेराव घातला. गैरव्यवहारांबाबतच्या विविध आक्षेपांविषयी सात दिवसांच्या आत खुलासा न केल्यास, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला.

नवे मेडिकल कॉलेज यंदाही नाही

$
0
0
पंचवीस एकर जागेत पाचशे खाटांची क्षमता असलेले पुणे महापालिकेला आपले पहिले मेडिकल कॉलेज उभारण्याचे दिव्य स्वप्न येत्या वर्षात तरी पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. निधीची कमतरता असल्याने महापालिकेस या कामाची सुरुवात करता आली नाही.

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शिवसृष्टी

$
0
0
राज्य सरकारने ५० लाख रुपये खर्च करून साकारलेला शिवसृष्टी प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. हा प्रकल्प किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या शिवपंचायतन पंचलिंग मंदिराच्या पूर्वेकडे उभारण्यात आला आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनावरील दहा संदर्भशिल्पांचा समावेश त्यात असून, राजमाता जिजाऊ आणि बालशिवबाचे भव्य शिल्प शिवसृष्टीचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

प्रशासकीय बदल्यांनतरही वेबसाइट अपडेट नाही

$
0
0
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र या बदल्यांबाबत काही विभागांच्या वेबसाइटला अजूनही थांगपत्ता लागलेला दिसत नाही.

अक्षय मोडक याला ‘पुरंदर केसरी’

$
0
0
सासवड येथील भैरवनाथ कुस्ती स्टेडियमवर रंगलेला आणि हजारो चाहत्यांचे श्वास रोखणारा ‘पुरंदर केसरी’ हा मानाचा किताब अखेर हवेलीतील वडकीच्या अक्षय मोडक याने मिळविला. सासवडच्या अशोक भोंगळे याच्यावर एक लंघी डाव टाकून त्याने हा किताब जिंकला.

केंद्रीय प्रवेश पद्धतीची गरजच काय?

$
0
0
गेली अठरा वर्षे गरवारे कॉमर्स कॉलेजमध्ये कोणाच्याही मदतीशिवाय प्रथम वर्ष बीकॉमचे प्रवेश विनावादंग देण्यात येत आहेत. त्याचे फायदे लक्षा घेऊन अन्य कॉलेजांनीही हा प्रयोग आपल्याकडे राबविला. शिक्षण खात्याची आणि मॅनेजमेंटची मध्यस्थी चालवून न घेता अकरावीचे प्रयोग होण्याची गरज आहे.

विकासाच्या मार्गासाठी केसनंदला हवी स्वतंत्र महापालिका

$
0
0
पुणे महापालिकेत समावेश करून घेण्यास केसनंद ग्रामपंचायतीच्या नागरिकांचा विरोध आहे. नवीन महापालिकाच आमच्या मागण्यांना न्याय देऊ शकेल, असा त्यांचा विश्वास आहे; अन्यथा, नगरपरिषद स्थापन करून या भागाचा विकास करावा, अशी मागणी केली जात आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images