Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खडकीत दोन गटांत मारामारी

$
0
0
उधारीच्या पैशांवरून खडकी बाजारामध्ये दोन गटांत झालेल्या भांडणात तलवार आणि कोयत्यांचा वापर करण्यात आला. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या आहेत. रविवारी (९ फेब्रुवारी) रात्री साडेनऊ वाजता गवळीवाडा येथे ही भांडणे झाली.

फायनान्स कंपनीची फसवणूक

$
0
0
प्रॉपर्टीची मूळ कागदपत्रे गहाळ झाली असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र देऊन एका फायनान्स कंपनीकडून चार कोटी ८१ लाख ८६ हजार रुपयांचे कर्ज घेऊन कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

नागोरी, खंडेलवालची नार्को चाचणी नाही

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांची नार्को चाचणी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी म्हणून पोलिसांकडून करण्यात आलेला अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. आरोपींनी नार्को चाचणी करण्यास विरोध केल्यामुळे पोलिसांचा अर्ज फेटाळण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अतिक्रमणांना संरक्षण नाही

$
0
0
शहरातील बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत देऊन अतिक्रमणांवर कारवाई करण्याची ठाम भूमिका पालिकेचे नवनियुक्त आयुक्त विकास देशमुख यांनी मंगळवारी व्यक्त केली.

बाणेरला ओपन थिएटर

$
0
0
बाणेर, बालेवाडी येथील अॅमिनिटीच्या जागेत एक हजार आसन क्षमतेचा खुला रंगमंच (ओपन थिएटर) उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तब्बल ८७ लाख रुपये खर्च करून हे थिएटर उभारण्यात येणार असून, यासाठीचा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

सायकल रॅलीच्या स्वागतखर्चाला मान्यता नको

$
0
0
सायकल रॅलीच्या स्वागतासाठी पालिकेने खर्च करण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्तांनी विशेष अधिकार वापरून फेटाळून लावावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाच्या वतीने महापालिका आयुक्त विकास देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे.

कचरा प्रकल्पाबाबत अधिकाऱ्यांची नागरिकांशी चर्चा

$
0
0
हडपसर येथे औद्योगिक वसाहतीत अजिंक्य कचरा प्रकल्प येथे नागरिकांच्या समस्येबाबत आमदार बाबर, आणि महापौर,आणि महापालिकेचे अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. हडपसर येथे सगळ्या गावातली घाण आणून टाकली जात आहे, ती आम्ही कशी काय सहन करायची असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी या वेळी अधिकाऱ्यांना केला.

कचऱ्याची विल्हेवाट लावणार कशी?

$
0
0
शहरात दररोज फेकला जाणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने पुणे महापलिकेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. शहरात दररोज १४०० ते १५०० मेट्रिक टन कचरा गोळा होतो. शहरात जमा झालेला कचरा गोळा करून हा कचरा पंधरा सोळा वर्षापूर्वी उरळी देवाची येथे टाकण्यास पालिकेने सुरुवात केली.

बायपासवर सॉफ्टवेअर इंजिनीअरला लुटले

$
0
0
कारला दुचाकी आडवी लावून सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या कारचालकाला बेदम मारहाण करत त्याचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार सनसिटी सर्व्हिस रोडवर सोमवारी मध्यरात्री घडला.

नाना पेठेतील आगीत ८ घरे जळाली

$
0
0
नाना पेठेत मंगळवारी सकाळी लागलेल्या आगीत आठ घरे आणि तीन दुकाने जळून खाक झाली आहेत. या घटनेमध्ये एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. संत कबीर चौकातील एका चाळीजवळ ही आग लागली होती.

पालकांना मतदानासाठी मुले करणार ‘उपदेश’

$
0
0
मतदानाच्या दिवशी सुटी साजरी करीत ट्रीपला जाणाऱ्या आई-बाबांना आता त्यांची मुलेच मतदान करा, असे आवाहन करणार आहेत. ‘मतदानाच्या दिवशी मी मतदानाचे कर्तव्य बजावेन,’ असा संकल्प आता पुण्याच्या शाळांमधील विद्यार्थी आपल्या आई-वडिलांकडून करून घेणार आहेत.

‘कॅच देम यंग’ला खीळ बसणार

$
0
0
नागरी सेवा परीक्षांसाठी दोन प्रयत्न वाढविण्याच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) निर्णयामुळे ‘कॅच देम यंग’च्या प्रयत्नांना खीळ बसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वयाबरोबर कमी होत जाणारी लवचिकता प्रशासकीय कामांमध्ये अडथळा तर ठरणार नाही ना, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पंजाबच्या तरुणाची आत्महत्या

$
0
0
तरुणीच्या लग्नाच्या आग्रहाला कंटाळलेल्या तरुणाने मोबाइल चार्जरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्या केलेला तरुण हा एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नोकरी करीत होता, तर तरुणी ही हैदराबाद येथे नोकरीस आहे.

थंडी तूर्त पळाली?

$
0
0
गेले दोन-तीन दिवस कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेतल्यानंतर मंगळवारी पुण्यातील किमान तापमानात काहीशी वाढ झाली. मंगळवारी ७.८ अंश सेल्सियसपर्यंत उतरलेला पारा मंगळवारी ९.४ अंशांवर पोहोचला.

गाडीतळावर पीएमपी बसमध्ये आग

$
0
0
हडपसर गाडीतळ येथे कोंढवा मार्गावर जाण्यासाठी चालू अवस्थेत उभी असलेल्या एका बसच्या इंजिनमध्ये अचानक स्फोट होऊन आग लागली. मंगळवारी दुपारी झालेल्या या घटनेने या ठिकाणी एकच खळबळ उडाली. हँडब्रेक लावून ठेवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

नर्सेसचा २४ पासून संप

$
0
0
वारंवार होणारे हल्ले, मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांची भरती, वेतनातील फरक, आवश्यक साधनांचा पुरवठा आदी विविध प्रलंबित मागण्यांसाठी ‘महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फाउंडेशन’ने बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

कचरा समस्येवर तात्पुरता दिलासा

$
0
0
शहरात निर्माण झालेल्या कचऱ्याच्या समस्येवर तात्पुरता तोडगा काढण्यास पालिकेतील पदाधिकाऱ्यांना यश मिळाले आहे. मात्र, असे असले तरी ग्रामस्थांनी घातलेल्या अटीमुळे पुढील काही दिवस तरी शहरातील कचरा उचलला जाणार नाही. परिणामी पुढील आठ दिवस पुणेकरांना कचऱ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

‘केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा’

$
0
0
आम आदमी पक्षातर्फे दिल्लीत मांडण्यात आलेल्या जनलोकपाल विधेयकाला काँग्रेस विरोध करत असेल, तर अशा सरकारमध्ये राहण्यापेक्षा केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा, असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिला आहे.

टू व्हीलरची चोरी

$
0
0
सार्वजनिक वाहनतळातून टू व्हीलरची चोरी केल्याप्रकरणी एकाला सहा महिने २३ दिवस साधी कैद आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. कनकदंडे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

नर्सेसना मिळावे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

$
0
0
कोणत्याही झेंड्याखाली काम न करता स्वतंत्रपणे राज्यातील हजारो परिचारिकांच्या हक्कासाठी ‘महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन’ लढा देत आहे. विविध मागण्यांसाठी वेळोवेळी संपाचे हत्यार उपसूनही सरकारने त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे साफ दुर्लक्ष केले. येत्या २४ फेब्रुवारीला बेमुदत संप करण्याच्या हालचाली संघटनेने सुरू केल्या आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images