Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

श्रीकर परदेशी यांची अखेर बदली

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची अखेर शुक्रवारी (सात फेब्रुवारी) बदली झाली. त्यांच्या जागी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सुलभ प्रसूतीसाठी ‘झुला’ पद्धत

$
0
0
महिलेची प्रसूती नैसर्गिकरित्या व्हावी, यासाठी प्रदीर्घ संशोधनातून विकसित केलेला ‘झुला’ उपयुक्त ठरत आहे. गेल्या दहा महिन्यांत १३० प्रसूती या झुल्याच्या वापरातून जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आल्या आहेत.

लोणावळ्यात महिलेवर बलात्कार

$
0
0
लोणावळ्यातील एका विवाहितेवर गेल्या पाच वर्षांपासून अश्लिल व्हिडिओ शुटिंग करून ते सगळीकडे दाखविण्याची भिती दाखवून वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दस्तनोंदणीचा खेळखंडोबा

$
0
0
सर्व्हरमध्ये झालेल्या बिघाडामुळे पुण्यासह मुंबई व ठाण्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांमधील खरेदी-विक्री दस्तांच्या नोंदणीच्या कामाचा सुमारे दोन तासांहून अधिक काळ खोळंबा झाला. र्इ-रजिस्ट्रेशन पद्धतीने होणाऱ्या दस्तनोंदणीमुळे हा बिघाड दुरुस्त होईपर्यंत नागरिकांना ताटकळत थांबावे लागले.

‘नऊचा खाऊ’ नदीपात्रातच

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नऊ तारखेच्या ‘खाऊ’साठी अखेर मुठा नदीपात्रातील जागा निश्चित झाली आहे. पाटबंधारे खात्याने या जागेवर सभा घेण्यास हरकत नसल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

‘एन्ड्युरो ३’ अॅडव्हेंचरची धूम

$
0
0
नॅशनल एज्युकेशन फाउंडेशनतर्फे आयोजित या स्पर्धेचं यंदाचं बारावं वर्ष होतं. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या स्पर्धेचा मीडिया पार्टनर होता. सिंहगड आणि पानशेत परिसरात ही स्पर्धा रंगली. सर्व वयोगटांतील स्पर्धकांना साहसी खेळांसह स्वतःचा कस आजमावण्याची संधी मिळावी, या हेतूनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

उद्याची ‘राजसभा’ SPवरच!

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुण्यात सभा घेण्यास स. प. महाविद्यालयाचे मैदान अखेर उपलब्ध झाले आहे. हे मैदान मिळवून देण्यामध्ये सरकारमधील काही वरिष्ठ मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली आहे.

'नामदार गोखले यांना भारतरत्न द्या'

$
0
0
दिवंगत ज्येष्ठ नेते आणि महात्मा गांधी यांचे राजकीय गुरू नामदार गोपाळकृष्ण गोखले यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. गोखले यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने देशभरातून ही मागणी करण्यात येणार असल्याची माहिती सरहद संस्थेचे संजय नहार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

नाला अलाइनमेंटबाबतचे सर्व प्रस्ताव स्थगित

$
0
0
शहरातील नाले चुकीच्या पद्धतीने वळविल्यामुळे सोसायट्या आणि वस्त्यांमध्ये घुसणारे पाणी रोखण्यासाठी नाल्यांबाबतचा प्रायमूव्हचा अहवाल जुन्या आणि नव्या हद्दीच्या विकास आराखड्यात अंतर्भूत केला जावा, असा ठराव शहर सुधारणा समितीने शुक्रवारी केला.

अंगणवाडी सेविकांचे मानधन अर्थ खात्याच्या हाती

$
0
0
‘अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविण्याचा प्रस्ताव महिला बाल कल्याण विभागाने मान्य करून तो अंतिम मंजुरीसाठी राज्याच्या अर्थखात्याकडे पाठविला आहे.

​बेकायदा गुटखा विकणाऱ्याला अटक

$
0
0
पिंपरी चिंचवड परिसरातील थेरगाव भागात गुटख्याची विक्री करणाऱ्याला व्यक्तीला अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख ३८,९७५ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

‘संशोधक आणि ‘एंड युजर’मध्ये समन्वय हवा’

$
0
0
नवे तंत्रज्ञान शोधणारे संशोधक आणि त्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करणारे ‘एंड यूजर’ यांच्यातील डिस्कनेक्ट हा सुयोग्य तंत्रज्ञानाच्या विकासातील अडसर ठरतो आहे, असे मत लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबॉरेटरीच्या एन्व्हायर्नमेंट एनर्जी टेक्नॉलॉजी डिव्हिजनचे संचालक प्रा. अशोक गाडगीळ यांनी शनिवारी व्यक्त केले.

उन्हाची तीव्रता वाढली

$
0
0
शहर आणि परिसरात रात्रीसह पहाटेचा गारवा आणि दुपारी उन्हाची वाढती तीव्रता शनिवारी कायम होती. कमाल आणि किमान तापमानातील फरक २० अंशांहून अधिक असून, असेच वातावरण आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

बालग्राम बंद करण्याची सीआयडी चौकशी करा

$
0
0
एसओएस बालग्राम बंद करण्याच्या कारणाबाबत सीआयडी आणि महिला बाल कल्याण खात्याची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नवभारत नागरिक मंचाच्यावतीने करण्यात आली.

असेंट जॉब फेअरला उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0
नोकरी मिळविण्यासाठी इच्छुक असलेले सुमारे दीड हजारहून अधिक तरुण आणि १९ कॉर्पोरेट कंपन्यांच्या सहभागामुळे ‘असेंट जॉब फेअर’ला शनिवारी पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हे जॉब फेअर आज, रविवारी (९ फेब्रुवारी) सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच या वेळेत सर्वांसाठी खुले असेल.

बालग्रामबाबत बुधवारी सर्वपक्षीय बैठक

$
0
0
येरवडा येथील एसओएस बालग्राम संस्थेबाबतचा निर्णय शहरातील सर्वपक्षीय आमदारांशी चर्चा करून घेतला जाईल. या बाबतची बैठक येत्या १२ फेब्रुवारीला मुंबईत होईल, असे आश्वासन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.

आयुक्तांच्या बदलीविरोधात उपोषण

$
0
0
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची मुदतपूर्व करण्यात आलेली बदली रोखण्यासाठी शनिवारी सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या. ‘त्यांची बदली रद्द झाली नाही, तर यापुढील काळात आमरण उपोषण करू,’ असा इशारा पिंपरी चौकात झालेल्या आंदोलनात देण्यात आला आहे.

विद्यापीठातील सुरक्षा यंत्रणेला मर्यादा

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या सिक्युरिटी ऑडिटच्या माध्यमातून पुणे पोलिसांनी विद्यापीठाच्या सुरक्षिततेसाठी भरीव सूचना केल्या आहेत. मात्र, सुरक्षारक्षकांच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्या सूचनांच्या अंमलबजावणीमध्ये अडचणी येत असल्याची वस्तुस्थिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी शनिवारी मांडली.

सिलिंडरमधून गॅस चोरणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटक

$
0
0
घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस चोरून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे. घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरत असताना पोलिसांनी या दोघांना छापा टाकून अटक केली.

विद्यार्थिनींना मेससाठी महापौरांकडून पाच लाख

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या ७६ विद्यार्थिनींच्या तीन महिन्यांच्या मेसचा खर्च महापौर चंचला कोद्रे यांनी उचलला आहे. महापालिकेच्या कोणत्याही निधीचा वापर न करता महापौरांनी वैयक्तिकपणे ही मदत केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images