Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पोलिस ठाणे ‘फ्लॅट’मध्ये

0
0
उपनगरामध्ये सर्वात वेगाने विकसित होत असलेल्या नगर रस्त्यावरील विमानतळ पोलिस ठाण्याचा दैनंदिन कारभार एका लहान फ्लॅटमध्ये असल्याने पोलिसांसह अनेक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे .

एसटी अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार तीन लाख

0
0
एसटीच्या अपघातात मृत्यू झाल्यास मरण पावणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आतापर्यंत एक लाख रुपयांची मदत दिली जात होती. मात्र, येत्या एक जानेवारीपासून एसटीने त्यामध्ये दोन लाख रुपयांची वाढ करून ही रक्कम तीन लाख रुपये केली आहे.

विदेशी नागरिकांच्या पाठवणीचे प्रमाण वाढले

0
0
शैक्षणिक अनियमितता, वेळेवर रजिस्ट्रेशन न करणारे तसेच देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्या विदेशी नागरिकांना आपल्या देशामध्ये पाठवून देण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे.

‘बजाज’मधील वाद पुन्हा उफाळला

0
0
बजाज ऑटो कंपनीच्या आकुर्डी आणि चाकण युनिटमधील कामगार-व्यवस्थापन यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या १६ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

‘राष्ट्रवादी’ वगळता बदलीविषयी नाराजी

0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाभलेले उत्तम प्रशासक, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कठोर निर्णय घेणारे, लोकाभिमुख निर्णय घेणारे डॉ. श्रीकर परदेशी आम्हाला हवेतच, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस वगळता अन्य प्रमुख पक्षांनी केली आहे.

खून केल्याप्रकरणी एकाला अटक

0
0
रस्त्यात गोंधळ घालण्याच्या कारणावरून मारहाण करून तरुणाचा खून केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. त्याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिस अधिकाऱ्याचे रिव्हॉल्व्हर पळवण्याचा प्रयत्न

0
0
पोलिसांनी दारू अड्ड्यावर कारवाई केल्यानंतर पोलिस चौकीत आलेल्या तीन भावंडांनी पोलिसांशी हुज्जत घालून तेथील पोलिस अधिकाऱ्याचे रिव्हॉल्व्हर हिसकावून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी (६ फेब्रुवारी) हिंजवडी पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या वाकड पोलिस चौकीत हा प्रकार घडला.

सराईत गुन्हेगाराला अटक

0
0
खून, खंडणीसाठी अपहरण अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांत आरोपी असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक विभागाने ताथवडे परिसरातून गुरुवारी अटक केली. त्याच्या ताब्यातून एक पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

पुणे नगर वाचन मंदिर होणार हायटेक

0
0
गेली १६६ वर्षे अव्याहतपणे वाचन संस्कृतीच्या प्रसाराचे कार्य करत असलेले पुणे नगर वाचन मंदिर आता हायटेक होणार आहे. संस्थेच्या आजवरच्या कामाची आणि ग्रंथालयाची माहिती देणारी वेबसाइट तयार करण्यात आली असून, ग्रंथालयातील सुमारे साठ हजार पुस्तकांच्या डिजिटायझेशनचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

‘एमबीए-सीईटी’चा स्कोअर डिप्लोमासाठीही ग्राह्य

0
0
मॅनेजमेंटच्या पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रमासाठीही एमबीए/एमएमएस-सीईटीचा स्कोअरच ग्राह्य धरला जाणार आहे. ‘सीईटी’बाबत तंत्रशिक्षण संचालनालयाने नव्याने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत याचा उल्लेख आहे.

दिग्गजांनी जागवल्या ‘आर्यन’च्या आठवणी

0
0
पुणे शहराला सिनेमा या माध्यमाची ओळख करून देणारे पहिले थिएटर, अनेक सिनेमांनी गाजविलेल्या सिल्व्हर, गोल्डन ज्युबिली, मुकपटांचा जमाना, दिग्गज कलाकारांचा संघर्षाचा काळ अशा अनेक आठवणींची कुपी खुली करून रसिकांनी शुक्रवारी आर्यन थिएटरच्या आठवणी जागवल्या.

जर्मन भाषाशिक्षणाचा आणि पुणेरी पाट्यांचा ‘जर्मेनिया’!

0
0
‘येथे वाहने लावल्यास हवा काढली जाईल’... वाक्य वाचून, ‘ही तर ‘पुणेरी पाटी’, असा समज करून घेत असाल, तर थांबा. हे एका ‘जर्मन पाटी’चे ‘पुणेरी’ भाषांतर आहे! जर्मनी आणि पुण्याचे नाते घट्ट का, हे सांगायला यापेक्षा चांगला दाखला कोणता मिळणार?

शहराच्या काही भागात आज कमी दाबाने पाणी

0
0
शहरातील गुरुवार पेठ, शुक्रवार पेठेतील भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या दुरुस्त‌ीचे काम शुक्रवारी सुरू असल्याने दुपारनंतर या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.

कूळ जमिनीच्या विक्रीस परवानगीची अट रद्द

0
0
कुळाच्या मालकीच्या झालेल्या जमिनी विकण्यासाठी महसूल खात्याकडून पूर्वपरवानगी घेण्याची अट रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कुळ कायद्यातील हे पूर्वपरवानगीचे कलम दुरुस्त करण्याच्या प्रस्तावावर शुक्रवारी स्वाक्षरी केली. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांची या जातक अटीतून मुक्तता झाली आहे.

एटीएम फोडणारी टोळी गजाआड

0
0
हडपसर आणि रांजणगाव भागात ‘एटीएम’ फोडणाऱ्या टोळीतील दोन फरारी आरोपींना गजाआड करण्यात गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारीविरोथी पथकाला यश आले आहे.

राज्यातील इतर महत्त्वाच्या बदल्या

0
0
राज्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी बदल्या झाल्या. बदल्या झालेले अधिकारी आणि त्यांच्या नवीन नियुक्त्या पुढीलप्रमाणे - सुनील पोरवाल (प्रधान सचिव - सहकार आणि वस्त्रोद्योग विभाग), अनिल डिग्गीकर (संचालक - एमएसआरडीसी), बिपिन श्रीमाळी (अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक - पारेषण)

पुणेकरांसाठी केलेल्या कामाबद्दल समाधानी

0
0
‘महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळताना केलेल्या कामाबद्दल समाधानी आहे,’ असे मत महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी व्यक्त केले. आयुक्त म्हणून काम करताना गेल्या पावणेतीन वर्षांच्या काळात पुणेकरांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे पाठक यांनी सांगितले.

वेगळ्या पालिकेच्या माध्यमांतून आमचाही ‘होऊ दे विकास’

0
0
नवीन पालिकेच्या माध्यमांतून फुरसुंगीचाही विकास होणे गरजेचे आहे, अशी भावना फुरसुंगीच्या ग्रामस्थांनी बोलून दाखविली आहे. ‘पुणे महानगरपालिकेने यापूर्वी जी गावे महापालिकेत घेतली आहेत त्यांचा विकास झाला नाही. त्यासाठीचा निधी अद्यापही प्रलंबित आहे.

छोट्या पालिकेत थेंबे थेंबे पाणी वाचे

0
0
पाण्याचा वारेमाप वापर, धरणापासून घरापर्यंत येणाऱ्या पाण्याची गळती, पेठांसह उपनगरांमध्ये होणारे असमान पाणीवाटप यामुळे पुणेकर पाण्याबाबत समाधानी नाहीत. वाढत्या लोकसंख्येमुळे जादा पाणी मागणीवरून महापालिकेचा जलसंपदा खात्याबरोबर वारंवार उडणारा खटका यावर छोट्या आकाराच्या महापालिकेसारख्या नवीन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निर्मितीतून मार्ग निघू शकतो.

विकास देशमुख पुणे पालिकेचे आयुक्त

0
0
पुणे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी पुण्याचे मावळते जिल्हाधिकारी विकास देशमुख नियुक्ती करण्यात आली आहे. शिस्तप्रिय व प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेले देशमुख हे आपल्या नव्या पदाचा कार्यभार सोमवारी (१० जानेवारी) घेणार आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images