Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अकरावी प्रवेशाची चौकशी करणार

$
0
0
पुण्यातील अकरावी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेमध्ये गुणवत्तेला बकरा बनविण्यात आल्याची राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात माहिती अधिकारात प्राप्त झालेली कागदपत्रे शिक्षण आयुक्त एस. चोकलिंगम यांच्याकडे चौकशीसाठी पाठविण्यात आली आहेत.

‘अनफिट’ कारभाराला दंड

$
0
0
वजन कमी करून देण्याचे आश्वासन पाळणे दूरच, उपचारादरम्यान योग्य ती काळजी न घेतल्याने हृदयविकाराचा धोका ओढवल्याप्रकरणी ग्राहक न्यायमंचाने एका फिटनेस सेंटरला दंड ठोठावला आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळ होईल, असा कारभार न करण्याची तंबीही देण्यात आली आहे.

बुद्धिमत्ता चाचणीचे प्रणेते वा. ना. दांडेकर

$
0
0
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वा. ना. दांडेकर यांचा आज नितीन प्रकाशनातर्फे कृतज्ञता सोहळा साजरा होतो आहे. त्या निमित्ताने शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा अशा परीक्षांमध्ये वा. ना. दांडेकर यांच्या शिफारसीने समाविष्ट झालेल्या बुद्धिमत्ता चाचणी या विषयाबाबत त्यांच्याशी साधलेला हा संवाद…

मोदी हेच आश्वासक नेतृत्व

$
0
0
‘विकासाची दिशा देण्यासाठी सकारात्मक आणि कणखर राजकीय नेतृत्त्वाची देशाला गरज असते. सध्याच्या परिस्थितीत नरेंद्र मोदी हेच देशाचे आश्वासक नेतृत्व आहेत,’ असे मत वेकफिल्ड उद्योगसमूहाचे अध्यक्ष बाहरी बी. आर. मल्होत्रा यांनी व्यक्त केले.

खोट्या शपथपत्रांना आळा घालण्यासाठी प्रयत्न

$
0
0
राजकारणातील वाढते गुन्हेगारीकरण आणि निवडणुकांदरम्यान उमेदवारांकडून दाखल करण्यात येणाऱ्या खोट्या शपथपत्रांना आळा घालण्यासाठी निडणुकांमध्ये सुधारणा करण्यासाठी विधी आयोगाकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती विधी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अजित शहा यांनी शुक्रवारी दिली.

पर्यावरणासाठी जिल्ह्यांमध्ये माहिती केंद्र

$
0
0
पर्यावरणाची माहिती नागरिकांना व्हावी, म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये माहिती केंद्र सुरू करण्याची योजना हाती घेण्यात येणार आहे.

नर्मदेची ‘व्हर्च्युअल’ परिक्रमा

$
0
0
नर्मदापूजन... परिक्रमेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणारी अनोखी वेबसाइट उद्घाटन... परिक्रमेचे अपूर्वानुभव... श्रद्धाळूंची उत्स्फूर्त दाद... निमित्त होते निनाद या संस्थेतर्फे रथसप्तमी आणि नर्मदा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे.

भारतीय गुलाबांसाठी जगभरात मागणी

$
0
0
‘व्हॅलेंटाइन डे’साठी भारतातील गुलांबाना विदेशातून चांगली मागणी आली आहे. युरोप आणि अन्य देशांमध्ये येत्या काही दिवसांमध्ये राज्यातून सुमारे ७० लाख गुलांबाची निर्यात होणार आहे.

गोखले इन्स्टिट्यूटमध्ये ‘सेन्सस डेटा सेंटर’

$
0
0
केंद्र सरकारच्या जनगणना विभागातर्फे पुण्यातील ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिक्स’मध्ये ‘सेन्सस डेटा सेंटर’ उभारण्यात आले आहे.

जनगणनांचे डिजिटलायझेशन

$
0
0
‘केंद्र सरकारच्या जनगणना विभागातर्फे सन १८७२ पासूनच्या देशातील सर्व जनगणना अहवालांचे डिजिटायझेशन करण्यात येत आहे. यासाठी सरकारकडे उपलब्ध असलेल्या जुन्या अहवालांबरोबरच देशभरातील विविध संशोधन संस्थांमधील ग्रंथालयांमध्ये असलेल्या जुने अहवालही संकलित करण्यात येत आहेत,’ अशी माहिती जनगणना आयुक्तालयाचे अतिरिक आयुक्त डेप्युटी रजिस्ट्रार दीपक रस्तोगी यांनी शुक्रवारी दिली.

प्रभात रोडवर सोनसाखळी हिसकावली

$
0
0
प्रभात रोडवरील ग्रीनपार्क लेनमध्ये बुधवारी रात्री पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. या प्रकरणी दुचाकीवरून चाललेल्या दोघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातात महिला ठार

$
0
0
कात्रज-देहूरोड बायपासवर त्रिमूर्ती गार्डनसमोर रस्ता ओलांडणाऱ्या सासू-सुनेला कारची धडक बसून, त्यात सासूचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे.

बसखाली सापडून एकाचा मृत्यू

$
0
0
भरधाव पीएमपी बसखाली सापडून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री पावणेआठच्या सुमारास शिवाजीनगरच्या संचेती चौकामध्ये घडली. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

किल्ल्यांच्या संवर्धनासाठी संभाजी महाराजांचा पुढाकार

$
0
0
राज्य सरकार गडकोट किल्ल्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वतः किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार किल्ले संवर्धन मोहीम आखण्यात आली असून, राजगड येथून या मोहिमेला नऊ फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात येणार आहे.

‘पुणे स्टेशनवरून नवी रेल्वेसेवा नाही’

$
0
0
वाढलेल्या वाहतुकीमुळे पुणे स्टेशनवरून नवीन रेल्वेसेवा सुरू करणे शक्य नसल्याचे मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर एस. के. सूद यांनी स्पष्ट केले. पुणे विभागामध्ये येणाऱ्या अन्य स्टेशन्सवरून नवीन रेल्वेसेवा सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाकडून सुरू असल्याचे ते या वेळी म्हणाले.

बलात्कारप्रकरणी आरोपीला अटक

$
0
0
सासवड येथील आनंद प्लाझा या गृहरचना संस्थेत वास्तव्यास असलेला गजानन नामदेव जगताप, (वय ४५, मूळ गाव सुपे खुर्द, ता. पुरंदर) याच्याविरुद्ध पीड‌ित अल्पवयीन मुलीने चार फेब्रुवारी रोजी सासवड पोलिस ठाण्यात स्वत: येवून ही फिर्याद दाखल केली.

राजगुरुनगरमध्ये विषमज्वराची साथ

$
0
0
गेल्या पंधरा दिवसांपासून दूषित पाण्यामुळे राजगुरुनगर आणि लगतच्या चांडोली परिसरात विषमज्वराचे शंभरपेक्षा अधिक पेशंट आढळून आले आहेत. या पेशंटवर शासकीय, तसेच काही खासगी हॉस्पिटलांमध्ये उपचार सुरू आहेत.

चर्चेनेच वाद मिटतात

$
0
0
‘वादात आणि नादात कुणाचेही भले झालेले नाही. वादाकरता वाद घालणाऱ्यांची संख्या समाजात वाढत चालली असून काहीजण निष्कारण वाद निर्माण करतात. कारण त्यांना कोर्टात गेल्याशिवाय करमतच नाही. चर्चेनेच अनेक प्रश्न सहज सुटू शकतात. तसेच, कधी-कधी वाद निर्माण होण्यापेक्षा कोर्टात जाणे देखील चांगले असते. कारण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात,’ असे मत आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केले आहे.

घरबसल्या अनुभव ‘कृषी वसंत’चा !

$
0
0
केंद्र आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत नागपूर येथे होणारे ‘कृषी वसंत’ हे प्रदर्शन शेतकऱ्यांना आपल्याच गावात-शहरात बसून पाहता येणार आहे.

लोकशासन आंदोलनात सत्ताधिकाऱ्यांवर टीका

$
0
0
गरीब जनता देशाची मालक झाली पाहिजे, असा निर्धार करत आपले राज्य श्रीमंत आहे. मात्र, नेते भिकारी असल्याची टीका माजी न्यायमूर्ती आणि लोकशासन आंदोलनाचे अध्यक्ष बी.जी. कोळसे पाटील यांनी जुन्नर येथे केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images