Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

'साप दिसल्यास सर्पमित्रांशी संपर्क साधा'

$
0
0
वस्तीत निघालेल्या घोणस सापाला डिवचण्याचा खेळ रमेश कोळे या तरुणाच्या जीवावर बेतला आहे. कोळे यांना सर्पदंश झाला असून, ससून हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची तब्येत अत्यवस्थ आहे.

पोलिओग्रस्त रिनाचे यश

$
0
0
दोन्ही पायांना पोलिओ झाल्याने लावलेले कॅलिपर्स, आधारासाठी दोन्ही हातात काठ्या अशा प्रतिकूल शारिरीक परिस्थितीतही जिद्दीने अभ्यास करत रिना गुप्ता या विद्याथिर्नीने दहावीच्या परीक्षेत तब्बल ८६ टक्के गुण मिळवले आहेत.

नगर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक

$
0
0
पुणे विभागाचा निकाल गेल्या वर्षीपेक्षा पाच टक्क्यांनी वाढला असून, या विभागात नगर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ८६.४३ टक्के लागला आहे. पुणे-सोलापूरचा निकाल प्रत्येकी ८४ टक्के आहे.

आयटीआयची प्रवेशप्रक्रिया उद्यापासून सुरू

$
0
0
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी देणा-या इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधील (आयटीआय) प्रवेशप्रक्रिया येत्या गुरुवारपासून (१४ जून) सुरू होणार आहे.

एमटीडीसीचा 'डिस्कव्हरी'शी करार

$
0
0
मध्यप्रदेश टुरिझम, टुरिझम कॉर्पोरेशन ऑफ गुजरात लिमिटेड यांच्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळही (एमटीडीसी) आता पर्यटनाच्या स्पर्धेत उतरले आहे. 'डिस्कव्हरी' चॅनेलबरोबर मंडळाने करार केला असून महाराष्ट्रातील किल्ले, समुद किनारे, संस्कृती आणि वन्य जीवनावर आधारित सहा भागांच्या विशेष मालिकेचे शुटिंग सध्या सुरू आहे.

अमली पदार्थांच्या तस्करीसाठी आळेफाटा 'हॉट डेस्टिनेशन'

$
0
0
अमली पदार्थांच्या तस्करीसाठी लोणावळ्याबरोबरच पुणे-नाशिक हायवेवरील आळेफाटा हे हॉट डेस्टिनेशन ठरत आहे. कल्याण-नगर आणि पुणे-नाशिक असे रस्ते एकमेकांना मिळत असलेल्या आळेफाट्यापासून मुंबई, पुणे, नाशिक आणि नगर या चारही शहरांमध्ये अमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

बिझनेस बायोटेक्नॉलॉजी इनक्युबेटर प्रकल्प गुंडाळणार?

$
0
0
पुणे विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद आणि सायन्स टेक्नॉलॉजी पार्क (एसटीपी) यांच्यातील खडाजंगी सहा महिन्यानंतरही कायम असून, या अंतर्गत वादात केंदाकडून आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुण्याच्या उंबरठ्यावर स्लोडाउन

$
0
0
शहरातील वाहन उद्योगातील सर्वांत मोठा उद्योग असलेल्या टाटा मोटर्सने पिंपरी-चिंचवड प्लँटमध्ये २२ ते २४ जून असे तीन दिवस उत्पादन बंद ठेवले जाणार आहे. टोयोटा किर्लोस्करने पेट्रोल कारचे उत्पादन स्थगित केले असून, फियाट पुढील महिन्यात काही दिवस प्लँट बंद ठेवण्याचा विचार करीत आहे. मंदीमुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे.

घरफोडी करणारी महिला गजाआड

$
0
0
कल्याणीनगर येथील आकाशदूत सोसायटीतील फ्लॅट फोडून दोन लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेने अटक केली. येरवडा परिसरातील सोनाराकडे दागिन्यांची विक्री करण्यासाठी आली असताना तिला अटक करण्यात आली.

वेटिंग फॉर सिंहगड...

$
0
0
पावसाळ्याची मजा लुटण्यासाठी सिंहगडावर गाडीतून जाणार असाल तर यापुढे तुम्हाला वेटिंगचाही अनुभव घ्यावा लागणार आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी गडावरील पार्किंग फुल्ल झाल्यावर वनाधिकारी नवीन येणा-या गाड्यांना पायथ्यालाच थांबवून ठेवणार आहेत.

ट्रॅफिकचे चक्रव्यूह भेदले

$
0
0
जंगली महाराज रोडवरील स. गो. बर्वे चौकामध्ये सुरू करण्यात आलेली चक्राकार वाहतूक सुरळीतपणे सुरू होती. सकाळपासून चक्राकार रस्त्यावर ट्रॅफिक जॅम होण्याचे प्रकार झाले नाहीत.

वैचारिक दबदबा असणारी माध्यमे कमी

$
0
0
'वैचारिक दबदबा असणारी माध्यमे झपाट्याने कमी होत चालली आहेत.' अशी खंत जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी सोमवारी व्यक्त केली.

सातारा-सांगलीलाही बसतोय काविळीचा विळखा

$
0
0
इचलकरंजी, कोल्हापूर पाठोपाठ आता सांगली भागातही काविळेचे रुग्ण आढळू लागले असून येथील श्रीपाद कारंजकर (३२) या तरुणाचा काविळीने मृत्यू झाला आहे.

माणसातील माणुसकी पालकर काकांनी जगविली

$
0
0
रस्त्यावरील एखाद्या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या रुग्णावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज असते. या तातडीच्या वेळी जवळ कुणीही नातेवाईक नसतात. अशा वेळी त्या रुग्णाच्या पाठीशी उभे राहतात पालकर काका.

दागिने हडप करणा-या दिवाणजीला अटक

$
0
0
चोरीचा बनाव करून नऊ लाख रुपये हडप करू पाहणा-या दिवाणजीला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून त्याने लांबिवलेले नऊ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

'यूएलसी' गुन्ह्यातील आरोपींना अटक

$
0
0
'यूएलसी' संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) तत्कालीन तहसीलदार राम माने यांच्यासह दोघींना अटक केली आहे. 'यूएलसी'चे आदेश नसतानाही बनावट प्रत तयार केल्याप्रकरणी 'सीआयडी'ने ही कारवाई केली आहे. माने सध्या उत्तर सोलापूर येथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत.

'ग्रीन प्लॅन' १५ ऑगस्टपर्यंत

$
0
0
वृक्ष लागवडीबाबत स्वयंसेवी संस्थांकडून प्रयत्न केले जातात; पण महापालिकेच्या उद्यान विभागाकडून काम होत नाही, या शब्दांत खासदार वंदना चव्हाण यांनी महापालिका प्रशासनावर टीकास्त्र सोडले. वृक्षलागवडीबाबतची स्थिती बदलण्यासाठी आगामी पाच वर्षांचा 'ग्रीन प्लॅन' येत्या १५ ऑगस्टपर्यंत तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

जुन्या स्वदेशी घड्याळाचा नव्या 'ज्ञानेश्वरा'कडून गजर

$
0
0
पुणे नगरपालिकेचा कारभार विश्रामबागवाडा येथून केला जात असताना, त्या वेळचे १९३० च्या काळातील स्वदेशी बनावटीचे आणि विजेवर चालणारे घड्याळ दुरुस्त करण्यात यश आले आहे. हे घड्याळ आता महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात लावण्यात येणार आहे.

हक्काच्या प्रवेशात नियमांच्या तांत्रिकतेचा अडसर

$
0
0
आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना शालेय प्रवेशासाठी शासनाने २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा काढलेला अध्यादेश तांत्रिकतेच्या कचाट्यात अडकला आहे. त्यामुळेच, हा अध्यादेश विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र सध्या शहरामध्ये अनुभवायला मिळत आहे.

जागतिक संगीताचे दालन 'मिंड'द्वारे होणार खुले

$
0
0
नाट्यसंगीताला 'लाइव्ह म्युझिक ट्रॅक'ची जोड देऊन अभिनव प्रयोग करणाऱ्या युवा संगीतकार गंधार संगोरामने आता जागतिक संगीतविषयक 'मिंड' या इंग्रजी ई-मॅगझिनचा उपक्रम हाती घेतला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images