Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्याचे मानचिन्ह लांडगा की जावडी मांजर?

$
0
0
पुण्याच्या मानचिन्हांच्या स्पर्धेत सस्तन प्राण्याच्या विभागात लांडगा आणि जावडी मांजराने तर पक्ष्यांच्या विभागात चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क) आणि श्रृंगी घुबड यामध्ये चुरशीची लढत होणार आहे.

मतदारयादीची वेबसाइट रुसली

$
0
0
मतदारयादी जाहीर झाल्यापासून अवघ्या दोन दिवसांतच निवडणूक आयोगाच्या वेबसाइटला तब्बल सव्वादोन लाख हिट्स मिळाल्या आहेत. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सर्च सुरू केल्यानंतर ताण आल्यामुळे ही वेबसाइट रुसली आहे.

ढासळता बालेकिल्ला राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान

$
0
0
पारंपरिक मतांचे बळ आणि सर्वसमावेशक धोरणांच्या आधारावर गेली अनेक वर्षे शाबूत राहिलेला पुण्याचा बालेकिल्ला राखण्यासाठी काँग्रेसला यंदा शर्थ करावी लागणार आहे.

टाकाऊ ‘एक्स-रे’तून चांदीची निर्मिती

$
0
0
वापरात नाही म्हणून फेकलेल्या कचऱ्यातून चांदी मिळू शकते... या वर तुमचा विश्वास बसेल का, पण हे मॉडर्न कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शक्य करून दाखविले आहे. कचऱ्यात फेकल्या जाणाऱ्या एक्स-रे फिल्ममधून त्यांनी चांदीची निर्मिती केली आहे.

प्रॉपर्टी टॅक्स, पाणीपट्टीत वाढ नाही

$
0
0
पालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये पाणीपट्टी, तसेच प्रॉपर्टी टॅक्समध्ये कोणतीही वाढ न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेच्या सोमवारी झालेल्या खास सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला.

६ वर्षांखालील मुलांनाच पासपोर्टसाठी थेट प्रवेश

$
0
0
पासपोर्टच्या ‘वॉक इन इंटरव्ह्यू’साठी आता केवळ सहा वर्षांखालील मुलांनाच थेट अपॉइंटमेंटशिवाय प्रवेश मिळणार आहे. पासपोर्ट केंद्रात होणारी गर्दी लक्षात घेऊन केंद्रीय पासपोर्ट कार्यालयाने हा निर्णय घेतला असून, आतापर्यंत १५ वर्षांच्या मुलांना थेट प्रवेश दिला जात होता. ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांना देण्यात येणाऱ्या थेट प्रवेशाच्या सवलतीत मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

गुरुवारी पाणी नाही

$
0
0
पर्वतीसह लष्कर, एसएनडीटी, वडगाव आणि नवीन होळकर या जलकेंद्रांमध्ये स्थापत्य आणि विद्युत-पंम्पिंगसंबंधी देखभाल-दुरुस्तीची तातडीची कामे करण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (सहा फेब्रुवारी) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

गावांच्या समावेशाबाबत लवकरच निर्णय?

$
0
0
महापालिकेच्या हद्दीत ३४ गावांचा समावेश करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी विकास देशमुख यांचा अहवाल राज्य सरकारला नुकताच सादर झाला. त्यामुळे गावांच्या समावेशाच्या विषयाला गती मिळणार असून, येत्या काही दिवसांतच याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

डिजिटल मतदान स्लिपसाठी पाठवा SMS

$
0
0
मतदारयादीमध्ये नाव शोधण्यासाठी ‘एसएमएस पाठवा आणि डिजिटल स्लिप मिळवा,’ असा उपक्रम पुणे विचार मंचाच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंचाचे निमंत्रक योगेश गोगावले यांनी कळविली आहे.

विकासगंगेत सहभागी होण्यास उरुळी देवाची उत्सुक

$
0
0
पूर्व पुण्यातील मोठा भाग अजूनही ग्रामपंचायतींच्या कारभाराखाली आहे. पुणे महापालिकेची हद्दवाढ होऊनही या भागाला समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही. परिणामी, कितीही इच्छाशक्ती, सचोटीचा कारभार असला, तरी या परिसरातील विकासाला मर्यादा येत आहेत.

दिवसा उकाडा, रात्री कडाका

$
0
0
दिवसा उकाडा तर रात्री आणि पहाटे गारवा असे संमिश्र हवामान पुणेकर सध्या अनुभवत आहेत. दिवसा किमान तापमानात झालेल्या मोठ्या वाढीमुळे उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच रात्री आणि पहाटे तापमानात घट होत असल्याने अजूनही थंडी कायम असल्याचे चित्र आहे.

‘टॉप रँकर्स’च्या समर्थनार्थ लोकसेवा आयोग सरसावला

$
0
0
राज्य सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील (एमपीएससी) विसंवादामुळे ‘टॉप रँकर्स’ला दुय्यम पदे मिळण्याच्या प्रकारावर मार्ग काढण्यासाठी आयोगानेच पुढाकार घेतला आहे. दर वर्षी प्रत्येक केडरच्या किमान पदांची जाहिरात देण्याच्या सूचना आयोगाने राज्य सरकारकडे केल्या आहेत.

सुप्रिया म्हणतात, ‘HA’ची जमीन विका

$
0
0
‘हिंदुस्थान अँटिबायोटिक्समधील (एचए) कामगारांची देणी मिटविण्यासाठी प्रसंगी तातडीने जमीन विका. परंतु, कंपनी टिकवा,’ अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (तीन फेब्रुवारी) केली.

कोंढाण्याचे लग्न कधी?

$
0
0
आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे... असे सांगत तानाजी स्वराज्यासाठी लढला आणि कोंढाणा गड (सिंहगड) स्वराज्यात आला. बारामती लोकसभा मतदारसंघरूपी कोंढण्यावर स्वारी करण्यासाठी शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी तलवार उपसली. जाहीर सभांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आव्हान दिले.

RTO परीक्षेसाठी ‘ऑटोमेटेड टेस्टिंग ट्रॅक’

$
0
0
वाहनाचा कायमस्वरुपी परवाना देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या चाचणीमध्ये पारदर्शकता यावी, म्हणून आळंदी रोड येथील आरटीओच्या कार्यालयामध्ये ‘ऑटोमेटेड टेस्टिंग ट्रॅक’ बसवण्याचे नियोजन सुरू केले आहे. पुणे विभागाचे नवनियुक्त प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी ही माहिती दिली.

कैद्यांना मिळणार एसी, रे​फ्रिजरेटरचे प्रशिक्षण

$
0
0
येरवडा सेंट्रल जेलमध्ये शिक्षा लागलेल्या कैद्यांच्या सुधारणेसाठी तसेच त्यांच्या उपजीविकेसाठी गोदरेज कंपनी आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ यांच्यामदतीने ‘एअर कंडिशनर’ (एसी) आणि ‘रे​फ्रिजरेटर’चे सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

शहराच्या पूर्व भागात आज पाणी बंद

$
0
0
पर्वती जलकेंद्रातून लष्कर पाणीपुरवठा केंद्राकडे जाणारी १७०० मिमी व्यासाची जलवाहिनी नीलायम थिएटरनजीकच्या परिसरात नादुरुस्त झाल्याने लष्कर पाणीपुरवठा केंद्राकडे जाणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.

‘ATM’ क्लोनिंगचे गुन्हे वाढले

$
0
0
‘एटीएम’ क्लोनिंगच्या माध्यमातून बनावट ‘एटीएम’ कार्ड तयार करून पैसे काढण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारचे चार गुन्हे घडले असून, परराज्यातून पैसे काढण्यात येत असल्याने पोलिसांना आरोपींचा माग काढणे कठीण बनले आहे.

हॉल तिकिटाचा पत्ताच नाही

$
0
0
परीक्षा तोंडावर आलेली असतानाही हॉल तिकीट न मिळाल्याने बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांत अस्वस्थता आहे. अभ्यास करायचा की हॉल तिकिटासाठी कॉलेजमध्ये रोज हेलपाटे मारायचे असा सवाल ते करीत आहेत.

ओझ्याखाली दबली पालिका

$
0
0
शहरातील सुमारे ३५ लाख लोकसंख्येला पाणी, रस्ते, वाहतूक, आरोग्य आदी नागरी सुविधा देताना तारेवरची कसरत करीत असलेल्या पुणे महापालिकेला लगतच्या आणखी ३४ गावांचे ओझे झेपेल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images