Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘संस्मरणी’य नृत्य-वादन सोहळा

$
0
0
कथक आणि भरतनाट्यम् या दोन वेगवेगळ्या नृत्यप्रकारांचा मिलाप श्रीकृष्ण, शंकर आणि दुर्गा यांच्या स्तुतीस्तवनातून पाहायला मिळाला. दुर्गा परण आणि शिव परण हे पखवाजवरील तालात सादर झालं आणि दोन नृत्य प्रकारांचं वेगळेपण बाजूला होऊन ते समरस झाले.

पार्किंगची नियमावली अन्यायकारक

$
0
0
राज्यसरकारच्या आदेशानुसार दाट लोकवस्तीतील कमी रुंदीच्या प्लॉटबाबत पुणे महापालिकेने जाहीर केलेली पार्किंगची नवीन नियमावली अन्यायकारक असल्याचे पुणे बचाव समितीने म्हटले आहे. यामध्ये बदल करण्याबाबतचा अहवाल पालिकेने तातडीने राज्य सरकारकडे सादर करावा.

सर्व रेल्वे स्टेशनवर ‘ईव्हीएम’

$
0
0
प्रवाशांचा रेल्वेचे तिकीट काढण्यात खर्च होणाऱ्या वेळेची बचत व्हावी, म्हणून रेल्वे प्रशासनाने पुण्यातील सर्व रेल्वे स्टेशनवर ऑटोमेटेड तिकीट व्हेंडिंग मशिन (ईव्हीएम)बसवण्याचे निश्चित केले आहे. पुढल्या दीड महिन्यांमध्ये ही मशिन बसवण्यात येणार आहेत.

आचारसंहितेपूर्वीच पुणे मेट्रोला मंजुरी?

$
0
0
केंद्र सरकारकडे गेले अनेक महिन्यांपासून मंजुरीसाठी असलेल्या मेट्रो प्रकल्पाची आवश्यक कागदपत्रे केंद्र सरकारने महापालिकेकडून मागविली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

बैलगाडा शर्यतीलाही टेक्नॉलॉजीची ‘झूल’

$
0
0
गावोगावच्या यात्रांचे आकर्षण असलेल्या बैलगाडा शर्यतींच्या निकालांमध्ये पारदर्शकता यावी, या साठी डिजिटल डिस्प्ले स्टॉपवॉचचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. लेण्याद्री येथे गणेशजन्म सोहळ्यानिमित्त सोमवारी आयोजित बैलगाडा शर्यतीत प्रथमच डिजिटल स्टॉपवॉचचा वापर करण्यात आला.

असुयोची ‘सुरक्षा’च धोक्यात

$
0
0
केंद्र सरकारने आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईगडबडीत अन्नसुरक्षा विधेयक मंजूर करून गोरगरिबांची क्रूर चेष्टाच केल्याचा प्रत्यय येत आहे. राज्यात १ फेब्रुवारीपासून अन्नसुरक्षेची अंमलबजावणी सुरू झाली.

सांडपाणी प्रकल्पासाठी बिगरशेती जमीन घ्यावी

$
0
0
सासवड शहरात नगरपालिकेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी शेतीवापर नसलेली जागा शोधून त्या जागी विकास आराखडा आरक्षण ठेवून प्रारूप करावे आणि मंजुरीनंतर हा प्रकल्प हाती घ्यावा.

स्टोव्हच्या भडक्याने बालकाचा मृत्यू

$
0
0
पहाटे चार वाजता चहा करण्यासाठी वडिलांनी स्टोव्ह पेटवला, मात्र, त्याचा भडका उडाल्याने आणि तिथे सांडलेल्या रॉकेलने आग पकडल्यामुळे शेजारीच झोपलेल्या पाच वर्षाच्या मुलाचा जळून मृत्यू झाला. या आगीत वडिलही ३० टक्के भाजले आहेत.

‘एक्स्प्रेस वे’वर ओझर्डे येथे आज रास्ता रोको

$
0
0
एक्स्प्रेस वे लगतच्या गावांमधील गावकऱ्यांच्या शेतजमिनीवर ट्रॉमा सेंटरसाठी होणारे खोदकाम आणि एका शेतकऱ्याचे घर अतिक्रमण ठरवून पाडल्याच्या निषेधार्थ ओझर्डे आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने मंगळवारी सकाळी ११ वाजता एक्स्प्रेस वेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहेत.

प्रवेश कर बुडविणाऱ्यांवर ‘CCTV’ची नजर

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाताना वाहन प्रवेश कर न भरता पळून जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी आणि नाक्यांवर सुरक्षेसाठी ३० क्लोज स​र्किट टीव्ही (सीसीटीव्ही) लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहन प्रवेश कर बुडविणाऱ्यांवर आता करडी नजर राहणार आहे.

एकात्मिक आराखड्याला गती

$
0
0
वाढती लोकसंख्या आणि विकासाची दिशा लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महापालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), नवनगर विकास प्राधिकरण आणि विविध शासकीय संस्थांनी एकत्रित घेऊन सर्वंकष एकात्मिक विकास आराखड्याला गती देण्याची गरज असल्याचे मत या संदर्भात आयोजित बैठकीत व्यक्त करण्यात आले.

हॉकर्स पॉलिसीला बोर्डाची मान्यता

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाने हॉकर्स पॉलिसीला मान्यता ​दिली असून, पथारी व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी ‘टाउन व्हेंडिंग कमिटी’ स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीकडून ‘हॉकर्स झोन’ निश्चित करून पथारी व्यावसायिकांना ओळखपत्रे आणि परवाने देण्याचे काम केले जाणार आहे.

कँटोन्मेंटवर नेमणार प्रशासक

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी पाच जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्यानंतर तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळणार नसल्याने प्रशासक नेमण्यासाठी आतापासूनच हालचाली सुरू झाल्या आहेत.

मुकादमांच्या होणार ३ महिन्यांनी बदल्या

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या एकाच वॉर्डात अनेक वर्षे काम करत असलेल्या मुकादमांमुळे कचऱ्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने, मुकादमांच्या दर तीन महिन्यांनी वॉर्डांतर्गत बदल्या करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.

‘SRA’बाबत ४ आठवड्यांत निर्णय घ्या

$
0
0
शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांबाबत (एसआरए) चार आठवड्यांत निर्णय घेण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. त्यामुळे, शासकीय जागांवर रखडलेले तब्बल ४० प्रकल्प यामुळे मार्गी लागण्याची शक्यता आहे.

‘जन्म-मृत्यू दाखल्याचा अहवाल सादर करा’

$
0
0
शहरातील नागरिकांना जन्म-मृत्यू दाखल्याची पहिली प्रत संपूर्णपणे मोफत देण्याच्या सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका प्रशासनाला महापौर चंचला कोद्रे यांनी कडक शब्दात सुनावले. राज्यातील सर्व महापालिकांकडे जन्म-मृत्यू दाखल्याची पहिली प्रत मोफत दिली जाते.

वीजपुरवठा खंडित होण्याच्या कालावधीत दुपटीने वाढ

$
0
0
एकीकडे पायाभूत सुविधांमध्ये वाढ, आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर सुरू झालेला असताना दुसरीकडे राज्यात वीजपुरवठा खंडित होण्याच्या सरासरी कालावधीत वाढ झाल्याचे विसंगतीपूर्ण चित्र समोर आले आहे.

दरोड्याच्या तयारीतील चौघांना अटक

$
0
0
गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक विभागाने दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघा आरोपींना अटक केली असून दोघे आरोपी पसार झाले आहेत. या आरोपींनी गेल्या आठवड्यात कोंढवा येथे एका व्यक्तीला दीड लाख रुपयांचा ऐवज लुटल्याचा गुन्हा उघडकीस आला आहे.

हरित लवादाच्या आदेशाला पालिकेकडून केराची टोपली

$
0
0
नदीपात्रातील राडारोडा काढून पूररेषेबाहेरील रस्त्याच्या आराखड्याची फेरआखणी करण्याचे आदेश ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने देऊनही सहा महिन्यात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने पर्यावरणवाद्यांनी लवादाकडे अवमान याचिका दाखल केली आहे.

शिक्षकांच्या बहिष्कारावर तोडगा काढणार

$
0
0
राज्यातील ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांच्या बहिष्काराच्या प्रश्नावर लवकरच मार्ग काढणार असल्याचे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सोमवारी दिले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images