Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

११ वी केंद्रीय प्रवेशात गुणवत्तेचा ‘बकरा’

$
0
0
अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेदरम्यान ‘कट-ऑफ’पेक्षाही कमी टक्केवारी असलेल्या ६०० विद्यार्थ्यांना शहरातील आघाडीच्या कॉलेजमधून कॉमर्स शाखेत प्रवेश मिळाल्याची माहिती उघड झाली आहे. पालकांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून दिलेल्या लढ्यातून ही बाब प्रकाशात आली आहे.

नेहरू स्टेडियमच्या आसनक्षमतेत वाढ नाही

$
0
0
महापालिकेने उभारलेल्या नेहरू स्टेडियममधील आसन क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत अखेर मंगळवारी मागे घेण्यात आला.

‘PMP’च्या ताफ्यातील ४५० बस बाद

$
0
0
‘पीएमपी’च्या ताफ्यात असणाऱ्या १५० बसेस बाद करण्यात येणार असून, भाडेतत्त्वावरील ३२७ बसेसचा वापर मार्च महिन्यापासून बंद करण्यात येणार आहे.

हळदी कुंकवामुळे ट्रॅफिक जॅम

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हळदी कुंकू कार्यक्रमामुळे मंगळवारी नागरिकांना मनस्ताप भोगावा लागला. या कार्यक्रमासाठी बाहेरगावाहून आलेल्या अनेक गाड्यांच्या पार्किंगमुळे बीएमसीसी रोड, सेनापती बापट रोड, प्रभात रोडवर ट्रॅफिक जॅम झाला होता.

तो ‘इब्राहिम’ आहे तरी कोठे?

$
0
0
इं​​डियन मुजाहिदीनचा (आयएम) म्होरक्या यासिन भटकळला तीन वेळा पुण्यातील स्वारगेट ‘एसटी स्टँड’वर स्फोटके देण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.

गेली परीक्षाच घ्यायची राहूनि…!

$
0
0
पुणे विद्यापीठाने परीक्षांविषयी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्याचा ‘एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट’चा कारभार कॉलेजच्याच विद्यार्थ्यांचे एक सत्र वाया घालविणारा ठरला आहे. कॉलेजने परीक्षेसाठीच्या नियोजनातील एका विषयाची परीक्षाच न घेतल्याने कॉलेजमधील ‘एमएमएम’च्या प्रथम सत्रातील विद्यार्थ्यांना परीक्षेलाच बसता आले नाही.

राजना अटक करा, मलाही करा पण...

$
0
0
‘आम्ही कोणत्याही कारवाईला घाबरत नाही. राजसाहेबांना अटक करा, हवे तर मलाही अटक करा. मात्र, टोल रद्द झालाच पाहिजे’, असे ठणकावून सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी टोलविरोधी आंदोलनातील मनसैनिकांचे अभिनंदन केले.

‘शिष्याइतकीच मेहनत गुरूचीही!’

$
0
0
तीन घराण्यांची परंपरा आपल्या स्वतंत्र गायन शैलीतून रसिकांसमोर अप्रतिम पद्धतीनं उलगडत नेणारे आणि गुरूकुल पद्धतीवर नितांत श्रद्धा ठेवत उत्तमोत्तम शिष्य घडवणारे हाडाचे शिक्षण आणि प्रसिद्ध गायक पं. उल्हास कशाळकर यांच्याशी ‘गान सरस्वती महोत्सवा’च्या निमित्तानं केलेली बातचीत...

वन्यक्षेत्राची ‘ब्लू प्रिंट’ लवकरच!

$
0
0
वन्यप्राण्यांबरोबरच वनसंपदा आणि जंगलातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी वन विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ‘ट्रान्सेक्ट लाइन’ पद्धतीमुळे लवकरच भीमाशंकरसह पुण्यातील सर्व टेकड्याची ‘ब्लू प्रिंट’ उपलब्ध होणार आहे.

बसरापूर देतेय पाणीबचतीचा धडा!

$
0
0
उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईच्या बातम्या सुरू होण्यास आता काही दिवसांनी सुरुवात होईल. मात्र, भोर तालुक्यातील बसरापूर या गावाने पाणीबचतीचा एक नवा धडा गिरवला आहे. भाटघर धरणाच्या काठावर ५२७ लोकसंख्या असणाऱ्या या गावाने गेल्या दशकापासून विकासाचे टप्पे पार करून पाणीप्रश्नाला प्राधान्य देऊन महिना तीन लाख लिटर पाण्याची बचत केली.

सांगवी बसस्थानक महिनाभरात सुरू

$
0
0
शिवाजीनगर बसस्थानकावर वाढलेला एसटीच्या वाहतुकीचा भार लवकरच कमी होणार आहे. येत्या महिन्याभरात सांगवी येथील बसस्थानक सुरू करण्यात येणार आहे. या नव्या स्थानकामुळे औेंध, सांगवी, वाकड भागातील प्रवाशांची सोय होणार आहे.

विचित्र अपघातात पादचारी ठार

$
0
0
कात्रज बायपासवर मंगळवारी रात्री नवले पुलाच्या कडेला उभे असलेल्या तिघांना वेगात आलेल्या ट्रकने उडविल्यामुळे एक पादचारी ठार झाला. तर, दोघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंहगड रोडजवळील कॅनॉलची दुरवस्था

$
0
0
बिनधास्तपणे डुबक्या मारणारे तरुण.. कपडे धुणाऱ्या महिला... फेकून दिले जाणारे निर्माल्य-कचरा... छोटा पंप लावून केली जाणारी पाणीचोरी... कधीतरी बुडून युवकाच्या मृत्यु झाल्याच्या बातम्या... सिंहगड रोडच्या कॅनॉलची ही सध्याची परिस्थिती.

हौशी रंगकर्मी यंदाही संमेलनापासूनच दूरच?

$
0
0
नाट्य संमेलनामध्ये युवा वर्गाचा सहभाग वाढविण्यासाठी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सुमारे चारशे संस्थांना परिषदेकडून निमंत्रणाचे पत्र पाठविण्यात आले. मात्र, पुण्यातील काही संस्थांना हे पत्र आणि संमेलनाची कार्यक्रम पत्रिकाच मिळालेली नाही.

एकपात्री अभिनयाची पन्नाशी संमेलनाच्या मांडवाखाली

$
0
0
बालनाट्य चळवळीतील योगदानामुळे सर्वांच्या परिचयाचे असलेले ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश पारखी त्यांच्या एकपात्री अभिनय कारकिर्दीची पन्नाशी साजरी करत आहेत.

मित्रत्वाच्या नात्याने ४ गोष्टी सांगणार

$
0
0
‘नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड होणे हीच रंगभूमीवरील बदलाची नांदी आहे. या संमेलनात युवा कलावंतांशी रंगभूमीविषयक चर्चा करण्यासाठी मी उत्सुक आहे.

भूसंपादन भरपाईसाठी पालिकेवरील बोजा वाढणार

$
0
0
पालिकेच्या विविध प्रकल्पांच्या भूसंपादनाकरिता जागा ताब्यात घेण्यासाठी नवीन भूसंपादन कायदा २०१३ नुसार भरपाई द्यायची झाल्यास, पालिकेवरील बोजा आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

तळजार्इ उद्यान प्रकल्पांसाठी मोबदला देण्याचे आदेश

$
0
0
तळजाई पठारावर महापालिका आणि वन विभागातर्फे संयुक्तपणे राबविण्यात येणाऱ्या वन उद्यान प्रकल्पासाठी नव्याने जागा ताब्यात घेताना जागामालकांना नव्या भूसंपादन कायद्यान्वये मोबदला देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

शिवाजी मार्केटभोवती उभारणार ‘पार्किंग झोन’

$
0
0
कॅम्पमधील छत्रपती शिवाजी मार्केट परिसरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पुणे कँटोन्मेंट बोर्डाने हा परिसर ‘पार्किंग झोन’ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

‘डॉ. सलीम अली अभयारण्यात सुरक्षारक्षक नेमावेत’

$
0
0
येरवड्यातील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असून, त्याला आळा घालण्यासाठी महापालिकेने तातडीने सुरक्षारक्षक नेमावेत, अशी सूचना राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी बुधवारी केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images