Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

PMP विभाजनाचा फेरविचार करा

$
0
0
‘पीएमपी’च्या विभाजनाचा ठराव करणाऱ्यांनी पुन्हा या विषयाचा बारकाईने विचार करावा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पुणे महापालिकेच्या कारभाऱ्यांना दिला आहे.

विद्यापीठ कायद्यात लवकरच बदल?

$
0
0
विद्यापीठ कायद्यात बदल करून नवा कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकार लवकरच अध्यादेश काढणार असल्याचे समजते. राज्य सरकारने नेमलेल्या डॉ. अरुण निगवेकर समितीने सध्याच्या विद्यापीठ कायद्यात हे बदल सुचवले होते.

‘राष्ट्रवादी हटाओ, शहर बचाओ’

$
0
0
‘पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे उल्हासनगरच्या धर्तीवर कायम करता आली असती. मात्र, येथील सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केवळ अश्वासने देवून जनतेची फसवणूक केली,’ असा आरोप करीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा पंकजा मुंडे-पालवे यांनी केला.

'‘ऑफर’चे आरोप रागाच्या भरात'

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याची कबुली दिल्यास आपल्याला २५ लाख रुपये देण्याची ‘ऑफर’ दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारिया यांनी दिली होती, असा आरोप आपण रागाच्या भरात केला होता, असं स्पष्टीकरण या हत्येप्रकरणातील प्रमुख संशयित मनीष नागोरी याने आज कोर्टात केले.

मांढरदेवी यात्रेचे गणित बदलले

$
0
0
वाई तालुक्यातील मांढरदेवीच्या डोंगरावरील काळुबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी गेल्या काही वर्षांपासून आपले वेळापत्रक बदलल्याचे चित्र दिसत आहे. २००५ मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर तेथील प्रशासनाने यात्रेच्या नियोजनामध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले.

‘पूर्वेच्या महाद्वारा’चा बदलता चेहरा

$
0
0
गेल्या दशकामध्ये पुण्याचा मोठा विस्तार झाला आहे. काही प्रमाणातील नियोजित विकासाबरोबरच जनतेच्या रेट्यामुळे शहराच्या सर्व बाजूंना उपनगरे वसली गेली आहेत. काय आहे तेथील पायाभूत सुविधांची स्थिती? तेथील नागरिकांच्या महापालिका प्रशासनाकडून काय अपेक्षा आहेत?

सहायक आयुक्त‌ काय म्हणतात?

$
0
0
संमगवाडी क्षेत्रीय कार्यालयातील प्रश्नांबाबत संगमवाडीच्या सहायक आयुक्त संध्या गांगरे यांच्याशी केलेली बातचीत...

आरोपीची पोलिसांना तुरी

$
0
0
शुक्रवार पेठेतील हॉटेल प्यासाजवळ फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी हैदराबाद पोलिसांच्या तावडीतून नुकताच सुटला. खडक पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

औद्योगिक प्रदर्शनासाठी ५० कोटी

$
0
0
पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे २०१४-१५ चे सुमारे १०५ कोटी रुपये शिलकीचे बजेट मंगळवारी (२८ जानेवारी) मंजूर करण्यात आले. कोणत्याही नावीन्यपूर्ण योजनेचा समावेश नसलेल्या या बजेटमध्ये गृहप्रकल्पांसाठी एकूण जमेच्या केवळ दहा टक्के रकमेची तरतूद करण्यात आली आहे.

‘डीबीटी’ साठी शेवटचे ३ दिवस

$
0
0
गॅस सिलिंडरचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेमध्ये (डीबीटीएल) सहभागी होण्यासाठी आता फक्त तीन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या योजनेला मुदतवाढ मिळण्याबाबत जिल्हा प्रशासन व गॅस कंपन्याही अजून अंधारातच आहेत.

साखरेच्या घसरत्या दरांमुळे कारखानदारांत नाराजी

$
0
0
साखरेच्या घसरत्या दरामुळे राज्याच्या विविध भागांमधील सहकारी साखर कारखान्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. पुण्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत या नाराजीचे पडसाद उमटले. काही सट्टेबाजांनी वायदे बाजाराद्वारे साखरेचे दर पाडल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.

महसुली गावठाणाचा भिलारेवाडीला दर्जा बहाल

$
0
0
कात्रजलगतच्या भिलारेवाडीला महसुली गावठाणाचा दर्जा देण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी काढली आहे. गावठाणाचा दर्जा मिळाल्याने या गावात आता बांधकामांना एक चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळणार आहे.

शेतकरी, उद्योगांना वीजदरात सवलत

$
0
0
‘सर्वसामान्य वीजग्राहक, शेतकरी, व्यावसायिक आणि उद्योगांना वीजदरांमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने राज्य सरकारच्या तिजोरीवर दरमहा सातशे कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

बेकायदा होर्डिंग्जचा कँटोन्मेंट बोर्डाला फटका

$
0
0
आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या तिजोरीत होर्डिंग्जच्या माध्यमातून भर पडण्याऐवजी ​तिजोरी रिकामी होण्यास होर्डिंग्ज कारणीभूत ठरत आहेत. बेकायदा होर्डिंग्ज काढण्यासाठी सुमारे तीन लाख ७९ हजार रुपयांचा भुर्दंड बोर्डाला सोसावा लागणार आहे.

दादांच्या आदेशाला केराची टोपली

$
0
0
शहरातील भिंती रंगवून शहर विद्रूप करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला पोलिसांनी केराची टोपली दाखविली आहे. शहर विद्रूप करणाऱ्या ९२ तक्रारी महापालिका प्रशासनाने पोलिसांकडे दिलेल्या आहेत.

‘पंढरीची वारी’ हुकणार

$
0
0
नाट्यसंमेलनामध्ये नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा नाट्य परिषदेचा प्रयत्न असफल ठरला आहे. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील नाट्य विभागापर्यंत परिषदेचे निमंत्रणच अद्याप पोहोचले नसल्याने विद्यार्थ्यांची ‘पंढरीची वारी’ हुकणार आहे.

कॉलेज प्राचार्यांची मुदत १० वर्षे होणार?

$
0
0
कॉलेज प्राचार्यांची मुदत पाचवरून दहा वर्षे करण्याचा विचार विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) करत असल्याचे समजते. प्राचार्यांसाठी पाच वर्षांची मुदत फारच अपुरी असल्याचे आणि त्यामुळे अनेक पात्र उमेदवार पद नाकारत असल्याचे संस्थाचालकांचे म्हणणे आहे.

सोनसाखळी चोऱ्यांचे सत्र सुरूच

$
0
0
सहकारनगर, बिबवेवाडी आणि नवी सांगवी परिसरात सोनसाखळी हिसकावण्याचे गुन्हे करून चोरट्यांनी गेल्या दोन दिवसांत साडेसोळा तोळ्याचे दागिने हिसकावले आहेत. या प्रकरणी दुचाकीवरील दोघा संशयितांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती टोलनाका मनसेकडून बंद

$
0
0
टोलवसुलीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुकारलेले आंदोलन मंगळवारीही सुरूच होते. बारामती-मोरगाव रस्त्यावरील टोलनाक्यावर सुरू असलेली टोलवसुली मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बंद पाडली.

बीआरटी मार्गावरील कामे प्रलंबितच

$
0
0
आळंदी आणि नगर रोडवरील जलद बस वाहतूक प्रकल्प (बीआरटी) प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने समाधानकारक असल्याचा दावा पालिका प्रशासनातर्फे केला जात असला, तरी या बीआरटी मार्गावरील अनेक कामे प्रलंबित असल्याचे निरीक्षण ‘सेफ्टी ऑडिट रिपोर्ट’मध्ये नोंदविण्यात आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images