Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अनोख्या स्वरांची सूरमयी सफर

$
0
0
भक्तीमय अशा ‘अल्ला तेरो नाम’ या या गाण्यानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘सुहानी रात ढल चुकी’, ‘आईये मेहेरबान’, ‘रंग और नूर कि बात’, ‘वो चांद खिला’, ‘कोई खडे खडे’, ‘मुझे मिल गये हमदम’ अशी एकापेक्षा एक सुंदर गाणी सादर होत गेली आणि रसिक प्रेक्षक त्यामध्ये तल्लिन होत गेले.

अर्पिता ठरली ‘महाराष्ट्र गंधर्व’

$
0
0
फ्युजन, रॉक-पॉपच्या ट्रेंडमध्ये आपल्या संगीताचा पारंपरिक ठेवा आत्ताच्या पिढीनं आत्मसात करावा आणि त्यात नवे कलाकार तयार व्हावेत, या हेतूनं लायन्स क्लब पुणे सहकारनगरच्या वतीनं एक विशेष महोत्सव हाती घेतला आहे. याअंतर्गत झालेल्या नाट्यसंगीत आणि हार्मोनियम वादन स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पार पडली.

त्यानं जिंकलं!

$
0
0
एखाद्या प्रसिद्ध मालिकेतला हिरो म्हणजे चाहत्यांसाठी क्रशच. कॉलेजच्या तरुणी तर त्याच्यावर जाम फिदा असतात. प्रसिद्ध टीव्ही कलाकार गुरमित चौधरीनं कमिन्सच्या कॅम्पसमध्ये एंट्री घेतली आणि त्याच्या अशा अचानक येण्यानं कॅम्पसचा माहोल एकदम रंगून गेला.

स्वरस्मरणातून शिष्यांची गुरुवंदना

$
0
0
मारवा, मारुबिहाग आणि बिहाग रागानं घडवलेला भीमसेनी स्वरांचा साक्षात्कार, दिग्गज शिष्यांच्या भावपूर्ण गायकीनं गुरूला दिलेली स्वरवंदना, सरोदच्या मधुर स्वरांनी केलेली सांगता अशा वातावरणात स्वरस्मरण मैफिलीनं भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या आठवणी जागवल्या.

स्मरणयात्रा देशभक्तांची

$
0
0
प्रजासत्ताकदिनाची सकाळ. कोठूनतरी कानी येणारे गाण्यांचे सूर. झेंडावंदन संपवून, हाती छोटे झेंडे घेऊन निघालेली मुलं आणि या साऱ्या भारून टाकणाऱ्या वातावरणात निघालेला ‘बलिदानाची गाथा’ सांगणारा हेरिटेज वॉक! रविवारी (दि. २६) रोजीचा हेरिटेज वॉक क्रांतिकारकांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कार्याची, त्यागाची आणि बलिदानाची माहिती घेण्याचा होता.

स्वरसमाधीची अनुभूती

$
0
0
आलोकदास गुप्ता यांच्या सतारीचा झणकार... रोनिता डे यांचं सुरेल शास्त्रीय गायन... पं. रोणू मुजुमदारांच्या बासरी आणि पं. तरुण भट्टाचार्यांच्या संतूर वादनाच्या जुगलबंदीमुळे प्रेक्षकांना स्वरसमाधीची अनुभूती मिळाली. निमित्त होतं, हिंदुस्थान आर्ट अँड म्युझिक फाउंडेशन आणि पिंपरी-चिंचवड प्रबोधन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय संगीतमय कार्यक्रमाचं.

संमेलनाचा खर्च १ कोटी ७६ लाख

$
0
0
सासवड येथे झालेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा खर्च एक कोटी ७६ लाख रुपये झाला असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.

झोपडपट्टीधारकांना न्याय देणार

$
0
0
‘झोपटपट्टी पुनर्वसन योजनेतून (एसआरए) प्रत्येक झोपडीधारकाला ३५० स्क्वेअर फूटऐवजी ५०० स्क्वेअर फुटाचे मोफत घर त्याच जागी मिळावे, एसआरएसाठी १९९५ ऐवजी २००५ च्या झोपडपट्ट्यांना अधिकृत धरून रेल्वे, वन तसेच हवाई उड्डाण विभागांच्या जमिनीवरील झोपड्यांनाही एसआरए योजना लागू करावी,’ अशी मागणी शहराचे खासदार सुरेश कलमाडी यांनी केली.

उर्से टोलनाक्याची तोडफोड

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलविषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्यानंतर सोमवारी मध्यरात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वरील उर्से टोल नाक्याची तोडफोड केली. टोलनाक्यावरील सहा बूथ आणि चार कम्प्युटरची तोडफोड करून टोलवसुली बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात केला.

१७.२५ लाख कुटुंबे ‘DBTL’पासून तुटलेलीच

$
0
0
सिलिंडरवरील अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेसाठी (डीबीटीएल) चार दिवसांचीच मुदत शिल्लक असताना शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील तब्बल सव्वासतरा लाख कुटुंबांची अजूनही या योजनेमध्ये नोंदणी झालेली नसल्याचे समोर आले आहे.

‘प्यासा’च्या मालकासह चौघांना शिक्षा

$
0
0
दुकानासमोरील गाड्या काढून घ्यायला सांगितल्याच्या रागातून दुकानदाराला काठीने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी प्यासा हॉटेलचा मालक बाळासाहेब ऊर्फ नरसिंह ढेरे याच्यासह चौघांना एक वर्ष कैद आणि प्रत्येकी आठशे रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

रंगभूमी, लोककलांसाठी ‘अर्काइव्हल वेब पोर्टल’

$
0
0
मराठी रंगभूमीच्या समृद्ध इतिहासाचे केवळ गोडवेच गाणारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आता वेब पोर्टलच्या माध्यमातून हा ठेवा पुढील पिढीपर्यंत नेण्यासाठी पावले उचलत आहे. आगामी नाट्य संमेलनाच्या माध्यमातून हा प्रयोग कार्यान्वित केला जाणार आहे.

‘प्रॉपर्टी टॅक्समध्ये दरवाढ नको’

$
0
0
शहरातील प्रॉपर्टी टॅक्समध्ये वाढ करण्यासाठी मागील वर्षी सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी पाठींबा दिला. पालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाने राबविलेल्या मोहिमांमुळे १६ कोटी रुपयांच्या नवीन मिळकतींना टॅक्स लावण्यात आला असून, नव्याने २३ हजार मिळकती टॅक्समध्ये समाविष्ट झाल्या.

दर-करार डावलून स्टील फर्निचरची खरेदी

$
0
0
शालेय फर्निचरची खरेदी करताना सरकारने ठरवून दिलेला दर-करार डावलून महापालिकेच्या शिक्षणमंडळाने टेंडर काढून फर्निचरची खरेदी करण्याचा घाट घातल्याने पुणेकरांच्या कराचे पंचवीस लाख रुपये पाण्यात जाणार आहेत.

... त्या कचरा बकेट्स पालिकेच्या नाहीत

$
0
0
अंदमान निकोबार येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या बकेट्स महापालिकेच्या नसल्याचा प्राथमिक अहवाल पालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने आयुक्त कार्यालयाला दिला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची सूचना या अहवालात नोंदविण्यात आली आहे.

‘...तर भाजप-शिवसेना काय ‘साप’ आहे?’

$
0
0
दिल्लीत कोणी ‘आप’ म्हणून आले आहे... तर आता कोणी म्हणतो आम्हीच महाराष्ट्राचे ‘बाप’ आहोत... तर भाजप सेनेला काय ‘साप’ म्हणावे की ‘ताप’ म्हणावे, अशा शब्दांत विरोधकांची गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी खिल्ली उडविली.

डॉ. परदेशी यांच्या बदलीबाबत हमी नाही

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली ही प्रशासकीय बाब असून, जनतेने पाच वर्षे निवडून दिलेल्या सरकारचा तो अधिकार आहे.

फुरसुंगी-उरळीचे ग्रामस्थ ‘प्रकल्पग्रस्त’

$
0
0
फुरसुंगी-उरळी येथील ग्रामस्थांना पालिकेमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळावी, यासाठी त्यांना ‘प्रकल्पग्रस्त’ म्हणून मान्यता देऊन पुनर्वसन दाखले तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केल्या.

‘फोटोकॉपी’चा निर्णय पुन्हा वादात

$
0
0
उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी आणि पुनर्मूल्यांकनाचे शुल्क कमी करण्याबाबत पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने नुकताच घेतलेला निर्णय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

‘ईपीएफओ’ झाले बेघर

$
0
0
कँटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य इमारतीमध्ये भाडेतत्त्वावर असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) कार्यालयाने कराराचे नूतनीकरण न केल्याने जागा रिकामी करण्याची नोटीस बोर्डाने ‘ईपीएफओ’ कार्यालयाला बजावली आहे. त्यामुळे ‘ईपीएफओ’चेच भविष्य अधांतरी झाले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images