Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अवकाळी पावसाने द्राक्षाला झोडपले

0
0
गुरुवारी सायंकाळी तासभर झालेल्या अवकाळी पावसाने येथील द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पावसाने टपोऱ्या थेंबांसह गारांचाही वर्षाव केल्याने द्राक्ष प‌िकाला मार बसला आहे.

सोनसाखळी चोरीचा लोहगावात गुन्हा

0
0
लोहगाव येथे खेसे पार्क येथून पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडला. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालकांना मारहाण; ३ कार पळविल्या

0
0
कात्रज-कोंढवा रोड आणि परिसरात गेल्या काही दिवसांत कार चालकांना अडवून मारहाण करत तीन कार पळवून नेण्याचे प्रकार घडले आहेत. कोंढवा, हडपसर आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल असून आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

ऐन थंडीत पावसाची हजेरी

0
0
ऐन थंडीच्या जानेवारी महिन्यात थंडी गायब झालेली असतानाच शुक्रवारी पुण्यात पावसाने हजेरी लावली. दुपारी आणि सायंकाळी पावसाच्या काही हलक्या सरी कोसळल्या. शहरात शुक्रवारी सायंकाळपर्यंत ०.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पिंपरीत एका रात्रीत २ खून

0
0
पूर्वीच्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर तलवारीने वार करून तसेच डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना भोसरीतील लांडगे वस्तीजवळील मैदानात घडली. भैरव नंदकुमार देसाई (वय २१, रा. लांडगे चाळ) शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

समेटासाठी समुपदेशकच हवा

0
0
कौटुंबिक नात्यांची घट्ट वीण टोकाची भूमिका घेतल्यामुळे सैल होऊन घरातील चार भिंतीतील वाद थेट कोर्टात जाऊन पोहोचतात. फॅमिली कोर्टात दाखल होणाऱ्या केसेसमध्ये कळीचे ठरलेले मुद्दे शोधून पक्षकारांमध्ये समेट घडवून आणणाऱ्या समुपदेशकांची फॅमिली कोर्टात महत्त्वाची भूमिका ठरते आहे.

‘मिल्क बँक’ भागवतेय बालकांची भूक

0
0
‘अमृतासमान असलेले दूध मी स्वतःच्या बाळाला देऊ शकले नाही, पण मग त्याचा उपयोग एखाद्या नवजात बाळाला झाला तर तो मातृत्त्वाचा योग्य सन्मान ठरेल…’ या भावनेतून अवघ्या सहा महिन्यांचं मूल गमविलेल्या रिझवान शाह या नियमित ‘मिल्क बँके’मध्ये दूध जमा करतात.

मेट्रो मार्गावर उंचच उंच इमले

0
0
शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूस पाचशे मीटरच्या सर्व मिळकतींना चार एफएसआय देण्याचा प्रस्ताव शुक्रवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

थंडीत ‘अॅलर्जी’ग्रस्तांना श्वसनविकाराचा धोका

0
0
विविध प्रकारची ‘अॅलर्जी’ असलेल्या पेशंटमध्ये थंडीदरम्यान श्वसनासह दम्याचे विकार बळावण्याची अधिक शक्यता असल्याने त्यांचा जीव धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत अॅलर्जीग्रस्तांनी काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

सावकारीला पाच वर्षांची शिक्षा

0
0
बेकायदा सावकारी वा बळजबरीने कर्जवसुली करणाऱ्या सावकारांना आता पन्नास हजार रुपये दंड आणि पाच वर्षांपर्यंतची शिक्षा करण्याची तरतूद नव्या सावकारी कायद्यात करण्यात आली आहे.

हृदयरोगावर पुण्यात मोफत ऑपरेशन

0
0
खासगी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार महागडे ठरत असताना गरिबांच्या हृदयरोगाच्या ऑपरेशनची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आता खासगी - सरकारी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून पुण्यासह राज्यातील काही निवडक जिल्हा हॉस्पिटलमध्ये सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

व्रत स्वीकारलेला आदर्श डॉक्टर

0
0
राजकारण आणि समाजसेवा हा अलीकडे व्यवसाय होऊ पाहत आहे. पण समाजकारण आणि राजकारण कसे असावे असा आदर्श वस्तुपाठ पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. शंकरराव महादेव तोडकर यांनी घालून दिला आहे. मंगळवार पेठेसारख्या ‘दुर्लक्षित’ भागात तोडकर हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी पेशंट सेवेचा आदर्श उभा केला.

संवर्धनासाठी वन विभाग सरसावला

0
0
माळढोक पक्ष्याच्या संवर्धनासाठी सातत्याने विविध उपाय राबविणाऱ्या महाराष्ट्र वन विभागाने आता माळढोकचा संवर्धनात्मक प्रजनन प्रकल्प सुरू करण्याची मागणी केंद्र सरकारला केली आहे. एवढेच नव्हे तर यासाठी ४० कोटी रुपयांची तरतुदची तयारीही दर्शविली आहे.

''पद्मश्री' स्वीकारताना मनात दुःख'

0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर हयात असताना हा सन्मान त्यांना प्राप्त झाला असता, तर अधिक आनंद झाला असता

रुपाली ठोंबरे यांना अटक

0
0
राज ठाकरे यांनी टोलवसुलीला विरोध केल्यानंतर पुण्यात टोलनाक्यावर तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या नगरसेविका रुपाली ठोंबरे यांना अटक करण्यात आली आहे. ठोंबरे यांची चौकशी करुन पोलीस मनसेच्या आणखी काही कार्यकर्त्यांची धरपकड करण्याची शक्यता आहे.

अजित पवारांचा टोलफोडीवरून इशारा

0
0
आपल्याला विरोध करायचा असल्यास लोकशाही मार्गाचा वापर जरूर करावा. मात्र उगाचच लोकांच्या भावना भडकावून मारा-झोडाचे आदेश देणाऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट तंबी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

'डॉ. परदेशींच्या बदलीबाबत हमी नाही'

0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीबाबत आपण कोणतीही हमी देऊ शकत नाही असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. परदेशी यांच्या बदलीचे सूतोवाच केले.

‘म्युझिक क्लिनिक’मध्ये रमले रसिक

0
0
‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’ या गाण्यापासून ‘जीना इसी का नाम है’पर्यंतची गाणी पेश करून संगीताद्वारे स्वास्थ्य कसे मिळवता येईल, याचं मर्म उलगडण्याचा प्रयत्न डॉ. राहुल जोशी यांनी ‘म्युझिक क्लिनिक’ या कार्यक्रमात केला. सिंबायोसिस सांस्कृतिक महोत्सवांतर्गत झालेल्या या कार्यक्रमास वृद्धांच्या टाळ्यांपासून तरूणाईच्या शिट्ट्यांपर्यंत उत्स्फूर्त दाद मिळाली.

सावरकरांच्या कविता सीडीमधून भेटीला

0
0
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता आणि गजलांच्या ‘हम ही हमारे वाली है’ या सीडीचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं. त्या वेळी ते बोलत होते.

कारेकरांना पुरस्कार प्रदान

0
0
‘कलेमुळे आयुष्याला प्रयोजन मिळतं,’ अशा शब्दांत प्रख्यात बासरीवादक पं. रोणू मुजुमदार यांनी आपल्या भावना नुकत्याच व्यक्त केल्या. निमित्त होतं, सातव्या मधुरिता सन्मान प्रदान सोहळ्याचं.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images