Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हिंदोळा ‘आधार’-‘निराधार’चा

$
0
0
आधार कार्ड असलेले नागरिक एलपीजी क्रमांकाशी बँक खात्याची जोडणी करीत नसल्याने प्रशासन हताश; आणि सिलिंडरचे अनुदान कसे मिळणार, या चिंतेत आधार कार्डे नसलेले नागरिक हैराण....

कचरा वेचण्याला ‘स्वच्छ’ची सोडचिठ्ठी

$
0
0
कचरा गोळा करण्याबाबत केलेला करार संपून चार महिने उलटले, तरी तीस लाख रुपयांची थकबाकी न दिल्यामुळे ‘स्वच्छ’ या संस्थेने महापालिकेबरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.

नोटा बदलण्यावरून सामान्यांत संभ्रम

$
0
0
एक जुलैपासून २००५ पूर्वीच्या नोटा चलनातून काढून टाकण्यात येणार असल्या, तरी त्या बदलून मिळणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट करूनही गुरुवारी लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.

होय, आम्हाला घटस्फोट मंजूर आहे...!

$
0
0
सहजीवन सुरू केल्यानंतर होणारे मतभेद... एकमेकांमध्ये वाढलेला विसंवाद... कोणत्याही तडजोडीला तयार नसणे... पालकांचा संसारात वाढणारा हस्तक्षेप... तर कधी जोडीदार निवडण्यात झालेली चूक अशी अनेक कारणे घटस्फोटला कारणीभूत ठरत आहे.

बदल्यांमुळे अधिकारी धास्तावले

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वजिल्हा व एका जिल्ह्यात तीन वर्षे कार्यकाळ झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्याने महसूल अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

तरुणीसह वृद्धाला अटक

$
0
0
​देखभाल करण्यासाठी येणाऱ्या तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी ७७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे; तर या प्रकरणातील पीडित तरुणीविरुद्ध संबंधित व्यक्तीला धमकावून २५ लाखाची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिलाही अटक करण्यात आली आहे.

दुमदुमला विश्रामबागवाडा

$
0
0
डफावरची दणकेबाज थाप.. ढोलकीचा तडफदार ताल... सनई आणि पेटीचे सूर आणि शाहिराचा खणखणीत आवाज.. अंगावर रोमांच उभे करणारे शब्द आणि दुमदुमलेला विश्रामबागवाडा..

परदेशींवरून NCPत दुफळी

$
0
0
​पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीच्या मुद्यावरून शहरात पक्षीय गट निर्माण झाले आहेत. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दुफळी निर्माण झाली असून, राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष आझमभाई पानसरे यांनी डॉ. परदेशी यांना पाठिंबा दर्शविला आहे.

पीएमपीचे करा विभाजन

$
0
0
शहरातील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या पुणे महानगर परिवहन लिमिटेड कंपनीच्या (पीएमपीएमएल) सक्षमीकरण करण्याच्या जबाबदारीतून सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी सपशेल माघार घेतली. ‘

स्कूल चले हम...

$
0
0
शाळेच्या आवारातला भिंगरीचा झेंडा घ्यावा म्हणून केला जाणारा हट्ट, पांढराशुभ्र ड्रेस, गांधी टोपी आणि करकरते कॅनव्हास शूज घालून सकाळी सहा-६.३० वाजताच शाळेत लावलेली हजेरी, समूहगीत गाण्यासाठी केलेली जय्यत तयारी, ते गाताना लावलेला उंच टिपेतला स्वर... ध्वजवंदन होताना मनात काठोकाठ दाटलेला अभिमान, एनसीसी किंवा आरएसपीच्या कडक इस्त्री ड्रेसमध्ये डोकावणारी अभिमानाची भावना... अर्थातच १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीचा माहोल...

जाणून घेऊ ‘गाथा बलिदानाची’

$
0
0
प्रजासत्ताकदिनाचं औचित्य साधून या रविवारचा (दि. २६) हेरिटेज वॉक स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती जागवत होणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वावर पाणी सोडलेल्या क्रांतिकारकांच्या निवासस्थानांना भेटी देत ‘गाथा बलिदानाची’ हा हेरिटेज वॉक होईल. पुणे विद्यार्थी गृहाच्या प्रवेशद्वारापासून सकाळी १० वाजता या वॉकला सुरुवात होईल.

निनादणार स्पेनचं जलतरंग

$
0
0
सतरा वर्षापासूनची दीर्घ परंपरा असलेला पं. एस.व्ही. कान्हेरे स्मृती समारोह यावेळी १ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या एकदिवसीय महोत्सवामध्ये भारतीय कलाकार आपली कला पेश करणार आहेतच; शिवाय स्पेनमधील एक जलतरंगवादकही यंदाच्या महोत्सवाला चारचांद लावणार आहे.

सुरक्षित ‘एक्स्प्रेस-वे’साठी आज ‘मुक्ती’

$
0
0
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे अपघातमुक्त करण्यासाठी फुलोरा फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘मुक्ती ः वर्ल्ड फ्युजन म्युझिक’ या बँडची मैफिल आज (दि. २५) रंगणार आहे. टिळक स्मारक मंदिर इथं रात्री आठ वाजता हा कार्यक्रम होईल.

सुरेल सफर मंतरलेल्या चित्रबनाची

$
0
0
‘एक धागा सुखाचा’, ‘एकवार पंखावरूनी’, ‘जीवनात ही घडी’, ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘मानसीचा चित्रकार’, ‘सूर तेच छेडीता’, ‘हे चिंचेचे झाड’, ‘धुंदी कळ्यांना’, ‘स्वप्नात रंगले मी’, ‘मला लागली कुणाची उचकी’, ‘गोमू संगतीनं’, ‘फिटे अंधाराचे जाळे’ ही मराठी सिनेसंगीताच्या सुवर्णकाळाची सुरेल सफर ‘मंतरलेल्या चित्र बनात’ कार्यक्रमानं घडवली.

कामचुकार वाहतूक पोलिसांना ‘नो एंट्री’

$
0
0
ड्युटीच्या वेळी चौका-चौकांत कोंडाळे करून गप्पा मारत उभ्या राहणाऱ्या २२ वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, त्यांना पोलिस मुख्यालयात रवाना करण्यात आले आहे.

रस्ता कामाच्या दिरंगार्इवरून रास्ता रोको

$
0
0
वडगाव बुद्रूक येथे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात होणाऱ्या दिरंगाईच्या निषेधार्थ युवा कॉँग्रेसचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन केले.

बांधकाम कोसळून २ मजुरांचा मृत्यू

$
0
0
नाणेघाटाजवळील अंजनावळे शासकीय आश्रमशाळेच्या वसतिगृहाचे सुरू असलेल्या बांधकामात बीम कोसऴून दोन मजुरांचा मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.

दिवाळखोरीतील उद्योगांसाठी अभय योजना

$
0
0
पुनरुज्जीवनक्षम नसलेल्या व बंद पडलेल्या उद्योगांना नवसंजीवनी देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अभय योजना सुरू केली आहे.

ब्रिटनमधील जाचक अटी रद्द करण्यासाठी प्रयत्न

$
0
0
‘उच्च शिक्षणासाठी ग्रेट ब्रिटनमध्ये येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही खरोखरीच हुशार विद्यार्थ्यांना या संधीपासून वंचित राहावे लागत आहे.

रुपीच्या ठेवीदारांना दिलासा कधी मिळणार?

$
0
0
सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये रुपी को-ऑपरेटिव्ह बँक विलीन होण्याचा निर्णय लांबणीवर पडल्याने आणि तूर्तात कोणत्याही नव्या बँकेकडून रुपी बँक विलीन करण्याबाबत प्रस्ताव समोर आला नसल्याने बँकेचे ठेवीदार आणि सभासद यांना दिलासा कसा मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images