Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कात्रज डेअरीची ‘मलई’ दादा, पतंगरावांना नाहीच

0
0
कात्रज डेअरीची पाच एकर जागा बड्या मंत्र्यांच्या शिक्षण संस्थांना देण्याच्या प्रयत्नांना मुंबई हायकोर्टाने चाप लावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि वनमंत्री पतंगराव कदम यांच्या भारती विद्यापीठास येथील पाच एकर जागा देण्याच्या सरकारच्या निर्णयाला हायकोर्टाने स्टे दिला आहे.

दारूड्या चोरट्यांचा सोनसाखळ्यांवर डल्ला

0
0
गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सोनसाखळी, जबरी चोरी आणि वाहन चोरीचे गुन्हे करणाऱ्या सहा आरोपींच्या टोळीला अटक करण्याची कामगिरी केली. या टोळीकडून साडेसतरा लाख रुपयांचे दागिने आणि चोरीच्या दोन दुचाकी असा साडेअठरा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

शहरात जागोजागी कचऱ्याचे डोंगर

0
0
हंजर प्रकल्पाच्या क्षमतेएवढ्याच गाड्या कचरा डेपोमध्ये सोडण्याची भूमिका फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील ग्रामस्थांनी घेतल्याने शहरातील कचरा प्रश्न बिकट होऊ लागला आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी तयार

0
0
पुणे पोलिस दलातील प्रस्तावित १२० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, त्यांची नावे पोलिस महासंचालक कार्यालयाला पाठविण्यात येणार आहेत.

खासगी सावकारांची कर्जे ८२० कोटींची

0
0
विदर्भ-मराठवाड्यातील नडलेल्या शेतकऱ्यांसह राज्यभरातील सुमारे आठ लाख सामान्य नागरिकांना खासगी सावकारांनी ८२० कोटी रुपयांची कर्जे दिली असून, या कर्जाची दामदुप्पट व्याजाने वसुली करण्यावर आता निर्बंध आणण्यात आले आहेत.

टोल भरल्याशिवाय ये-जा नाही

0
0
पुण्यातून बाहेर पडणाऱ्या वाहनांना टोल भरल्याखेरीज बाहेर पडता येत नसल्याचे चित्र आहे. शहराच्या आजूबाजूच्या भागातून जाणाऱ्या महामार्गावरील टोलची संख्या सहा आहे. टोल भरण्यावरून होणाऱ्या वादामुळे यापैकी दोन टोलनाके कायम चर्चेत असतात.

आरोपींकडील पिस्तुलातूनच हत्या

0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडील पिस्तुलातून हत्या झाल्याची माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली असून, ते पिस्तूल आणि गोळ्या तपासासाठी मुंब्रा पोलिसांकडून ताब्यात मिळावे यासाठी पुणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

मंडळाच्या पैशांतून फ्लेक्स नाही

0
0
महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसाचे फ्लेक्स मंडळाच्या पैशातून लावल्याचा आरोप मंडळाचे अध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी फेटाळला असून, आपल्या वाढदिवसाच्या खर्चाच्या फ्लेक्सचे बिल त्यांनी पुरावा म्हणून दिले आहे.

सुटकेसाठीच मारियांवर आरोप

0
0
दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख राकेश मारिया यांच्यावर आरोप केले, तर डॉ. नरेंद्र दाभोलकर खटल्यातून लवकर सुटका होऊ शकते, असा सल्ला ठाणे जेलमधील एका कैद्याने दिल्यानंतर ​मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांनी लाचखोरीचा आरोप केल्याचे समोर येत आहे.

टोलमुक्ती दूर, पुण्यात जिझिया कर

0
0
टोलच्या विळख्यातून नागरिकांची सुटका करण्यासाठी कोल्हापूर-सांगलीतील राजकीय नेते स्वतः आंदोलनात उतरलेले असताना पुण्यातील लोकप्रतिनिधींनी मात्र या अन्यायकारक वसुलीकडे पाठ फिरविले आहे. उलट शहरात वाहनचालकांची पिळवणूक करणाऱ्या ‘पे अँड पार्क’सारख्या योजना पुणेकरांच्या माथी मारण्यात नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे.

मतदारयादीत नाव नाही?

0
0
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीत नाव समाविष्ट करण्याची आणखी एक संधी येत्या ३१ जानेवारीनंतर मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी राजकीय पक्ष काय प्रयत्न करणार, असा प्रश्न नागरिकांमधून विचारण्यात येत आहे.

‘अलाद्दीन’ पुण्यात

0
0
८२ वर्षीय सुरेश दत्ता ४० वर्षापासून पपेट शो करत आहेत. येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी पुण्यातही हा शो हिंदी भाषेत होणार आहे.

लॉर्ड भावडांना ओ. पी. नय्यर पुरस्कार

0
0
संगीत सृष्टीतील योगदानाबद्दल कावस लॉर्ड आणि त्यांचे पुत्र केरसी लॉर्ड व बुर्जोर लॉर्ड यांना ‘ओ. पी. नय्यर पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार ओ. पी. नय्यर फाउंडेशनतर्फे देण्यात येतो. चांदीची ट्रॉफी आणि ५१ हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

रंगिलो म्हारो ‘निंबुडा’

0
0
स्पिक मॅकेतर्फे सध्या विविध संस्थांशी संलग्न होऊन मान्यवर कलाकारांचे कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात येत आहेत. या अंतर्गत बुंद खान यांनी पुण्यात विशेष कार्यक्रम केला.

संस्कृतचे आकर्षण कायम!

0
0
संस्कृत भाषेच्या विस्तारासाठी प्रामुख्याने काम करण्याची आवश्यकता असून परदेशात संस्कृतचे आकर्षण आहे, अनेक विद्यार्थी परदेशातून भारतात भाषेचा येत आहेत,’ असे प्रतिपादन कोपहेगन विद्यापीठातील प्राध्यापक केनिथ झीस्क यांनी केले.

इंटरअॅक्शन स्पर्धेला मोठा प्रतिसाद

0
0
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ मिळवून देण्यासठी मॉडर्न कॉलेजमध्ये इंटरअॅक्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादात ही स्पर्धा झाली

अंगणवाड्या बंद

0
0
सेवासमाप्तीनंतर एकरकमी लाभ, बोनस, उन्हाळी सुटी, पेन्शन आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले साखळी उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. उपोषण थांबविण्यात आले असले, तरी मागण्यांचा अध्यादेश हाती येईपर्यंत अंगणवाड्या बंद ठेवून आंदोलन सुरू राहणार आहे.

आयुक्तांच्या पाठिंब्यासाठी पक्षीय गट

0
0
आयुक्तांच्या पाठिंब्यासाठी पक्षीय गट 'राष्ट्रवादी'त दुफळी, भाजप-मनसेचे समर्थन, नागरिकही रस्त्यावर म टा...

उमेदवारीसाठीची चुरस वाढली

0
0
​पुणे शहर लोकसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांनी परस्परांसमोर कडवे आव्हान उभे केल्याने उमेदवारीसाठी चुरस वाढली आहे.

मराठीतून सही करणारे म्हणे निरक्षर, अंगठेबहाद्दर

0
0
तुम्ही कितीही उच्चविद्याविभूषित आणि प्रकांडपंडित असाल, पण तुम्ही देवनागरी किंवा कोणत्याही प्रादेशिक भाषेमध्ये स्वाक्षरी करीत असाल तर तुम्ही ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल’ आणि संबंधित खासगी कंपन्यांसाठी अशिक्षित, निरक्षर आणि इंग्रजीचा अजिबात गंध नसलेलेच आहात.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images