Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘ससून’च्या कॅथलॅबला मे महिन्याचा मुहूर्त

$
0
0
पश्चिम महाराष्ट्रातील गरिबांचे हॉस्पिटल म्हणून समजल्या जाणाऱ्या ससून हॉस्पिटलमधील हृदयावर उपचार देणारी ‘कॅथलॅब’ गेल्या सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. या बंद कॅथलॅबची नव्याने सुविधा घेण्यासाठी मे महिन्यापर्यंत पेशंटला वाट पाहावी लागणार आहे.

कारवाईमुळे वाळूचीही महागाई

$
0
0
वाळू ठेक्यांची वाढलेली किमान किंमत (अपसेट प्राइज), ठेक्यात वाळू मिळण्याची कमी शाश्वती आणि ट्रकवर होणारी दंडात्मक कारवाई यामुळे वाळूचा भाव वाढला आहे. वाळूच्या एका ब्रासचा दर सहा ते सात हजार रुपयांवर पोहोचला आहे.

पोस्ट ऑफिसात ‘जीवनदायी’चे कार्ड

$
0
0
गोरगरिबांना विविध ९७२ आजारांवर खासगी तसेच सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळावेत यासाठी आता येत्या २६ जानेवारीपासून राज्यातील सुमारे तेरा हजार पोस्ट ऑफिसातून राजीव गांधी जीवनदायी योजनेचे कार्ड देण्यात येणार आहे.

पुणे कँटोन्मेंटच्या निवडणुकांना मुदतवाढ

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांना पाच जूनपर्यंत मुदतवाढ देण्याच्या आदेशावर बोर्डाची २४ जानेवारी रोजी विशेष सभा घेण्यात येणार आहे. या सभेमध्ये उर्वरित पाच महिन्यांत विकासकामे पूर्ण करण्यासाठी उपाययोजना करण्यावर चर्चा केली जाणार आहे.

जकात थकबाकीवरून पालिका-कँटोन्मेंट वाद

$
0
0
जकातीच्या थकबाकीवरून पुणे महापालिका आणि पुणे कँटोन्मेंट बोर्ड यांच्यात जुंपली आहे. महापालिकेकडे २४ कोटी ७९ लाख रुपयांची जकात थकबाकी असल्याचा दावा बोर्डाने करून ही रक्कम देण्याचा आग्रह धरला आहे.

पर्यटकांसाठी शनिवारवाडा ‘नंबर बन’

$
0
0
ऐतिहासिक पुण्याचा साक्षीदार असलेला पुण्याचा शनिवारवाडा पर्यटकांच्या नजेरत ‘नंबर वन’ ठरला आहे. लोकप्रिय ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत घारापुरीच्या लेणीला मागे टाकून यंदा शनिवारवाड्याने पहिला क्रमांक पटकावला आहे.

PF बुडविणाऱ्या कंपन्यांवर कारवाई

$
0
0
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) भविष्य निर्वाह निधी (पीएफ) बुडविणाऱ्यांविरुद्ध कारवाईला सुरुवात केली असून, चाकण एमआयडीसीमधील ‘ग्लोब अॅक्सेस​रीज प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीवर बुधवारी छापा टाकण्यात आला.

बसस्थानकांवरही सीसीटीव्ही

$
0
0
प्रवाशांच्या सेवेसाठी अहोरात्र धावणाऱ्या एसटीने राज्यातील प्रमुख स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

आता बससाठीही वॉशिंग मशिन

$
0
0
बसगाड्याची स्वच्छता अत्याधुनिक मशिनच्या साह्याने करता यावी, म्हणून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेतील सुट्या भागांचा वापर करून बसगाड्या धुण्यासाठी स्वयंचलित वॉशिंग मशिन तयार केले आहे. पिंपरी-चिंचवड येथील आगारात हे मशिन बसवण्यात आले आहे.

नव्या निवासी प्रकल्पांमध्ये CCTV

$
0
0
वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या सुरक्षेविषयीच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन नव्या निवासी प्रकल्पांमध्ये सीसीटीव्हीसारखी सुरक्षा प्रणाली बसविता येऊ शकते का, याबाबत बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या पातळीवर विचार केला जाणार आहे.

आता वन्यप्राणी दत्तक घ्या एका दिवसासाठीही...

$
0
0
वाढदिवसानिमित्त, एखाद्या व्यक्तीला शुभेच्छा देण्यासाठी किंवा जवळच्या व्यक्तीच्या स्मृतीनिमित्त काहीतरी छान उपक्रम राबवायचाय मग.. एका दिवसासाठी वन्यप्राण्याला दत्तक घ्या आणि वन्यप्राणी संवर्धनात तुमचा सहभाग नोंदवा… हे आवाहन केले आहे राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाने.

‘बिशप’ला जागा देण्यासाठी आयुक्त प्रयत्नशील

$
0
0
येरवडा भागातील सव्वा लाख चौरस फूट जागा बिशप स्कूल या शिक्षण संस्थेला देण्यासाठी पालिका आयुक्त महेश पाठक प्रयत्नशील असून, ते मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी यांनी केला.

ढगाळ हवामानामुळे थंडी गायब

$
0
0
ढगाळ वातावरणामुळे शहरातील थंडी गायब झाली असली, तरी मंगळवारच्या तुलनेत किमान तापमानात घट झाली आहे. बुधवारी चांगलाच उकाडा जाणवत असला, तरी सायंकाळनंतर काहीशी थंडीही जाणवत होती. बुधवारी शहरात ढगाळ वातावरण होते.

‘लॉ’च्या निकालांमध्ये कोणतीही त्रुटी नाही

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या विधी विद्याशाखेच्या निकालांत; तसेच गुणदानामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी नसल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठातर्फे बुधवारी देण्यात आले.

निकोटिनयुक्त च्युइंगमच्या विळख्यात शालेय विद्यार्थी

$
0
0
तंबाखू, सिगरेटचे व्यसन सोडविण्यासाठीचे उत्पादन म्हणून च्युइंगम म्हणून जाहिरात केल्या जाणाऱ्या नव्या उत्पादनामध्ये निकोटिनचे प्रमाण आहे. तंबाखूजन्य पदार्थांची विक्री अठरा वर्षांखालील मुलांना करू नये असा सरकारी नियम असतानाही हा नियम धाब्यावर बसवून च्युइंगमची विक्री अठरा वर्षाखालील मुलांनाही सर्रास करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

उधळपट्टीचा पर्यावरणावर अनिष्ट परिणाम

$
0
0
‘आपल्या उधळपट्टीच्या जीवनशैलीचा अनिष्ट परिणाम पर्यावरणावर होत आहे. त्याचबरोबर आपले अनुकरण करणाऱ्या इतर वर्गांपुढे पर्यावरण सुसंगत राहणीचा आदर्श उभा करण्याची जबाबदारी शहरी मध्यमवर्गावर आहे,’ असे मत समुचित एन्व्हायरो टेकच्या संचालक प्रियदर्शिनी कर्वे यांनी बुधवारी व्यक्त केले.

कुटुंब नियोजन ऑपरेशनानंतर महिलेचा मृत्यू

$
0
0
कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन झाल्यानंतर येरवड्यातील एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राजीव गांधी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. आरती प्रदीप रणदिवे (वय २६, रा. सिद्धार्थनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

पोटगीसाठी आक्रोश ते ‘४९८’चा गैरवापर

$
0
0
जन्मोजन्मी साथ देण्याचे वचन देणाऱ्या पतीनेच पाठ फिरविल्यामुळे असहाय्य आणि निराधार झाल्यामुळे त्याच्याकडून पोटगी मिळावी म्हणून होणारा आक्रोश…

शिरूरमध्ये सत्तासंघर्षामुळे ‘राष्ट्रवादी’ची कोंडी

$
0
0
पक्षांतर्गत सत्तासंघर्ष, एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे राजकारण आणि बड्या नेत्यांमधील शहकाटशह यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे.

नियमावलीचा कोणताही फायदेशीर परिणाम नाही

$
0
0
टाउनशिपच्या सुधारित नियमावलीचा पुणे व पिंपरीतील प्रस्थापित व नियोजित टाउनशिप प्रकल्पांवर कोणताही फायदेशीर परिणाम होणार नसल्याचे ‘क्रेडाई’ने स्पष्ट केले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images