Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एसपीतील कर्मचाऱ्यांचा संप मागे

$
0
0
आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षण प्रसारक मंडळींच्या सर परशुरामभाऊ (एस. पी.)महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून संप पुकारला होता. परंतु, मंगळवारी ‘शि. प्र. मंडळी’च्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर यावर तोडगा निघाल्याने हा संप मागे घेण्यात आला.

६० टक्के पोलिसांच्या बदल्या?

$
0
0
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे पुणे पोलिस दलातील सुमारे १२० पोलिस ​अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता असून, लोकसभा निवडणुकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळताना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना नाकी नऊ येण्याची चिन्हे आहेत.

पर्यावरण अहवाल ‘कॉपी-पेस्ट’च

$
0
0
महापालिकेच्या पर्यावरण अहवालात दरवर्षीप्रमाणे चुकांचा भरणाच अधिक असून, मागील अहवालातील माहिती ‘कॉपी’ करून यंदाच्या अहवालामध्ये ‘पेस्ट’ करण्यात आल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंगळवारी केला.

पोलिसांची २५ लाखांची ऑफर

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी मंगळवारी कोर्टात खळबळ उडविली. दाभोलकरांची हत्या केल्याची कबुली दिल्यास २५ लाख रुपये देण्याची ‘ऑफर’ दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारिया यांनी दिली होती, असा आरोप प्रमुख संशयित मनीष नागोरी याने केला.

कोकण किनारपट्टीवरील सागरी पर्यावरण धोक्यात

$
0
0
येत्या दहा वर्षांत कोकण किनारपट्टीवर दहा विविध प्रकल्प आकाराला येण्याची शक्यता आहे. सुमारे १०० ते १२५ किलोमीटरच्या अंतराने हे प्रकल्प होणार आहेत.

चाळिशीत ‘सीए’ला गवसणी

$
0
0
चार्टर्ड अकाउंटंट बनण्याचे त्यांचे स्वप्न होते; पण घर आणि संसारातील जबाबदाऱ्यांमुळे २१ वर्षांपूर्वीच त्यांना हा अभ्यासक्रम अर्धवट सोडावा लागला. दरम्यानच्या काळात घरच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलत त्यांनी खासगी कंपनीतही उच्चपदापर्यंत मजल मारली खरी; परंतु सीए व्हायचंच ही जिद्द त्यांना स्वस्थ बसू देईना.

ठाणे- पुणे स्टेशन शिवनेरी सुरू

$
0
0
प्रवाशांच्या मागणीवरून एस. टी. महामंडळाच्या ठाणे विभागाने २२ जानेवारीपासून ठाणे ते पुणे रेल्वे स्टेशन अशी शिवनेरी सेवा सुरू केली आहे. ठाण्याहून पुण्याला जाणाऱ्या या सर्व बस वंदना टॉकीजजवळून सुटतात आणि तिच्या दिवसाला ३२ फेऱ्या होताता.

शास्त्रीनगर-खराडी BRT ची प्रतीक्षा

$
0
0
शास्त्रीनगर ते खराडी चौकापर्यंत बीआरटीचे काम वेगाने सुरू असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन ही सेवा पुणेकरांसाठी खुली व्हावी, अशी अपेक्षा नागरिक करीत आहे.

‘राज्यातील विद्यार्थ्यांना डोमासाइलची गरज नाही’

$
0
0
राज्यातील विद्यार्थ्यांचा व्यावसायिक शिक्षणाला प्रवेश घेतानाचा मनस्ताप दूर करण्यासाठी आता डोमिसाइलची अट रद्द करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील जन्मतारखेची नोंद ग्राह्य मानून प्रवेशासाठी ती विचारात घेतली जाणार आहे.

बारामतीची जागा भाजप लढविणार

$
0
0
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी देशात भारतीय जनता पक्षाची नरेंद्र मोदींच्या रूपाने लाट आलेली आहे. केंद्रात सत्ताबदल होणार हे स्पष्ट झाले असताना बारामतीच्या जागेवरून अनेक अफवा पिकत आहेत.

मुख्याध्यापक उपद‍्व्यापांमुळे खटकाळे ग्रामस्थ हैराण

$
0
0
निलंबन होऊनही खटकाळे येथील शासकीय आश्रमशाळेत मुख्याध्यापकपदावर असलेले हनुमंत काळे यांचे उपद‍्व्याप सुरूच आहेत, असे आरोप खटकाळे ग्रामस्थांनी केले आहेत.

पुरंदर तालुक्यातील कर्मचारी मागणीवर ठाम

$
0
0
शासकीय परिपत्रकानुसार आम्हाला कायम करून दरमहा दहा हजार वेतन आणि पेन्शन, वैद्यकीय रजा आणि महागाई भत्ता मिळालाच पाहिजे या ठाम मागणीवर पुरंदर तालुक्यातील २४५ नियमित आणि काही अंगणवाडीताई आणि २२५ मदतनीस बेमुदत संपावर गेल्या असून, काम बंद आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची माहिती या संघटनेच्या प्रमुख शुभांगी खळदकर आणि अनिता बेलसरे यांनी दिली.

दौंडमध्ये अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

$
0
0
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मोर्चा काढून तहसीलदार गटविकास अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या दौंड तालुका अध्यक्ष रत्नमाला भगवान शेलार यांना दिले.

अंगणवाडी कर्मचा-यांचे बेमुदत साखळी उपोषण

$
0
0
सेवासमाप्तीनंतर एकरकमी लाभ, बोनस, उन्हाळी सुटी, पेन्शन आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने साखळी उपोषण सुरू केले आहे.

पुणे जिल्ह्यात ४५७० अंगणवाड्या बंद

$
0
0
आर्थिक व तत्सम मागण्यांसाठी सहा जानेवारीपासून राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस बेमुदत संपावर गेल्यामुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ४५७० अंगणवाड्यांमधील कामकाज पूर्णपणे बंद पडले आहे. त्यामुळे सर्व बालके पोषण आहार व खाऊपासून वंचित झाली आहेत.

सेविकांच्या संपामुळे बालकांचे कुपोषण

$
0
0
अंगणवाडी सेविकांच्या राज्यव्यापी संपाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर होत असून, खेड तालुक्यातील हजारो बालके आहारापासून वंचित झाली आहेत. गेल्या १५ दिवसांपासून अंगणवाडी सेविका व त्यांच्या मदतनीस यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे.

भांडणातून तरुणाला मारहाण

$
0
0
हॉटेलमध्ये चहा पिण्यास बसलेल्या तरुणांमध्ये जोरजोराने बोलण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून लोखंडी पाइपने मारहाण केल्याचा प्रकार घडला असून, दत्तवाडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

$
0
0
पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्या प्रकरणी पोलिसांनी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी (२१ नोव्हेंबर) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. स्नेहल अजिंक्य क्षीरसागर (वय २१, रा. जवळकरनगर, पिंपळे-गुरव) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

मेंटल हॉस्पिटलचे कर्मचारी पुन्हा संपावर

$
0
0
येरवडा येथील मेंटल हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नसल्याने ७० कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे स्वच्छतागृहे, वॉर्ड, तसेच परिसराची स्वच्छतेच्या कामावर परिणाम झाला आहे.

‘HIV’ विधेयक मंजूर करण्याची मागणी

$
0
0
एचआयव्ही एड्ससह जगणाऱ्या व्यक्तींना डावलण्याचे प्रकार आजही घडत आहेत. त्यांना आपल्या मूलभूत अधिकारांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणारे एचआयव्ही एड्स विधेयक संसदेच्या येत्या अधिवेशनात मंजूर करण्यात यावे, अशी मागणी एचआयव्ही एड्स ग्रस्तांसाठी काम करणाऱ्या काही संस्था संघटनांतर्फे बुधवारी करण्यात आली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images