Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

राहुल गांधींचे नेतृत्व जनता स्वीकारणार नाही

0
0
‘जनतेला महागाईची झळ सोसायला लावणाऱ्या आणि कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या केंद्रातील काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने लोकसभा निवडणुकीची धुरा राहुल गांधी यांच्यावर सोपविली आहे.

सीएसच्या विद्यार्थ्यांसाठी एमकॉमचे विशेष पेपर

0
0
पुणे विद्यापीठातून एमकॉम अभ्यासक्रम करत असलेले आणि कंपनी सेक्रेटरी परीक्षेमुळे एमकॉमचे दोन पेपर देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे घेण्यात येणाऱ्या एम कॉमच्या पेपरचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

‘सीएचा निकाल मागणीनुसार ठरवला जात नाही’

0
0
‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) चार्टर्ड अकाउंटन्सी अभ्यासक्रमाचा निकाल हा बाजारपेठेतील मागणीनुसार ठरवला जात नाही,’ असे स्पष्टीकरण आयसीएआयच्या सेंट्रल कौन्सिलचे सदस्य एस. बी. झावरे यांनी दिले आहे.

पायाभूत सुविधांचा निधी वळविण्याचा घाट

0
0
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बहुमजली वाहनतळ, पादचारी भुयारी मार्ग, पूल अशा पायाभूत सुविधांसाठीची बजेटमधील रक्कम विविध विकासकामांसाठी वळविण्याचा घाट सर्वपक्षीय नगरसेवकांनी घातला असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला.

चोऱ्या टाळण्यासाठी CCTV लावा

0
0
घरफोड्या, साखळी चोऱ्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलिसांनी काही भागातील रहिवासी सोसायट्यांना आवारात कॅमेरा बसविण्याच्या सूचना देण्यास सुरुवात केली आहे.

जागावाटपात ‘माढ्या’चा खडा

0
0
वाजतगाजत सुरू झालेल्या महायुती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जागावाटपाच्या चर्चेत मिठाचा, किंबहुना ‘माढ्या’चा खडा लागला आहे! माढ्याच्या जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हक्क सांगितला असून त्यावरून दोन्ही बाजूंनी कुरबुरी सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

एक्स्प्रेस वेवरील वाहतूक होणार ‘इंटेलिजंट’

0
0
ओव्हरस्पीडिंगमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर इंटेलिजंट सर्व्हेलन्स अँड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम सुरू करण्यात येत आहे. ‘सी-डॅक’ने याबाबत दिलेला अहवाल अंतिम मान्यतेसाठी सादर झाला असून, त्यानंतर लगेच या यंत्रणेची टेंडर काढण्यात येणार आहेत.

ढगाळ हवेमुळे पुण्यातील पारा उतरला

0
0
ढगाळ वातावरणामुळे शहरातील किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. शहरात मंगळवारी १८ अंश सेल्सियस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रिक्त जागा भरण्यासाठी कोट्याचे ‘मॅनेजमेंट’

0
0
मॅनेजमेंट संस्थांमधील एमबीएच्या १०० टक्के जागांसाठी यंदा राज्याच्या ‘एमबीए-सीईटी’चा स्कोअर ग्राह्य धरला जाऊ शकतो. राज्यातील मॅनेजमेंटच्या रिक्त जागांची समस्या कमी करण्यासाठी हा उपाय शोधण्यात आल्याचे समजते.

‘फॅमिली डॉक्टर्स’चा ‘होमिओपॅथ’ना पाठिंबा

0
0
‘होमिओपॅथ’ना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली असून, त्या निर्णयाचे जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने (जीपीए) स्वागत केले आहे. तसेच होमिओपॅथना या निर्णयासंदर्भात जीपीएने पाठिंबा दिला आहे.

‘बॅलेस्टिक’चा अहवाल किती उपयुक्त?

0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा गुन्ह्यांत ‘बॅलेस्टिक एक्सपर्ट’चा अहवाल हा कळीचा मुद्दा ठरला आहे. पिस्तुल आणि गोळ्या मॅच झाल्याचा ‘बॅलेस्टिक एक्सपर्ट’चा अहवाल तांत्रिकदृष्ट्या आरोपींना अटक करण्याइतपत पुरावा होऊ शकला असला, तरी दाभोलकरांची हत्या कोणी आणि का केली याचे उत्तर पोलिसांना मिळत नाही.

दाभोलकर हत्या : आरोपींना पोलिस कोठडी

0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी मनीष रामविलास नागोरी (वय २४, रा. कोल्हापूर) आणि विकास रामअवतार खंडेलवाल (२२, रा. इचलकरंजी) या दोघांना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले होते.

‘मोटिव्ह’ निष्पन्न न झाल्यानेच अटक नाही

0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मनीष ऊर्फ मन्या नागोरी आणि त्याच्या साथीदाराला गोवायचे असते, तर त्यांना या गुन्ह्यांतच अटक करण्यात आली असती.

संभाव्य वीज दरवाढही निवडणुकांपर्यंत लांबणीवर?

0
0
राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या दरकपातीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वीजबिलात दरमहा ७० ते ३५० रुपयांचा दिलासा मिळेल, असा अंदाज आहे. त्याबरोबरच वीजदरांमधील संभाव्य वाढही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

’डीपी’ हरकतींसाठी ६ महिन्यांची मुदतवाढ

0
0
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावरील (डीपी) हरकती-सूचनांवर सहा महिन्यांत निर्णय घेण्याची मुदत उलटून गेल्याने त्यासाठी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने मंगळवारी घेतला.

‘स्थायी’ने फेटाळला पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव

0
0
दिल्लीमध्ये ‘आम आदमी’ पार्टीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचा कित्ता गिरवून पुणे महापालिकेच्या स्थायी समितीनेही प्रशासनाने ठेवलेला पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव मंगळवारी फेटाळून लावला.

पालिका शिक्षण मंडळाची २५ लाखांची फ्लेक्सबाजी

0
0
शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य खरेदी, सहल घोटाळा अशा अनेक विषयांनी सतत चर्चेत राहिलेल्या पालिकेच्या शिक्षणमंडळाचा ‘फ्लेक्स घोटाळा’ उघडकीस आला आहे. शिक्षणमंडळाने साडेचार महिन्या‌त फ्लेक्सवर पंचवीस लाख रुपयांचा चुराडा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

‘पे अँड पार्क’ला काँग्रेसचाही ‘हात’भार

0
0
शहरातील सामान्यांच्या हितासाठी वचनबद्ध असल्याचा काँग्रेसचा दावा मंगळवारी अल्पजीवी ठरला. १५ रस्त्यांवरील ‘पे अँड पार्क’चा प्रस्ताव थेट दफ्तरी दाखल करण्याचा आग्रह धरणाऱ्या काँग्रेसने मंगळवारी अवघ्या तासाभरातच घूमजाव केले.

पालिकेच्या बकेट्स पोचल्या अंदमानला!

0
0
कचरा वर्गीकरणासाठी पुणे महापालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या बकेट्स पुणेकरांऐवजी थेट अंदमान-निकोबारपर्यंत पोहोचत असल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी उजेडात आली.

स्वारगेटची बससेवा ‘ठाणबंद’

0
0
ठाण्यावरून गाडी आली नाही... ड्रायव्हरची संख्या कमी आहे... अशी कारणे पुढे करून मंगळवारी स्वारगेट बसस्थानकावरून ठाण्याला जाणारी बससेवा पावणेचार तास ठप्प होती. त्यामुळे प्रवासी दिनाच्या दिवशीच बसची वाट पाहत ताटकळत थांबण्याची वेळ प्रवाशांवर आली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images