Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पालखी सोहळ्यास पाणी न दिल्यास आंदोलन

$
0
0
पुरंदर मधील पाणी टंचाई वाढलेली असताना, पालखी सोहळ्यात पाणी देण्याचा निर्णय डावलून नागरिक आणि वारकरी यांना वेठीस धरू नये; अन्यथा नागरिकांना आणि वारकरी यांना घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा जन-मत विकास आघाडीने दिला.

लोकायुक्तावर हवा लोकशाहीचा अंकुश

$
0
0
'लोकशाहीच्या योग्य दबावाशिवाय लोकायुक्त आणि सुप्रशासन राबविणे या संकल्पना दात काढलेल्या वाघासारख्या ठरतील. पब्लिक-प्रायव्हेट भागीदारीतून चालणा-या प्रकल्पांचे (पीपीपी) मनी ऑडिट होणेही गरजेचे आहे,' असे मत माजी सनदी अधिकारी डॉ. माधव गोडबोले यांनी सोमवारी व्यक्त केले.

सुशील स्नेहतर्फे संगीत नाटक महोत्सव

$
0
0
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व सुशील स्नेह परिवार यांच्यातर्फे १९ ते २२ जून या कालावधीत संगीत नाटक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. टिळक स्मारक मंदिर येथे होणा-या या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या हस्ते होणार आहे.

'कौटुंबिक हिंसाचार' केसेसमध्ये वाढ

$
0
0
बदलती लाइफस्टाइल....वाढती स्पर्धा....चंगळवाद.... कौटुंबिक मूल्यांचा -हास....घरात कमी झालेला संवाद... एकमेकांना समजून न घेण्याची वृत्ती आणि तडजोड न करण्याची भूमिका यामुळे कौटुंबिक वाद मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत.

कर्मचा-यांची संख्या वाढवणार

$
0
0
दहावीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी आवश्यक असलेले दाखले विद्यार्थ्यांना कमीत कमी दिवसात मिळावेत, यासाठी नागरी सुविधा केंदातील कर्मचारी आणि अधिका-यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

आवडीच्या क्षेत्रात उत्तम होणे हीच करिअर

$
0
0
'प्रत्येकाकडे कुठल्या ना कुठल्या प्रकारची बुद्धिमत्ता असतेच. परंतु करिअरच्या ठोकळेबाज कल्पनांमध्ये अडकल्याने आपल्याला फक्त पुस्तकी बुद्धिमत्ता हीच बुद्धिमत्ता वाटते. स्वत:चा कल, सूर ओळखत त्या क्षेत्रात उत्तम व प्रतिभावंत होणे म्हणजेच उत्तम करिअर होय,' असे मत माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडलाचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी सोमवारी व्यक्त केले.

गरिबांच्या डोक्यावर छत नाही!

$
0
0
पीएमपीच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या मोक्याच्या जागा चुटकीसरशी बीओटीवर बिल्डरांच्या घशात घालणा-या महापालिकेच्या स्थायी समितीने बेघर-गोरगरिबांच्या डोक्यावर तात्पुरते छप्पर देण्यासही टाळाटाळ सुरू केली आहे.

राज्यात २८० औषध विक्रेत्यांना नोटिसा

$
0
0
गर्भपात गोळ्यांची बेकायदा विक्री करणा-या राज्यातील सातशेहून अधिक होलसेल आणि किरकोळ विक्रे त्यांच्या झालेल्या तपासणीपैकी २८० विक्रेत्यांना नोटिसा बजावण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केली. त्यामध्ये पुणे विभागातील ६६ विक्रेत्यांचा समावेश आहे.

सामाजिक, आर्थिक पाहणीचे ६६ टक्के काम पूर्ण

$
0
0
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणाचे काम ६६ टक्के पूर्ण झाले असून, नागरी क्षेत्रात ६० टक्के सर्वेक्षण झाले आहे. नागरी क्षेत्रात पुणे महापालिकेचे ८० टक्के, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे फक्त २० टक्केच काम झाले आहे.

शेतकरी संघटनेतर्फे ५ जुलैला मोर्चा

$
0
0
निर्यातबंदीमुळे होणारे नुकसान, उसाचे हप्ते मिळताना होणारी शेतक-यांची पिळवणूक, डबघाईला आलेल्या सहकारी संस्था याचा जाब विचारण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे येत्या पाच जुलैला मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

अॅडमिशन देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

$
0
0
एमआयटी कॉलेजमध्ये इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षाला अॅडमिशन मिळवून देतो, असे सांगून चार लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

दिमाखदार सोहळा रिंगणाचा

$
0
0
तुकाराम.. तुकाराम.. नामाचा गजर करीत, रिंगणात फुगड्या खेळून मनोरे उभारत.. मानाच्या अश्वांच्या वेगवान प्रदक्षिणेने तुकोबांच्या पालखीतील पहिले दिमाखदार रिंगण मंगळवारी पिंपरीत झाले.

२ वर्षांत हजार महिलांचा भाजून मृत्यू

$
0
0
महिला समानतेचे गोडवे गाणा-या पुण्यात गेल्या दोन वर्षांत एक हजारांहून अधिक महिलांचा भाजून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यावरून महिलांच्या आरोग्यासह कौटुंबिक स्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने सामाजिक पातळीवर आता चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

चाकूच्या धाकाने दोघांना लुटले

$
0
0
कोंढवा रोडवर दुचाकीवरील तरुणांना चाकूच्या धाकाने लुटल्याचा प्रकार घडला. या तरुणांकडील रोख रक्कम, सोन्याची अंगठी आणि मोबाइल हँडसेट असा ७० हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला आहे.

पालखीमार्ग बदलण्यास खडकीकरांचा विरोध

$
0
0
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा परंपरागत मार्ग बदलून पालखी संगमवाडी पुलावरून नेण्यास खडकीकरांनी विरोध केला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी खडकीकरांकडून अडविली जाण्याची शक्यता असल्याने, त्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

कुत्र्यांनी केली चितळाची शिकार

$
0
0
पाणी पिण्यासाठी उत्तमनगरमधील वस्तीजवळ आलेल्या चितळाचा पाठलाग करून भटक्या कुत्र्यांनी त्याची शिकार केली. उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे गेल्या दहा दिवसांत चार चितळे मृत्युमुखी पडली आहेत.

राजकीय राड्यात कलमाडींचे कमबॅक

$
0
0
आयुक्तांच्या भेटीसाठी पुणे महापालिकेत येणाऱ्या खासदार सुरेश कलमाडी यांना रोखण्याच्या प्रयत्नात सोमवारी मनसे, भाजयुमो व काँग्रेस कार्यकर्त्यांचा जोरदार संघर्ष झाला. घोषणायुद्धापासून सुरू झालेला हा संघर्ष नंतर घातघाईवर आला.

लाखावर 'हिट्स'नी साइट्स सुपरहिट

$
0
0
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन निकाल पाहण्याची सोय उपलब्ध करून दिलेल्या वेबसाइट आणि मोबाइल कंपन्यांच्या एसएमएस सुविधांना विद्यार्थ्यांनीही तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशा सेवा पुरविणा-या सर्वच वेबसाइट आणि मोबाइल सेवांसाठी बुधवारी दिवसभरात प्रत्येकी लाखांवर 'हिट्स' मिळाल्याने या सेवाही तितक्याच 'हिट' झाल्याचे चित्र या निकालाच्या निमित्ताने अनुभवायला मिळत होते.

वाहनाच्या धडकेने पादचारी महिला ठार

$
0
0
मुंबई-बंगळुरू हायवेवर पुनावळे रोडवर गोकुळ हॉटेलजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक साठ वर्षांची अनोळखी पाचदारी महिला ठार झाली आहे.

पालखी मार्गावरील गावांना अद्यापही विकास निधी नाही

$
0
0
पालखी मार्गावरील गावांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले असून, दरवर्षी शासनाच्या वतीने गावांना देण्यात येणारा विकास निधी अद्यापही शासनाने गावांना दिला नसल्याने या गावांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images