Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘ड्युफॅस्टॉन’च्या बनावट औषधांची विक्री

$
0
0
गर्भारपणात बाळाची वाढ होण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ‘ड्युफॅस्टॉन’ या मूळ उत्पादनाच्या बनावट औषधांची घाऊक तसेच किरकोळ औषध विक्रेत्यांकडून औषध विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला.

पान टपऱ्यांच्या नोंदणीसाठी ‘NOC’ बंधनकारक

$
0
0
शाळांच्या परिसरातील पान टपऱ्यांच्या परवान्याची नोंदणी करण्यात आली असली तरी त्या नोंदणीसाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने ‘ना हरकत’ प्रमाणपत्र (एनओसी) आवश्यक केले आहे.

‘शिक्षणपंढरी’ लवकरच राज्यभरात

$
0
0
तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानविस्तार करण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे (एमकेसीएल) पंढरपूरमध्ये राबविण्यात येणारा ‘शिक्षणपंढरी’ हा उपक्रम लवकरच राज्यभरातील शाळांमध्येही राबविला जाणार आहे.

बाबा मिसाळला पोलिस कोठडी

$
0
0
नातूबाग येथील कबड्डी मैदानावरून झालेल्या वादातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी माजी नगरसेवक दीपक ऊर्फ बाबा मिसाळ यांना २० जानेवारीपर्यत पोलिस कोठडी नावण्यात आली आहे.

६४६ सोनोग्राफी मशिनची नोंदणी

$
0
0
राज्य सरकारच्या आदेशानुसार पुण्यातील सोनोग्राफी मशिनला सांकेतिक क्रमांक देण्याची मोहीम पूर्ण झाली असून शहरात आजमितीला ४०६ सोनोग्राफी केंद्रे कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. या केंद्रातून ६४६ एवढ्या सोनोग्राफी मशिनची नोंदणी करण्यात आली आहे.

जास्त प्रवाशांमुळेच कोसळली लिफ्ट

$
0
0
कमला नेहरू हॉस्पिटलमधील लिफ्ट क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्यानेच कोसळल्याचे ऊर्जा व कामगार विभागाने केलेल्या तपासणी अहवालात समोर आले आहे.

पश्चिम घाटात तपकिरी उदमांजर

$
0
0
पश्चिम घाटाच्या सदाहरित जंगलामधे आढळणारा लहान मांसभक्षक तपकिरी उदमांजर (ब्राउन पाम सिवेट) वन्यजीव संशोधकांच्या ग्रुपला नुकतेच महाराष्ट्राच्या पश्चिम घाटामधे आढळून आले. वाई परिसरात कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये अभ्यासकांना त्याची छायाचित्रेही मिळाली आहेत.

घर देण्याच्या तडजोडीवर मिटला पती-पत्नीतला वाद

$
0
0
गरिबी आड येऊ न देता त्यांनी तिला शिकविले... कमवती झाल्यांनतर तिने आई - वडिलांसाठी कर्ज काढून घर घेतले. लग्नानंतरही घराचे हप्ते तीच भरत होती. मात्र लग्नानंतर पैसा माहेरी जातोच कसा, या कारणावरून झालेला त्यांच्यातील वाद घटस्फोटापर्यंत पोहचला.

‘रुपी’ विलीनीकरणास काँग्रेसचा विरोध

$
0
0
रुपी बँकेचे सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यास काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. येत्या एक फेब्रुवारी रोजी बँकेची सर्वसाधारण सभा होणार असून, त्यामध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

माळढोक पक्ष्यांना मायक्रो चिप बसवणार

$
0
0
जागतिक नकाशावरून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्ष्यांच्या पाठीवर ‘मायक्रो चिप’ बसविण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. केंद्रीय वन्यजीव मंडळाने वाघ आणि बिबट्यानंतर पहिल्यांदाच एका पक्षासाठी मायक्रो चिप बसविण्याची मंजुरी दिली आहे.

वीजगळती रोखली तरी वीज पुरेल

$
0
0
अब्जावधी रुपये खर्च करून आणि मोठा धोका पत्करून अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याऐवजी तूट-गळती रोखली, तरी देशाची विजेची गरज भागविणे शक्य होईल, असे चेन्नई सॉलिडॅरिटी ग्रुप फॉर कुडनकुलम स्ट्रगलचे सदस्य नित्यानंद जयरामन यांनी सांगितले.

सर्वांत मोठे हडप्पाकालीन शहर प्रकटणार?

$
0
0
हरियाणातील राखीगढी या देशातील सर्वात मोठ्या हडप्पाकालीन स्थळाचे उत्खनन पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या वतीने नुकतेच सुरू झाले. सरस्वती नदीकाठच्या संस्कृतीचा विकास आणि ऱ्हास कसा झाला, भारतीय संस्कृतीत असणारी विविधता नेमकी कशी विकसित होत गेली, आदी प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे या संशोधनातून पुढे येण्याची शक्यता संशोधक वर्तवित आहेत.

छत्रपती, बाबासाहेबांची स्मारके भव्यदिव्यच हवीत

$
0
0
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक इतके भव्य असेल, की अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवीची मूर्ती छत्रपतींच्या घोड्याच्या टापेखाली येईल.

कचऱ्याची कोंडी सुटली

$
0
0
गावकऱ्यांच्या समस्यांबाबत पाठपुरावा करून त्या सोडवण्याचा शब्द दिल्यानंतर हडपसरच्या गावकऱ्यांनी कचऱ्याचे कंटेनर जाऊ द्यायला सुरुवात केली.

आरोपी पोलिस पहाऱ्यातून पळाला

$
0
0
दौंड उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेला दरोड्यातील आरोपी बाळू ऊर्फ नेमसिंग ऊर्फ नयनसिंग भिल्ल शौचाच्या बहाण्याने पोलिसांच्या पहाऱ्यातून स्वच्छतागृहाचे गज वाकवून पळाला.

मोबाइलचोरी करणाऱ्या ३ मुलांना अटक

$
0
0
शॉपीचे शटर उचकटून मोबाइलचोरी करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख ८३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

‘टोलचा प्रश्न कायद्याने सोडवण्याची गरज’

$
0
0
‘कोल्हापूरमधील टोलविरोधी आंदोलनातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे हाच फक्त पर्याय नसून, कायदा आणि लवादाच्या मार्गाने हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल,’ असे मत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मांडले.

बचत गट गैरव्यवहार : फेरसुनावणीचे आदेश

$
0
0
‘यमाईदेवी महिला बचत गटाच्या शालेय पोषण आहाराचे अनुदान देताना फसवणूक केल्याप्रकरणी भोर नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाच्या अध्यक्षासह पाच जणांना खटल्यातून वगळून त्यांची मुक्तता केल्याचा भोर सत्र न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवून, सदर खटल्याची फेरसुनावणी सुरू करावी आणि या पाचही प्रतिवादींनी सोमवारी भोर कोर्टात हजर राहावे,’ असा आदेश जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. माने यांनी दिला आहे.

‘भोर बाजारपेठेतील कोंडीची समस्या सोडवा’

$
0
0
भोर शहरातील एस. टी. बसस्थानक ते चौपाटी शिवाजीपुतळा चौक या मुख्य बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला असून, सर्वसामान्य नागरिकांना पायी चालणे अवघड होत आहे.

विहिरी ताब्यात घ्या

$
0
0
पुण्याचे पाणी कॅनॉलजवळील विहिरींद्वारे चोरण्यात येत असल्याने ही ‘पाणी तस्करी’ रोखण्यासाठी संबंधित विहिरी राज्य सरकारने ताब्यात घेऊन कायमच्या बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images