Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वेश्या व्यवसायातून मुलीची सुटका

$
0
0
विभक्त झालेल्या आईने वाऱ्यावर सोडले आणि वडिलांनाही पाठ फिरवली. त्या दोघांनीही आपले प्रपंच नव्याने सुरू केले. त्यानंतर ज्यांच्याकडे आधारासाठी गेली, त्या दाम्पत्याने वेश्या व्यवसायालाच लावले. अशा दुर्देवी मुलीची सुटका करून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने वेश्या व्यवसायास लावणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

६ शिवसैनिकांना सक्तमजुरी

$
0
0
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचे विटंबन केल्याप्रकरणी शिवसेनेतर्फे पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान एका एसटीची तोडफोड केल्याप्रकरणी सहा शिवसैनिकांना सहा महिने सक्तमजुरी आणि दोन हजार २५० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ट्रक-कंटेनरच्या अपघातात एकाचा मृत्यू

$
0
0
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर अमृतांजन पुलाजवळील तीव्र उतारावर ट्रक आणि कंटेनरच्या अपघातात कंटेनरच्या क्लिनरचा जागीच मृत्यू झाला असून, चालक गंभीर जखमी झाला आहे.

नद्यांचा पाणीवापर ते प्रदूषणाची होणार कुंडली

$
0
0
कृष्णा खोऱ्यातील प्रमुख नद्यांच्या उगमापासून शेवटापर्यंत होणारा पाण्याचा वापर, पाण्याची प्रत्यक्ष उपलब्धता, नदीकाठच्या विहिरींद्वारे होणारे सिंचन, उद्योगांना दिले जाणारे पाणी, पाण्याची गुणवत्ता आणि सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण याची कुंडली आता तयार केली जाणार आहे.

LIC एजंटकडून महिलांची फसवणूक

$
0
0
एलआयसीमध्ये भरण्यासाठी जमा केलेले १२३ महिलांचे पैसे एलआयसीकडे न भरता ते लंपास केल्याची तक्रार एका महिलेने पोलिसांमध्ये केली आहे. छबीता गलपलू असे या महिलेचे नाव आहे.

ससूनमध्ये जीवनदायी योजना

$
0
0
दारिद्र्यरेषेखालील आणि एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना वैद्यकीय सेवांचा लाभ मिळण्यासाठी सुरू करण्यात आलेली राजीव गांधी जीवनदायी योजना ससून हॉस्पिटलमध्ये राबविण्यात येत आहे.

‘IMA’च्या डॉक्टरांचा संपावर जाण्याचा इशारा

$
0
0
कोर्टाने अनेकदा ‘क्रॉस ट्रिटमेंट’ करण्यास बंदी केली असूनही केवळ काही लोकांच्या स्वार्थापोटी हा अन्यायकारक नियम लागू केला जात आहे.

एकही झाड तोडू नका

$
0
0
हायकोर्टाचा निर्णय डावलून मुंढवा-घोरपडी रस्त्यावर होणारी झाडांची बेसुमार कत्तल रोखण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेला राष्ट्रीय हरित लवादाने शुक्रवारी दणका दिला.

‘एस. पी.’ची वेबसाइट ‘हॅक’

$
0
0
शहरातील प्रतिष्ठित एस. पी. कॉलेजची वेबसाइट शुक्रवारी ‘हॅक’ झाली. रात्री उशिरापर्यंत ती ‘रिस्टोअर’ होऊ शकली नव्हती. याबाबत पोलिसांच्या सायबर क्राइम सेलकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे कॉलेजने स्पष्ट केले आहे.

एअर होस्टेसच्या कोर्समध्ये फसवणूक

$
0
0
एअर होस्टेसचा कोर्स पूर्ण केल्यानंतर नोकरी लावून देण्याच्या अमि‌षापोटी दोन विद्यार्थ्यांना पावणे चार लाख रुपयांना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात ‘फ्रँकफिन इन्स्टिट्यूट’च्या बंडगार्डन शाखेच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्लास्टिकचा कचरा वेगळा द्या

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हडपसर औद्योगिक वसाहतीत असलेल्या कचरा डेपोमध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण वाढले असल्याने बोर्डापुढे या कचऱ्याची डोकेदुखी झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिकचा कचरा वेगळा देण्याचे फर्मान बोर्डाने सोडले आहे.

रेडी रेकनरच्या वाढीव दराला स्थगिती

$
0
0
महापालिका हद्दीतील गृह प्रकल्पांमधील क्लब हाउससारख्या सुविधा, टीडीआर व पुनर्विकासासाठी अतिरिक्त दर आकारण्याच्या रेडी रेकनरमधील मार्गदर्शक सूचनांना महसूल मंत्र्यांनी स्थगिती दिल्याचे परिपत्रक मुद्रांक व नोंदणी विभागाने काढले आहे.

आठवलेंना पवारांनी चुचकारले

$
0
0
राज्यसभेतील खासदारकीसाठी भाजप, शिवसेनेने गेले काही दिवस झुलवत ठेवलेले आरपीआय नेते रामदास आठवले यांना शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी चुचकारले आणि काँग्रेस सोबत असतानाच संसदेत जाता येते, अशी आठवण करून दिली.

शहराचा वाढता विस्तार गंभीर

$
0
0
‘शहराची हद्द वाढली की उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांवर ताण वाढतो. त्यामुळे शहरे किती वाढून द्यायची याचा गांर्भियाने विचार करण्याची गरज आहे,’ असे स्पष्ट करत महापालिका हद्दीत नव्याने गावांचा समावेश करताना आवश्यक की काळजी घेण्याचा ‘मोलाचा’ सल्ला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी दिला.

दोन कोटींचे सापाचे विष जप्त

$
0
0
आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे दोन कोटी किंमत असणाऱ्या सापांच्या विषाची तस्करी करणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली. पिंपरीतील वल्लभनगर एसटी स्थानकावर शुक्रवारी (१७ जानेवारी) रात्री पोलिसांनी ही कारवाई केली.

‘आळंदी-नगर रोड मार्गावर हवेत सूचना फलक’

$
0
0
पालिकेने विकसित केलेल्या आळंदी-नगर रोडच्या बीआरटी मार्गावर आयआयटी, मुंबईने समाधानकारक शेरा मारला असला, तरीही सूचना फलकांच्या अभावामुळे या रस्त्यांवरील अपघात मात्र घटलेले नाहीत.

आळंदी-नगर रोड बीआरटी योग्यच

$
0
0
शहरातील पथदर्शी जलद बस वाहतूक (बीआरटी) प्रकल्पामध्ये झालेल्या चुकांमधून बोध घेत आळंदी-नगररोडवरील बीआरटी विकसित करताना पालिकेने घेतलेल्या खबरदारीच्या उपायांना आयआयटी, मुंबईने ‘योग्य दिशे’ने असल्याचे प्रशस्तीपत्र दिले आहे.

ताथवडे गावचा डीपी मंजूर

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेत शनिवारी अखेर ताथवडे गावाचा डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर करण्यात आला. हा डीपी बिल्डरधार्जिणा असल्याचा आरोप करून, विरोधकांनी तो रद्द करण्यासाठी मतदानाची मागणी केली.

वीज खंडित तक्रारीसाठी ग्राहक क्रमांक आवश्यक

$
0
0
वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांचा ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट सांगणे बंधनकारक करण्याच्या खाक्यामुळे पुणेकरांना अंधारात चाचपडण्याची वेळ आली आहे.

राइड शेअर करून करा पैसे व इंधनाची बचत

$
0
0
रोज बाइकवर अथवा कारने एकट्यानेच ऑफिसला जाण्याऐवजी ही राइड शेअर करता आली तर...पैसे आणि इंधनाची बचत, पर्यावरणाचे संवर्धन होईल आणि रस्त्यावरील वाहनांची गर्दीही कमी होऊन वाहतूक सुधारेल.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images