Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अनधिकृत बांधकामांविरोधात पालिका ठाम

$
0
0
अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यासाठी कोर्टात जाऊन स्थगिती मिळविण्याचा आणखी एक खटला पालिका कोर्टाने नुकताच निकालात काढला आहे.

योगाचार्य अय्यंगार यांना डी. लिट

$
0
0
बेंगळुरू येथील एस. व्यासा योग विद्यापीठातर्फे ११ व्या पदवीप्रदान समारंभात योगापितामह बी के एस अय्यंगार यांना डी. लिट पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी योग विषयामधील १०१ विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली.

वृक्षतोडीचे प्रस्ताव अधांतरी

$
0
0
महापालिकेतील वृक्ष प्राधिकरण ‌‌‌‌समिती स्थापनेचा घोळ संपला नसल्याने गेल्या तीन महिन्यांपासून शंभरपेक्षा अधिक वृक्षतोडीचे प्रस्ताव उद्यान विभागाकडे प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.

‘मुंढवा-केशवनगरच्या समस्या सोडवा’

$
0
0
मुंढवा केशवनगर येथील नागरिकांना आवश्यक त्या पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शिवसेनेच्या वतीने बुधवारी महापालिकेवर मोर्चा काढून मटका फोड आंदोलन करण्यात आले.

चंदन चोरीप्रकरणी इस्टेट एजंटला अटक

$
0
0
गेल्या महिन्यात बेल्हे येथे झालेल्या सव्वा दोन कोटींच्या चंदन चोरीप्रकरणी बेंगळुरूमधून एका इस्टेट एजंटला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या आता सहा झाली आहे.

एसटीखाली सापडून महिलेचा जागीच मृत्यू

$
0
0
एस. टी. बसखाली सापडून अवसरी खुर्द बसस्थानकात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. शकुंतला पंडीत अभंग (वय ५०, रा. अवसरी) असे या महिलेचे नाव आहे.

‘आघाडी’ला टोलबाबत ‘राष्ट्रवादी’ चा घरचा आहेर

$
0
0
महाराष्ट्रातील ज्या नगरपालिका सक्षम आहे व शहरांर्तगत टोल आहे, अशा नगरपालिकांचा ठराव करून त्यांना सरकार मदत करणार असल्याचे सुत्रांकडून समजल्यानंतर कोल्हापूर पाठोपाठ सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी टोल विरोधात सरकारला घरचा आहेर दिला आहे.

ओढ्यांना अनधिकृत बांधकांमांचा विळखा

$
0
0
राजगुरुनगर शहरातून वाहणाऱ्या ओढ्यांच्या हद्दीतील जागा बळकावून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत पक्की बांधकामे करण्यात आल्यामुळे ओढे अतिशय अरुंद झालेले आहेत. ही बांधकामे करणाऱ्यांमध्ये राजकीय पुढारी, बिल्डर, धनदांडग्यांचा समावेश आहे.

लक्ष्मीनगरला एक तास

$
0
0
येरवडा येथील लक्ष्मीनगर परिसरात महापालिकेचा दुजाभावामुळे पाणीटंचाईच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सर्व परिसरात एकसारखा पाणीपुरवठा होत नसल्याने लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

पाण्यासाठी रोजचीच वणवण

$
0
0
मोठ्या टाउनशिपच्या माध्यमातून नेतेमंडळींनी आपले साम्राज्य वसविले असले, तरी हडपसरसह सोलापूर रोडच्या उपनगरीय परिसराची पाणीक्षमता ही कागदावरच राहिली आहे. परिणामी, चकाचक फ्लॅटमध्ये राहूनदेखील पाण्यासाठी टँकरमाफियांची मिन्नतवारी करण्याची वेळ स्थानिक नागरिकांवर येत आहे.

‘एमआयडीसी’त एकाला लुटले

$
0
0
मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकलवरून जाणाऱ्या व्यक्तीला अडवून, त्याला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

कचऱ्याची जागा निश्चित हवी

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत अवघ्या दहा घंटागाड्या असून, त्या घंटागाड्यांनी घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यात विलंब होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

क्रीडासंकुलाला केंद्राचा नकार

$
0
0
प्रदर्शनांसाठी​ वापरल्या जाणाऱ्या गोळीबार मैदानावर ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर क्रीडासंकुल उभारण्यास केंद्र सरकारने नकार दिल्याने क्रीडासंकुलाचा बार फुसका ठरला आहे. आता क्रीडासंकुलाच्या ऐवजी बोर्ड स्वतः क्रीडा अकादमी उभारणार असून, अकादमीला निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

नाट्यसंमेलनाची रूपरेषा आज ठरणार

$
0
0
चंद्रभागेच्या काठी रंगणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची कार्यक्रमपत्रिका आज (गुरुवारी) निश्चित होणार आहे. नेहमीच्या मुलाखती, नाट्यप्रयोग अशा कार्यक्रमांपेक्षा काही वेगळा विचार परिषद करते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

राज्यातील ग्रंथालयांना वाढीव अनुदान?

$
0
0
दर्जा सुधारण्याची सूचना देण्यात आलेल्या राज्यभरातील ५७८८ ग्रंथालयांचा अहवाल ग्रंथालय संचालनालयाने राज्य सरकारला सादर केला आहे. ५६८८ ग्रंथालयांनी दर्जा सुधारल्यामुळे या अहवालात त्यांची वाढीव अनुदानासाठी शिफारस करण्यात आली असून, त्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.

बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्काराचा इशारा

$
0
0
कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांना १०० टक्के अनुदानाची मागणी करत महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीने बुधवारी पुण्यात मोर्चा काढला. या शाळांचा अनुदानासाठी विचार व्हावा म्हणून, नावातील ‘कायम’ शब्द वगळण्याची मागणीही संघटनेने केली.

‘APL’ कुटुंबांनाही मिळणार सवलतीत धान्य

$
0
0
अन्नसुरक्षा योजनेच्या पात्रता यादीतून वगळण्यात आलेल्या दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) सर्व रेशन कार्डधारक कुटुंबांना सवलतीच्या दराने केला जाणारा धान्य पुरवठा सुरूच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

शिरूर राष्ट्रवादीत ‘कहीं खुशी, कहीं गम’

$
0
0
शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार वल्लभ बेनके यांचे नाव संभाव्य उमेदवारांच्या यादीत आल्याने ‘कही खुशी, कही गम’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘शिरूर’ची उमेदवारी ही बेनके यांच्यासाठी बक्षिसी की शिक्षा या संभ्रमात कार्यकर्ते आहेत.

पुण्यातील खंडपीठावर मुख्यमंत्र्यांची फुली

$
0
0
मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ मिळावे या मागणीसाठी पुणे आणि कोल्हापूरमधील वकिलांकडून जोरदार मागणी सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र खंडपीठासाठी आपली पसंती कोल्हापूरला दिली आहे. त्यांनी यासंदर्भात मुंबई हायकोर्टाला पत्रच दिले आहे.

आळंदी, नगर रोड BRT आचारसंहितेच्या कचाट्यात?

$
0
0
बीआरटी मार्गावरील स्वयंचलित दरवाजांची कामे फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने आळंदी-नगररोडवरील बीआरटी मार्गस्थ होण्यापूर्वीच आचारसंहितेच्या कचाट्यात सापडण्याची दाट शक्यता आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images