Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नव्या हद्दवाढीला गावांचा विरोध

0
0
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील समावेशास खेड तालुक्यातील गावांनी ठराव करून विरोध दर्शविला आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतीली निर्णयापूर्वीच हद्दवाढीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

0
0
जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्गावर कान्हे फाट्याजवळील मोहितेवाडी येथे कंटेनरची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी कंटेनर पेटवून दिला. अपघातानंतर कंटेनरचालक फरारी झाला आहे.

बायोगॅस प्रकल्प योजना बारगळली

0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत ओल्या कचऱ्याची समस्या असल्याने, वॉर्डातील कचरा वॉर्डातच जिरविण्यासाठी नागरी भागात बायोगॅस प्रकल्प उभारण्याची बोर्डाची योजना बारगळली आहे.

‘OLX छळा’चा दुसरा प्रकार उघड

0
0
बेवसाइटवर दुचाकी विक्रीची जाहिरात देवून एका वकील महिलेला त्रास देण्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे-सातारा रोडवरील एका कॉलेजमधील तरुणीलाही अशाच प्रकारे त्रास देण्याची घटना घडल्यानंतर गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे सलग दुसरी तक्रार तपासासाठी आली आहे.

राज श्रॉफविरोधात तपासाचे आदेश

0
0
बनावट कागदपत्रांच्या आधारे बालेवाडीतील जमीन लाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राज श्रॉफ आणि इतरांविरुद्ध तपास करण्याचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचे आदेश सेशन्स कोर्टानेही कायम केले आहेत, अशी माहिती गणेश गायकवाड आणि दीपक गवारे यांनी दिली.

महिला बचत गटांना प्राधान्याने भूखंड

0
0
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत औद्योगिक वसाहतींसाठी संपादित करण्यात आलेल्या क्षेत्रामधील दहा टक्के क्षेत्र सुक्ष्म व लघु उद्योगांसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या परीक्षार्थींना निवडणुकांचा फटका?

0
0
यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीचा फटका पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या परीक्षांसाठीचे नेहमीचे अपेक्षित वेळापत्रक आणि निवडणुकांच्या संभाव्य तारखा एकत्रच येण्याची शक्यता असल्याने विद्यापीठासोबत विद्यार्थीही अडचणीत येणार आहेत.

‘कमला नेहरू’मधील २ लिफ्ट सुरू

0
0
हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या पेशंटचे आणि त्यांच्या नातेवाइकांचे हाल कमी होण्यासाठी कमला नेहरू हॉस्पिटलमधील आठ पैकी दोन लिफ्ट सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

आमदार निम्हण लोकसभेसाठी इच्छुक?

0
0
पुण्याच्या लोकसभेच्या रिंगणात काँग्रेस पक्षाकडून आमदार विनायक निम्हण हे दावा सांगण्याची शक्यता आहे. निम्हण यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेत प्रभागवार चाचपणी सुरू केली आहे.

हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या

0
0
एक हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी चौघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून हजाराच्या ४६ बनावट नोटा आणि चार मोबाइल जप्त करण्यात आले असून, त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे.

NCP च्या हल्ल्याने काँग्रेसची राजकीय कोंडी

0
0
राष्ट्रवादीच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्व नेत्यांनी काँग्रेस आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य केले असतानाच, लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसची गोची झाली आहे.

परदेशातील मनीऑर्डर टपालामार्फत मिळणार

0
0
टपाल खात्याने ‘इंटरनॅशनल मनी रेमिटन्स सर्व्हिस’द्वारे परदेशातून पाठविलेले पैसे मिळण्याची योजना तयार केली असून, १५ जानेवारीपासून या योजनेला सुरुवात होत आहे. या योजनेमुळे परदेशातून पाठविलेली मनीऑर्डर त्याच दिवशी मिळू शकणार आहे.

तंत्रशास्त्र विद्यापीठाची आवश्यकता नाही

0
0
रिक्त जागांच्या समस्येला सामोरी जाणारी राज्यातील इंजिनीअरिंग कॉलेजे स्वतंत्रपणे सुरू होणाऱ्या तंत्रशास्त्र विद्यापीठाकडे वळल्यास, या कॉलेजांना जेवढे विद्यार्थी सध्या उपलब्ध होत आहेत, तेवढेही उपलब्ध न होण्याची भीती निर्माण झाली आहे.

४ घटनांत हिसकावले १०.५ तोळे सोने

0
0
शहरात गेल्या दोन दिवसांत चार घटनांमध्ये साडेदहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हिसकावण्यात आले आहेत. या घटनांमध्ये दुचाकीवरील दोघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भाजपचे आंदोलन ठरले ‘आरंभशूर’

0
0
शहराच्या प्रलंबित प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याकरिता विधिमंडळासह रस्त्यावर उतरून प्रतिकात्मक आंदोलने करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा आवाज गेल्या १५ दिवसांत मात्र पूर्ण दबला आहे.

टोलमुळे एसटीला कोटींचा तोटा

0
0
प्रवाशांच्या सेवेसाठी अहोरात्र धावणाऱ्या एसटीला टोलमुळे होणाऱ्या तोट्याची रक्कम कोटींच्या घरात असल्याचे समोर आले आहे. एसटीच्या पुणे विभागाला दर वर्षी टोलपोटी सव्वा कोटी रुपये द्यावे लागत असल्याने एसटीचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे.

नगरसेवकांचा आवाजावर ‘कंट्रोल’

0
0
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर आसनासमोर नगरसेवकांकडून घातला जाणारा गोंधळ थांबविण्यासाठी महापौर आसनाच्या समोरील भागात लाकडी कठडे उभारण्याबरोबरच सभागृहात विशिष्ट इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा बसविली जात आहे.

‘सीएम’विरोधात राष्ट्रवादी आक्रमक

0
0
पुण्याचे कारभारी अजित पवार यांचे अपयश झाकण्यासाठी शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय न घेतल्याचा आरोप करीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना खिंडीत गाठण्याचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.

भिंती रंगवाल, तर पस्तावाल

0
0
शहरातील सार्वजनिक तसेच महापालिकेच्या मालकीच्या भिंती रंगवून सार्वजनिक ठिकाणांचे विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. या हेल्पलाइनवर ‘एसएमएस’द्वारे नागरिकांना तक्रार करता येणार आहे.

ताईंच्या विरोधात ‘साखर’पेरणी?

0
0
बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू केलेल्या महायुतीमध्येच आता उमेदवारीची रस्सीखेच सुरू झाली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images