Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अपघातग्रस्तांना ‘डायल १०८’ची संजीवनी

$
0
0
औंधच्या आरोग्य विभागाच्या इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसच्या (इएमएस) कंट्रोल रूम, वेळ : सकाळी सव्वाअकराची. सर्व अधिकारी आणि कॉल घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची लगबग. सॅलिसबरी पार्क येथे अपघात घडल्याने मदतीचा पहिला कॉल १०८ वरून कंट्रोल रुममध्ये येतो.

‘साताबारा’ नोंदीसाठी टाइमटेबल

$
0
0
तलाठी भाऊसाहेबांच्या मनमानी कारभाराला वेसण घालण्यासाठी हवेलीच्या प्रांत अधिकारी स्नेहल बर्गे यांनी शिस्तीचा बडगा उगारला असून, सातबारा उताऱ्याच्या नोंदींसह कार्यालयीन कामकाजाचे टाइमटेबलच त्यांनी तलाठ्यांना दिले आहे. ही शिस्त न पाळणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

१५० घरफोड्या करणारे गजाआड

$
0
0
पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरात घरफोड्या करत धुमाकूळ घालणाऱ्या गाझियाबाद येथील टोळीच्या म्होरक्याला पकडण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे.

बनावट गुणपत्रिका प्रकरणाकडे दुर्लक्ष?

$
0
0
बनावट कागदपत्रांच्या आधारे इराणी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्याप्रकरणी पुणे विद्यापीठाने नेमलेल्या समितीने या प्रकाराची अधिक चौकशी करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तपास सोपविण्याच्या शिफारसी केल्या होत्या.

‘पास’कडे स्थानिकांचे दुर्लक्ष

$
0
0
राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावरून ये-जा करण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांना दर महिन्याला १५० रुपयांचा पास उपलब्ध करून दिला आहे. मात्र, गावकऱ्यांनी या पासच्या वापराकडे दुर्लक्ष केले आहे.

१०.७५ लाख कुटुंबांना अन्नसुरक्षा कवच

$
0
0
गरिबांना दोन वेळचे अन्न देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेचा पुण्यातील पावणेअकरा लाख कुटुंबांना लाभ मिळणार आहे. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत ३१ लाख ७६ हजार कुटुंबांना या योजनेचे सुरक्षा कवच लाभणार आहे.

वाहन जप्तीसाठी ठेकेदाराची ‘फौजदारी’

$
0
0
वाहनचालकांच्या घरातून वाहन जप्त करून आणण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांनाही नसताना, ‘इंटेलिजन्ट ट्रॅफिक सिस्टीम’ (आयटीएस) अंतर्गत दंड भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांच्या घरून वाहन जप्त करण्याचा परवाना पालिकेने ठेकेदाराला दिल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

सरकारी काम; ७ वर्षे थांब...

$
0
0
टोल लागू केल्याने आपल्या घटनात्मक अधिकारांचा संकोच झाल्याचा मुद्दा उपस्थित करून टोलच्या विरोधात कोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर गेली सात वर्षे सरकारने बाजू मांडलेली नाही. माजी पोलिस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांनी ही याचिका दाखल केली आहे.

महिलेच्या रजा मंजुरी विलंबाच्या चौकशीचे आदेश

$
0
0
बंडगार्डन पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्याची प्रसूती रजा वेळेत मंजूर न करण्यात आल्याच्या प्रकाराची, पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

‘आप’च्या तिकिटासाठी डीएसके, भाटिया इच्छुक?

$
0
0
दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करून देशभरात चर्चेत आलेल्या आम आदमी पक्षाच्या (आप) पुण्यातील उमेदवारीची चर्चा फेसबुकवर सुरू झाली आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि माजी सनदी अधिकारी अरुण भाटिया यांच्या फेसबुक फ्रेंड्समधून त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झडत आहेत.

निधीअभावी वेतन मिळेना

$
0
0
व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाच्या पुणे विभागांतर्गत द्विलक्षी व किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम राबविणाऱ्या अनुदानित संस्थांमधील शिक्षकांपासून शिपायापर्यंतचे कर्मचारी गेल्या दोन महिन्यांच्या वेतनापासून वंचित आहेत.

फेरीवाले, विक्रेत्यांचा बायोमेट्रिक सर्वे

$
0
0
शहरातील सर्व फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांच्या सर्वेक्षणाला स्थायी समितीने मंजुरी दिली असून, येत्या महिन्याभरात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

स्कॉलर विद्यार्थ्यांना ९.५ कोटी

$
0
0
पुणे विद्यापीठातर्फे यंदा विविध शिष्यवृत्ती योजनांच्या माध्यमातून पदवी आणि पदव्युत्तर पातळीवरील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना साडेनऊ कोटी रुपयांच्या स्कॉलरशिपचे वाटप केले जाणार आहे.

'विकतचा' मनस्ताप

$
0
0
सोशल मीडियाच्या माध्यमातून छेडछाड करण्याबरोबरच आता मैत्रिणीच्या नावाने खोटी जाहिरात देऊन, मानसिक छळवणूक करण्याचा प्रकार नुकताच सायबर सेलसमोर आला. या प्रकरणी तातडीने कारवाई करण्यात आली.

पुणे-सातारा रोडवर अपघात, नऊ ठार

$
0
0
पुणे-सातारा रोडवर नव्या खंबाटकी बोगद्याजवळ कंटेनर उलटला आणि क्रूझरवर पडला. या अपघातात नऊ जणांचा कंटेनरखाली चेंगरुन गेल्यामुळे मृत्यू झाला आणि पाचजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एका लहानग्याचा समावेश असल्याचे समजते.

१२ वी सायन्सचे पेपर मराठीत

$
0
0
बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका मराठीतून मिळू शकणार आहेत. त्याचप्रमाणे या तिन्ही विषयांचे पेपर मराठीतून लिहिण्याचीही मुभा असणार आहे.

सशुल्क एटीएमला ग्राहकांचा विरोध

$
0
0
‘बँकेकडे ठेवी असतात... बँकेकडे रिकरिंग असेत...सेव्हिंग-करंट अकाउंटवरील रक्कम असते...बँक या सर्व स्रोतांमधून उत्पन्न कमविते...हे करताना ग्राहकांचा पैसा वापरला जातो आणि आता आमचेच पैसे ऑटोमेटेड टेलर मशिनमधून (एटीएम) काढण्यासाठी शुल्क आकारले जाणार असेल, तर बँकेची सेवा घ्यायची कशाला,’ अशी संतप्त प्रतिक्रिया बँक खातेदारांकडून व्यक्त होत आहे.

पत्रकारांच्या गाडीला अपघात

$
0
0
खंडाळा येथील नवे पारगावमध्ये नुकताच एक अपघात झाल्याचे वृत्त हाती आले आहे. या अपघातात गाडीतील पत्रकार थोडक्यात बचावले. पुणे-सातारा रोडवर नव्या खंबाटकी बोगद्याजवळ झालेल्या अपघाताचे चित्रण करण्यासाठी चाललेल्या पत्रकारांच्या गाडीला कंटेनरने धडक दिल्याने अपघात झाला.

शून्य कचरा प्रकल्प औंधमध्ये शून्यातच

$
0
0
औंध क्षेत्रीय कार्यालयातील बाणेर बालेवाडी येथील प्रभाग नऊमध्ये कचऱ्याच्या समस्येमुळे शून्य कचरा प्रकल्प अद्याप साकारता आलेला नाही. प्रभागातील ओढे व पडीक जागांना कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. जुलै २०१२मध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून शून्य कचरा प्रकल्प सुरू करण्यात आला होता.

पाण्यासारखा पैसा खर्च; पाणीप्रश्न कायम

$
0
0
कोट्यवधी रुपये खर्च करूनही बालेवाडी येथील पाणीप्रश्न अद्याप सोडवण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. अनधिकृत नळजोडांमुळे सोसायट्यांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असून, अनेक सोसायट्यांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images