Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘आकार’णार बालगीतरामायण

$
0
0
प्रसिद्ध कवी ग. दि. माडगूळकर आणि संगीतकार सुधीर फडके यांनी रचलेल्या गीतरामायणानं अमाप लोकप्रियता मिळवली. हा जुना ठेवा जेव्हा-जेव्हा नव्यानं सादर होत जातो, तेव्हा तेव्हा त्यातून नवा अर्थ उमजत जातो.

लुबाडल्याप्रकरणी एकाला अटक

$
0
0
चाकूचा धाक दाखवून वडगाव शेरी येथील डॉमिनोझ पिझ्झाच्या मॅनेजरकडून १५ हजारांची रोकड लांबविल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याला १५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पुणे-सातारा रोडवर अपघात, ११ ठार

$
0
0
पुणे-सातारा मार्गावर एक कंटेनरची क्रूझर गाडीला जबरदस्त धडक बसून झालेल्या भीषण अपघातात अकरा जण ठार झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात पारगाव जवळ झाल्याचे समजते.

'रोबो-कीटक' हटवणार रक्तातील 'ब्लॉकेज'

$
0
0
शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन त्यात असणारे अडथळे काढू शकतील, हवेत पसरून त्यातील विषारी घटकांचा धोका सांगतील, धोकादायक ठिकाणी सहजतेने वावरून तेथील सद्यस्थिती सांगतील, असे सूक्ष्म रोबो लवकरच प्रत्यक्षात येणार आहेत.

माहिती अधिकार कट्ट्याला मिळतोय नागरिकांचा प्रतिसाद

$
0
0
माहिती अधिकार कायद्याविषयी जनजागृती आणि याबाबतच्या अडचणींवर उपाय सुचविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या माहिती अधिकार कट्ट्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

माणिकडोह प्रकल्पग्रस्तांचा लढा झाला तीव्र

$
0
0
माणिकडोह धरणात प्रगल्पग्रस्त झालेल्या आणि ४० वर्षांनंतरही मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचा लढा तीव्र होणार आहे. या संदर्भात राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचे सरचिटणीस डॉ. बाबा आढाव, उपाध्यक्ष लक्ष्मण पासलकर यांच्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्तांची बैठक जुन्नरला झाली.

कवडे रस्ता फेरीवाल्यांच्या विळख्यात

$
0
0
बी. टी. कवडे रोडवरील फेरीवाल्यांनी दुचाकीसाठी असलेल्या पार्किंगमध्ये हातगाड्या लावून पार्किंगच्या समस्येत भरच घातली आहे. दिवसेंदिवस या रस्त्यावर फेरीवाल्यांची संख्या वाढताना दिसते आहे.

पाणीप्रश्न सुटल्याने नागरिकांना आनंद

$
0
0
भामा आसखेड धरणातून शहराच्या पूर्व भागाला पाणी पुरवठा होणार असल्याने या भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटण्याचे निश्चित झाल्याने स्थानिकांनी आनंद व्यक्त केला आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मंजुरीचे पत्र नुकतेच पुणे महापालिकेला दिले आहे.

‘AIPMT’च्या अर्जात दुरुस्ती करण्याची संधी

$
0
0
ऑल इंडिया प्री-मेडिकल/ प्री-डेन्टल मेडिकल टेस्टचा (एआयपीएमटी) ऑनलाइन प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना अर्जात काही दुरुस्ती करायची असेल, तर त्यासाठी एक ते २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

उपनगरांमध्ये सुरू आहे घरफोड्यांचे सत्र

$
0
0
कल्याणीनगर आणि खराडी परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घालत शनिवारी चार फ्लॅट फोडत सुमारे साडेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरला आहे.

बनावट नोटा : वडगावात दोघांना अटक

$
0
0
बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ हजार रुपयांच्या नोटा हस्तगत करण्यात आल्या आहे. आरोपींना १६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.पी. केस्तीकर यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

पर्वती जलकेंद्राची क्षमता वाढणार

$
0
0
पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यासाठीचे टेंडर सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आले. यामुळे पर्वती जलशुद्ध‌िकरण केंद्राची क्षमता ५०० वरून १००० एमएलडीवर जाणार असून शहरातील मध्यवर्ती भागातील पेठांसह, सहकारनगर, पर्वती, पद्मावती या भागातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

चाकूच्या धाकाने लुबाडले; एकास अटक

$
0
0
चाकूचा धाक दाखवून वडगाव शेरी येथील डॉमिनोझ पिझ्झाच्या मॅनेजरकडून १५ हजारांची रोकड लांबविल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याला १५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. पाटील यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

बलात्कारी पित्याला जन्मठेपेची शिक्षा

$
0
0
स्वत:च्याच नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि १२ वर्षाच्या मुलाबरोबर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या पित्याला जन्मठेप आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश कालिदास वडणे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

शिक्षण मंडळाच्या बजेटला यंदाही कात्री

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाने सुचविलेल्या २०१४-१५ च्या १०८ कोटी रुपये खर्चाच्या बजेटला यंदाही कात्री लावत आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुमारे सहा कोटी २८ लाख रुपयांची कपात सुचविली आहे.

कोट्यवधी खर्चूनही कामे अपूर्णच

$
0
0
खराडीमध्ये दोन ठिकाणी ‘स्पोर्ट्‍स कॉम्प्लेक्स’च्या उभारणीसाठी पालिकेने गेल्या तीन वर्षांत सुमारे १० कोटी रुपयांहून अधिक खर्च केल्याचे समोर आले आहे. तरीही, हे कॉम्प्लेक्स अद्याप अपूर्णच असून, आता तिथे जिम्नॅशियम आणि कुस्ती केंद्राचा घाट घालण्यात येत आहे.

कालवा शहराबाहेरून न्या...

$
0
0
शहराच्या मध्यवस्तीमधून वाहणारा खडकवासला मुठा उजवा कालवा बंद करून बोगद्याद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला आता गती देण्याची गरज निर्माण झाली आहे. हा कालवा बंद करून खडकवासला ते फुरसुंगी अशा बोगद्याद्वारे शेतीला पाणी नेण्याचा प्रस्ताव जलसंपदा खात्याने केला आहे.

नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावे

$
0
0
हिंसेच्या माध्यमातून व्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा नक्षलवाद्यांनी लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात येऊन व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार वेंकय्या नायडू यांनी रविवारी केले.

होमिओपॅथच्या विरोधात ‘IMA’ रस्त्यावर

$
0
0
राज्य सरकारने होमिओपॅथीच्या डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची मान्यता दिल्याने त्या विरोधात राज्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनसह (आयएमए) अन्य संघटना रस्त्यावर उतरणार आहेत.

लसीकरणादरम्यान कर्मचारी काळ्या फिती लावणार

$
0
0
कुटुंबकल्याण कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्ष होत असल्याने येत्या १९ जानेवारीच्या पल्स पोलिओ लसीकरणाच्या मोहिमेदरम्यान काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे कर्मचारी संघटनेने जाहीर केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images