Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अन्नधान्य, कडधान्यालाही कायदा नको

$
0
0
भाजीपाला, फळे यांना कृषिउत्पन्न बाजार समितीच्या कायद्यातून वगळण्यात आले आहे. त्याच धर्तीवर अन्नधान्य, कडधान्य आणि इतर वस्तूंना त्यामधून वगळावे, अशी आग्रही मागणी राज्यातील व्यापारीवर्गाने केली आहे.

सराईत दरोडेखोराला पोलिस कोठडी

$
0
0
सातारा रस्त्यावरील हायवे सर्व्हिस सेंटर या पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पळून गेलेल्या एका आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कोर्टाने २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

‘एमजीएनआरईजीए’साठी सेल

$
0
0
केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (एमजीएनआरईजीए)अंतर्गत विविध क्षेत्रासाठी निधी उपलब्ध असून या योजना महाराष्ट्रात राबविण्यासाठी आणि त्यांची माहिती देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये सेल स्थापन करण्याच्या सूचना नुकत्याच पुण्यात झालेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत देण्यात आल्या.

ग्रामीण भागाचे नियोजन हवेच

$
0
0
‘राज्यातील शहरांचे आणि निमशहरी भागाचेच नाही, तर भविष्याच्या दृष्टीने ग्रामीण भागाचेही योग्य नियोजन करण्याची हीच योग्य वेळ आहे.

पुण्यात स्थानिकांमध्ये टोलविषयी नाराजी

$
0
0
पुण्याच्या आसपासच्या परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर असणाऱ्या सहा टोलनाक्यांपैकी आतापर्यंत दोन टोलनाके कायम वादाच्या भोवऱ्यामध्ये राहिले आहेत.

तज्ज्ञांच्या नियुक्तीसाठी ‘बालभारती’ने कसली कंबर

$
0
0
पाठ्यपुस्तकांना विलंब होण्यामागचे एक प्रमुख कारण असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळाच्या समस्येवर मात करण्यासाठी ‘बालभारती’ प्रशासनाने कंबर कसली आहे.

तंत्रज्ञान विद्यापीठाकडे कॉलेजांची पाठच!

$
0
0
व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्यात वेगळे तंत्रशास्त्र विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला, तरी पुणे विद्यापीठातील ११९ इंजिनीअरिंग-फार्मसी कॉलेजांपैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी कॉलेजही या विद्यापीठाकडे जाण्याची चिन्हे नाहीत.

पत्नीला फेसबुकवर अश्लील मेसेज; पतीला अटक

$
0
0
पत्नीच्या फेसबुक प्रोफाइलवर अश्लील मेसेज पाठविणाऱ्या पतीला भारती विद्यापीठ पोलिसांनी शनिवारी मुंबई विमानतळावर अटक केली. परदेशातून परतलेल्या या पतीला ‘लूकआउट नोटीस’च्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे.

राजगड पोलिसांवरील कारवाईला स्थगिती

$
0
0
गोरक्षकांवर दरोड्याची केस टाकतो, अशी धमकी दिल्याप्रकरणी राजगड पोलिसांवर कारवाई करण्याच्या आदेशाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आर. धमेचा यांच्या कोर्टाने ​स्थिगिती दिली आहे.

टँकरचालकांच्या मनमानीचा नागरिकांना भुर्दंड

$
0
0
शहरातील प्रत्येक नागरिकाला नियमित आणि पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा दावा फोल ठरत आहे. प्रॉपर्टी टॅक्समधून पाणीपट्टीच्या नावाखाली लाखो रुपये वसूल करणारी महापालिका अनेक भागातील नागरिकांना पाणी देण्यास असमर्थत ठरत आहे.

२५ टक्के भागाला भामा आसखेडचा फायदा

$
0
0
शहरातील पूर्व भाग असलेल्या वडगाव शेरी, खराडी, विमाननगरसह येरवडा भागातील नागरिकांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या भामा आसखेड योजनेचा फायदा शहरातील पंचवीस टक्के भागाला होणार आहे.

रजेअभावी पोलिस महिलेने गमावले बाळ

$
0
0
प्रसूती रजेसाठीचा अर्ज एक महिन्यापासून निर्णयाविना प्रलंबित राहिल्याने एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचे बाळ पोटातच दगावल्याची घटना नुकतीच घडली आहे. ‘बाबू​’ मंडळींचे हात ओले न केल्याने रजा मंजूर झाली नसल्याचा दावा या महिलेशी संबंधित घटकांकडून करण्यात येत आहे.

‘आप’ची दखल घेणार नाही

$
0
0
दिल्लीत सत्ता मिळवून राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या आम आदमी पार्टीमुळे अस्वस्थ झालेल्या भाजपने काँग्रेसबरोबरच ‘आप’लाही टार्गेट करण्यास सुरूवात केली आहे.

डीपीच्या यार्डात मेट्रोचे इंजिन

$
0
0
शहराच्या जुन्या व नव्या हद्दीच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये (डीपी) मेट्रोच्या तरतुदींचा समावेश करण्याचा प्रस्ताव जानेवारी महिन्याच्या मुख्य सभेसमोर मांडण्यात आला आहे. शहराच्या जुन्या हद्दीचा डीपी राज्य सरकारकडे मान्यतेसाठी ठेवण्यात आलेला आहे.

खुद्द अजितदादांचे आदेश धाब्यावर

$
0
0
खुद्द उर्जामंत्री अजित पवार यांनी आदेश दिल्यानंतरही वापरावरील नोंदणी आणि प्रतियुनिट तीस पैशांच्या जिझिया कराचा बोजा अजूनही कायम आहे.

पुण्याच्या पाण्याची खुलेआम विक्री

$
0
0
पाणीकपात करून पुणेकरांच्या तोंडचे पाणी काढून घेतले जात असताना, ते पाणी टँकरमाफियांकडून खुलेआम विकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

नगर रोडची तहान भागणार

$
0
0
पुणे-नगर रोडवरील धानोरी, वडगावशेरी या भागांतील नागरिकांची पाण्याची गरज भागविण्यासाठी भामा आसखेडमधून पाणी आणण्यासाठी आवश्यक पाइपलाइन टाकण्यास पिंपरी चिंचवड महापालिकेने अखेर मंजुरी दिली आहे.

पत्नीला अश्लील मेसेज;पतीस अटक

$
0
0
पत्नीच्या फेसबुक प्रोफाइलवर अश्लील मेसेज पाठविणाऱ्या पतीला भारती विद्यापीठ पोलिसांनी शनिवारी मुंबई विमानतळावर अटक केली. परदेशातून परतलेल्या या पतीला 'लूकआउट नोटीस'च्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे.

आनंददायी ‘स्वरझंकार’ अनुभव

$
0
0
महाराष्ट्र टाइम्स आणि व्हायोलिन अकादमी, पुणे आयोजित ‘स्वरझंकार संगीत महोत्सवा’त वाद्यांची जुगलबंदी, गायकीचा भारदस्तपणा आणि नजाकतीदार पेशकश यांची अनोखी पर्वणी मिळाली. या तीन दिवसीय महोत्सवाचा रसास्वाद...

‘मनफरीद’चे ‘होसलें’ बुलंद

$
0
0
पुण्यात बँड कल्चर वाढतंय. विशेष म्हणजे, आपापली नोकरी-व्यवसाय सांभाळून संगीताच्या प्रेमापोटी काही तरुणांनी एकत्र येऊन म्युझिक बँडही तयार केले आहेत. हे बँड्स विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धांमध्ये पुण्याचं नाव मोठं करताहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images