Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

८ मे रोजी राज्याची मेडिकल CET

0
0
राज्यातील मेडिकल प्रवेशांसाठी होणारी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाची (डीएमईआर) प्रवेश परीक्षा (एमएच-सीईटी) ८ मे रोजी होणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया, माहिती पुस्तिका आदी बाबी लवकरच जाहीर केल्या जातील.

६ लाखांचा गुटखा शिरुरमधून जप्त

0
0
शिरुर येथून एका व्यापाऱ्याच्या गोदामातून सहा लाख रुपये किमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) छापा टाकून जप्त केला. या व्यापाऱ्याविरोधात शिरुर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पीएमपी कर्मचाऱ्यांना पगार नाही

0
0
तिजोरीत खडखडाट असल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) च्या कर्मचाऱ्यांचे दर महिन्याच्या १० तारखेला होणारे पगार या महिन्यात होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘आयटीएस’चा निषेध नोंदवा

0
0
शहरातील बेशिस्त वाहनचालकांकडून ‘इंटेलिजन्ट ट्रॅफिक सिस्टीम’च्या माध्यमातून (आयटीएस) दंड वसूल करण्याच्या पालिकेच्या योजनेविरोधात सर्वसामान्य नागरिकांनी येत्या सोमवारी (१३ जानेवारी) पालिका कोर्टासमोर विरोध नोंदविता येणार आहे.

बोर्डाचा ‘ऑनलाइन’ दंडाचा वर्ग

0
0
बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी पहिल्यांदाच राबविण्यात येत असलेल्या ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत केलेल्या चुकांबद्दल कॉलेजांना दंड भरावा लागणार आहे. बोर्डाच्या पुणे विभागीय मंडळाने चुकांच्या दुरुस्त्यांसाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे सविस्तर दुरुस्ती शुल्ककाचे पत्रकच प्रसिद्धीस दिले आहे.

होमिओपॅथना ‘IMA’चा नकारच

0
0
राज्यातील शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयातून ‘फॉर्मकोलॉजी’ विषयाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर होमिओपॅथी कौन्सिलच्या नोंदणीकृत डॉक्टरांनाच यापुढे अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची मुभा मिळणार आहे.

दाजीकाका गाडगीळ यांचे निधन

0
0
ज्येष्ठ मराठी उद्योजक पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संस्थापक अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांचे पुण्यात प्रयाग रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. अखेरपर्यंत कार्यरत असलेल्या दाजीकाकांनी 'पीएनजी' हा ब्रँड बनवून त्याला जगभर प्रतिष्ठा मिळवून दिली.

मराठी रसिक जाणकार आणि दर्दी

0
0
महाराष्ट्रानं मला नेहमीच भरभरून प्रेम दिलं आहे, येथील जाणकार श्रोत्यांसमोर गायन करताना मला प्रोत्साहन मिळतं. संगीतावर प्रचंड प्रेम करणाऱ्या रसिकांमुळेच मला पुण्यात यायला आवडतं... अशी प्रांजळपणे सांगत पतियाळा घराण्याच्या बेगम परवीन सुलताना यांनी ‘मटा’शी संवाद साधला.

वारकऱ्यांचा आरोग्य विमा

0
0
आळंदी ते पंढरपूर अशी दर महिन्याला पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा आरोग्य विमा वारकरी सेवा संघाच्या वतीने उतरविण्यात आला आहे. वारकऱ्यांना हा आरोग्य विमा प्रदान समारंभ येत्या सोमवारी (१३ जानेवारीला) दिला जाणार आहे.

‘हरित महाराष्ट्र’ अभियान

0
0
‘राज्यातील वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी येत्या २६ जानेवारीपासून ‘हरित महाराष्ट्र’अभियान राबविण्यात येणार आहे. आगामी वर्षभरात वन विभागातर्फे सात कोटी रोपे लावण्यात येणार आहेत,’ अशी माहिती वनमंत्री पतंगराव कदम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

महसूल कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन

0
0
महाराष्ट्र राज्य महसूल चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या ११ व १२ जानेवारी रोजी आळंदी येथे होणार आहे. या अधिवेशनात अनुकंपा तत्त्वावरील भरतीसह कॅशलेस वैद्यकीय सेवेपर्यंतच्या मागण्या केल्या जाणार आहेत.

‘कात्रज’च्या दूध दरात दोन रुपयांची वाढ

0
0
कात्रज डेअरीने गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

फेरीवाल्यांना मिळणार ‘स्मार्ट कार्ड’

0
0
राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार शहरातील सर्व पथारी व्यावसायिक आणि फेरीवाल्यांची नोंदणी करून त्यांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्याची योजना पालिकेने आखली आहे. या स्मार्ट कार्डमुळे शहरातील पथारी आणि फेरीवाल्यांची अधिकृत माहिती पालिकेकडे नोंदली जाणार आहे.

विनाअनुदानित कॉलेजांच्या माहितीवरून कानउघडणी

0
0
राज्यातील कायम विनाअनुदानित कॉलेजांच्या प्रस्तावित वर्गवारीसाठी योग्य ती माहिती न पाठविल्याने राज्य उच्च शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक आणि सर्व अकृषी विद्यापीठांची कानउघडणी केली आहे.

पीएमपी कर्मचाऱ्यांना पगार नाही

0
0
तिजोरीत खडखडाट असल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) च्या कर्मचाऱ्यांचे दर महिन्याच्या १० तारखेला होणारे पगार या महिन्यात होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मतदार याद्या प्रसिद्धीच्या तारखांना मुदतवाढ

0
0
लोकसभा निवडणुकीसाठीची आणि मराठवाडा, पुणे पदवीधर मतदारसंघांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या तारखांत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे.

मतदारांची दुबार नावे टाळण्यासाठी मोहीम

0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीमधील दुबार नावे शोधून त्यांची खातरजमा करण्यासाठी निवडणूक प्रशासनाने पावले उचलली आहेत. आता यासाठी नवे सॉफ्टवेअर वापरण्यात येत असून, त्यातून आढळलेल्या नावांची जागेवर जाऊन खात्री करण्यात येणार आहे.

वीस वर्षानंतर सरकारला निदान!

0
0
राज्यातील शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयातून ‘फॉर्मकोलॉजी’ विषयाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर होमिओपॅथी कौन्सिलच्या नोंदणीकृत डॉक्टरांनाच यापुढे अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची मुभा मिळणार आहे.

विद्यार्थ्याच्या आत्महत्येला विद्यापीठ जबाबदार

0
0
पुणे विद्यापीठाच्या लॉच्या निकालामधील आक्षेपार्ह बाबींविषयी सोशलिस्ट युवा जनसभेच्या माध्यमातून शहरातील लॉ शाखेचे विद्यार्थी वारंवार पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे धाव घेत होते. मात्र, हे आक्षेप गांभीर्याने विचारात न घेतल्यामुळेच एका विद्यार्थ्याला आत्महत्येचा मार्ग निवडावा लागला, असा आरोप जनसभेचे कार्यकर्ते आणि लॉच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी केला.

प्रकल्पांसाठी जिल्हा पातळीवरच परवानगी मिळावी

0
0
मोठ्या बांधकाम प्रकल्पांना पर्यावरणाची परवानगी घेण्यासाठी दिल्लीत जावे लागते. त्यामुळे अशा प्रकल्पांना पर्यावरणाची परवानगी ही राज्य पातळीवर नव्हे, तर जिल्हा पातळीवरच मिळायला हवी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images