Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ATM वर दरोड्याचा प्रयत्न; २ अटकेत

0
0
एटीएम मशीनवर दरोडा घालण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आलेल्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी कोर्टात हजर केले होते. कोर्टाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. अटक केली आहे.

राऊत, पाडेकरचा अर्ज फेटाळला

0
0
सॉफ्टवेअर इं​जिनीअर नयना पुजारी सामूहिक बलात्कार व खून खटल्यातील मुख्य आरोपी योगेश राऊतला पळून जाण्यास मदत केल्याच्या प्रकरणातून वगळावे यासाठी मनोज राऊत आणि सतीश पाडेकर या दोघांनी केलेला अर्ज कोर्टाने फेटाळला.

दरोड्याच्या प्रयत्नातील ६ पैकी ३ अटकेत

0
0
हत्याराचा धाक दाखवून नागरिकांना लुटणारी, रेल्वेप्रवाशांच्या हातावर मारून हातातील मोबाइल चोरणारी टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. तर, इतर तिघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले.

विश्रांतवाडी येथे महिलेचा खून

0
0
डुडुळ गावातील इंद्रायणी नदीच्या ओढ्यालगत एका तीस वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. नंदा अशोक बनसोडे (वय ३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून त्या मोशी येथील रहिवाशी आहेत.

आशा भोसले, CNR राव यांना ‘भारती’ची डॉक्टरेट

0
0
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. एन. आर. राव यांना भारती विद्यापीठातर्फे ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ची पदवी जाहीर झाली आहे. तसेच, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनाही विद्यापीठातर्फे ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ हा मानद सन्मान जाहीर झाला आहे.

खासगी हॉस्पिटलवर रक्तनोंदणी बंधनकारक

0
0
पुण्यासह राज्यात राबविल्या जात असलेल्या ‘ब्लड ऑन कॉल’ योजनेंतर्गत पेशंटला हव्या असणाऱ्या रक्ताची गरज खासगी हॉस्पिटलनेच १०४ क्रमाकांवरून तातडीने कळविणे बंधनकारक आहे. परिणामी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या पेशंटपर्यंत एका तासाच्या आत रक्त देणे शक्य होणार आहे.

बोर्डाचा ‘सीडीपी’ महापालिकेकडे

0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनर्निर्माण योजनेअंतर्गत (जेएनएनयूआरएम) पहिल्यांदाच तयार केलेला शहर विकास आराखडा (सीडीपी) केंद्र सरकारकडे पाठविण्यासाठी बोर्डाने पुणे महापालिकेकडे दिला आहे.

व्यापा-यांचे गैरसमज झाले दूर

0
0
आयात मालाचे मूल्यांकन कसे करायचे..., हद्दीतून बाहेर जाणाऱ्या मालावर एलबीटी भरायचा का..., त्याचा परतावा कसा मिळणार... यासारख्या स्थानिक संस्था कराविषयी (एलबीटी) व्यापारी आणि व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या अनेक शंकांवर गुरुवारी उत्तर मिळाले.

कँटोन्मेंटमध्येही एलबीटी?

0
0
पुणे कँटोन्मेंट आणि खडकी कँटोन्मेंट बोर्डांच्या परिसरात स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्यास परवानगी देण्याबाबातचे प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर अंतिम मंजुरीसाठी दाखल झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

धोरणनिश्चितीतही लोकसहभाग हवा

0
0
पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘सेंटर फॉर अॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज्’ (कॅस) या ‘थिंक टँक’कडून सुरू करण्यात आलेल्या ‘नॅशनल सिक्युरिटी, नॅशनल डेव्हलपमेंट’ या त्रैमासिकाचे प्रकाशन आज (शुक्रवार) होत आहे.

युतीच्या नेत्यांच्या कारखान्यांचीही गय नाही

0
0
शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे ‘एनडीए’च्या जाहीरनाम्यात घेण्यास भाजपाने मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊनच महायुतीला साथ देणार आहे. मात्र, ऊस दराबाबत सेना-भाजप नेत्यांच्या कारखान्यांनाही सुट्टी नाही, अशी स्पष्टोक्ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

परीक्षा विभागाचे नियोजन सुधारा

0
0
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या विविध कामकाजांमधील नियोजन सुधारून विद्यार्थ्यांला चांगल्या सुविधा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेने नुकतीच केली. संघटनेचे शहराध्यक्ष राकेश कामठे यांनी या विषयीचे निवेदन कुलगुरू कार्यालयाकडे दिले आहे.

तलाठी संपामुळे ‘ई-चावडी’ तिष्ठत

0
0
गावांतील जमिनविषयक अभिलेखांची माहिती ई-चावडी योजनेंतर्गत कम्प्युटर नोंदविण्याचे काम तलाठ्यांच्या संपामुळे खोळंबले आहे. हे काम खोळंबल्यामुळे जमिनीचा सातबारा उतारा तत्काळ देण्याची योजना लांबणीवर पडणार आहे.

‘विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवा’

0
0
बारावी अर्ज प्रवेशातील दुरुस्तीसाठी दंड आकारणी म्हणजे विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक असल्याची टीका संघटनांकडून होत आहे. ही पिळवणूक थांबविण्याची मागणी त्यांनी केली आहे.

हीटरचा शॉक लागून महिलेचा मृत्यू

0
0
बालाजीनगर परिसरातील काशिनाथनगर येथे पाणी तापविण्याच्या ‘हीटर’चा शॉक लागून एका ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जोत्स्ना सैतान​सिंग राठोड (वय ३०, रा. काशिनाथनगर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

भाजीपाला भाववाढीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले

0
0
इंधन, अन्नधान्याबरोबर भाजीपाल्याच्या भाववाढीमुळे सामान्यांच्या घरखर्चात दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे. मर्यादित उत्पन्न आणि वाढता खर्च यांच्यामुळे मासिक बजेटवर ताण आला आहे. महागाई वाढल्यास आगामी काळात बजेट कोलमडण्याची भीती सामान्यांना वाटत आहे.

महापौर, आयुक्तसाहेब... तुम्ही जिन्याने जाणार का?

0
0
महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेला आठ दिवस झाले आहे. या अपघाताचा अहवाल न आल्याने आरोग्य खात्याने हॉस्पिटलमधील सर्व लिफ्ट बंद ठेवल्या आहेत.

सामन्यांचा पत्ता नसतानाही खुर्च्या वाढविण्याचा घाट

0
0
महापालिकेने उभारलेल्या नेहरू स्टेडियमवर गेली अनेक वर्षे एकही क्रिकेटची मॅच झालेली नसतानाही या स्टे‌डियमची आसनक्षमता वाढविण्याचा ‘घाट’ घातला जात आहे.

रणगाड्यांना चिलखती संरक्षण

0
0
युद्धकाळात लष्करासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रणगाड्यांच्या सुरक्षेसाठी लष्करातर्फे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पावले उचलण्यात येत आहेत. लष्करातर्फे यापूर्वीच रणगाड्यांवर स्फोटकरोधी चिलखत (एक्स्प्लोझिव्ह रिअॅक्टिव्ह आर्मर) बसविण्यात आले आहे.

मोबाइल 'अॅप' सांगणार धोकादायक ठिकाणे

0
0
एखाद्या ठिकाणी जाणार आहात... ते ठिकाणी महिलांच्या दृष्टीने सुरक्षित आहे का... कोणती वेळ योग्य ठरेल... त्या ठिकाणाहून गरज पडल्यास मदत मिळू शकेल काय... अशा प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images