Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कात्रज चौकात फेरीवाल्यांचा उच्छाद

$
0
0
सातारा रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ठिकाणांशिवाय इतरत्र कारवाया थांबल्या आहेत. त्याचा फायदा घेऊन दक्षिण उपनगरात फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे.

फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाची तयारी अंतिम टप्प्यात

$
0
0
राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत येत्या महिन्यात शहराच्या सर्व भागांतील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी, पालिकेने सर्व पूर्वतयारी केली असून, १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत प्रत्येकी दोन पथकांद्वारे सर्वेक्षणाची मोहीम राबविली जाणार आहे.

ATM केंद्र बनले सुरक्षेसाठी ‘पारदर्शक’

$
0
0
ऑटोमेटेड टेलर मशिन (एटीएम) फोडण्याच्या घटना लक्षात घेऊन ग्राहकांच्या सुरक्षेसाठी बँकांनी एटीएम केंद्रात अतिरिक्त कॅमेरे लावणे, सुरक्षारक्षक नेमण्याची सुरुवात केली आहे; तसेच अशा केंद्राच्या काचेवर असणाऱ्या जाहिराती वा स्टिकर काढण्याचीही प्रक्रिया बहुतेक ठिकाणी झाल्याचे बँकांनी सांगितले.

बनावट दस्त : १० लाखांची फसवणूक

$
0
0
मुळ दस्ताचे तीन बनावट दस्त बनवून शासनाची सहा लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपजिल्हाधिकारी नीलिमा गणपत धायगुडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पेट्रोलपंप कर्मचा-याचा कारच्या धडकेत मृत्यू

$
0
0
पेट्रोल भरण्यासाठी भरधाव वेगाने आलेल्या कारची धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. मंगळवारी (७ जानेवारी) संध्याकाळी पाच वाजता चिंचवडच्या जयहिंद पेट्रोलपंपावर ही घटना घडली.

वन विभागाकडून ‘शेकरू’वर खास पुस्तक

$
0
0
महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरू या खारीविषयी जनजागृती करण्यासाठी वन विभागाने ‘शेकरू’ हे पुस्तक तयार केले आहे. शेकरूचे वास्तव्य, प्रदेशानुसार त्यांच्या रंगांमध्ये दिसणारे फरक, त्यांची जीवनशैली, त्याचे शत्रू अशी सविस्तर माहिती सोप्या शब्दांत देण्यात आली आहे.

दारू धंद्यावर कारवाई सुरूच ठेवणार

$
0
0
पिंपरी येथील आगीची घटना दुर्देवी आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर या प्रकरणी करण्यात येत असलेले आरोप चुकीचे असल्याची प्रतिक्रिया घटनास्थळाला भेट देणारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त सुरेश मुखर्जी यांनी व्यक्त केली.

माझे टेलिफोन कॉल टॅप केले जाताहेत

$
0
0
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोन टॅपिंग होत असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष, खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या प्रकरणाचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली.

खडकी कँटोन्मेंटमध्ये सीईओ-डीईओंची बैठक

$
0
0
कँटोन्मेंट निवडणुका, एलबीटी, कँटोन्मेंटचे प्रश्न, समस्या, त्यावर केलेले उपाय आणि कामे यांचा आढावा घेण्यासाठी सदन कमांडच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कँटोन्मेंटचे सीईओ आणि डीईओ (लष्कराच्या मालमत्ता विभागाचे अधिकारी)यांच्या दोन दिवसांच्या परिषदेला बुधवारी (८ जानेवारी) खडकी कँटोन्मेंट ऑफिसमध्ये दक्षिण कमांडचे प्रधान संचालक (प्रिन्सिपल डायरेक्टर) जिग्नेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

‘डीपी’ला आचारसंहितेचा रेड सिग्नल

$
0
0
लोकसभेची आगामी महिन्यात लागू होणारी आचारसंहिता पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील रहिवाशांसाठी निराशा देणारी ठरणार आहे.

वाहन प्रवेश करामुळे ४ कोटी जमा

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाने वाहन प्रवेश करात वाढ केल्यानंतर या वर्षाअखेरीस पहिल्यांदाच बोर्डाच्या तिजोरीत सुमारे चार कोटी ४७ लाख रुपयांचा कर जमा झाला आहे. त्यामुळे स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या बोर्डाला दिलासा मिळाला आहे.

लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0
‘शनिवारी निकाल लागल्यावर त्याला दुपारीच फोनवरून त्याचा निकाल कळवला. त्याला तसं सीए व्हायचं होतं, पण आवड म्हणून लॉ करायला आला होता. ‘सीबीएसई’मधून पुढे आल्याने तो बऱ्यापैकी हुशार होता.

‘अण्णा भाऊ स्मारकाचे उद् घाटन घाईने नको’

$
0
0
सारसबागेजवळील अण्णा भाऊ साठे मेघडंबरी प्रकल्प अपूर्णावस्थेत असतानाही श्रेय लाटण्यासाठी त्याचे उद् घाटन करण्याचा प्रयत्न झाल्यास त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पुणे शहर जिल्हा मातंग संघाने दिला आहे.

श्रेय लाटण्यासाठी चढाओढ

$
0
0
लोकसभा निवडणुकीची चाहूल लागल्याने आचारसंहितेपूर्वी विकासकामांच्या उद् घाटनांचा धडाका लावून श्रेयवादाच्या लढाईत वरचढ ठरण्याचा डाव आता राजकीय पक्षांकडून मांडला जात आहे.

रुपी विलिनीकरणाचा प्रस्ताव विशेष सभेपुढे

$
0
0
‘रुपी को-ऑपरेटिव्ह बँक सारस्वत बँकेत विलीन करण्याचा प्रस्ताव विशेष सर्वसाधारण सभेत रुपी बँकेच्या सभासदांपुढे ठेवला जाणार आहे. ही सभा एक फेब्रुवारी रोजी गणेश कला क्रीडामंच येथे होणार आहे,’ अशी माहिती रुपी बँकेचे प्रशासक डॉ. संजयकुमार भोसले यांनी दिली.

गैरहजर कर्मचा-यांचे पालिकेकडून निलंबन

$
0
0
महापालिकेतील कामचुकार कर्मचाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी शंभर दिवसांहून अधिक काळ गैरहजर राहणाऱ्या ५६ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांचा सहामाही आढावा घेण्यात येणार असून, यापुढेही या प्रकारे शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

पोलिस व्हेरिफिकेशन अखेर ऑनलाइन सुरू

$
0
0
आमच्याकडे कम्प्युटर नाहीत, प्रिंटर मिळतील का, इंटरनेट कनेक्शन अद्यापपर्यंत मिळाले नाहीत, अशा तक्रारींचा पाढा वाचणाऱ्या पोलिस ठाण्यांनी अखेर ऑनलाइन पोलिस व्हेरिफिकेशन करण्यास सुरुवात केली आहे.

‘DBTL’साठी ‘आधार’ची सक्ती कायम

$
0
0
स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवरील अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेतील (डीबीटीएल) सवलतीसाठी आता केवळ २५ दिवसांची मुदत राहिली आहे. मात्र, अजूनही या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार कार्डांची सक्ती कायम राहिल्यामुळे पुणेकर हवालदिल झाले आहेत.

बीडीपीचा अहवाल १५ दिवसांत

$
0
0
शहराच्या समाविष्ट गावांमधील टेकड्यांवर जैववैविध्य उद्यानाचे (बीडीपी) आरक्षण टाकण्याच्या विरोधातील हरकती व सुनावणीविषयीचा अहवाल येत्या पंधरा दिवसांत राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे.

रिक्षात घरगुती गॅस भरणाऱ्या गॅरेजवर छापा

$
0
0
रिक्षामध्ये घरगुती गॅस भरून देण्याचा उद्योग करणाऱ्या गॅरेजवर राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी छापा घातला. यामध्ये १५ घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images