Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘भानगडी’ : तलाठ्यांवर कारवाईचा आसूड

$
0
0
सातबारा उताऱ्यावर नाव नोंदविण्यापासून सातबाराची नक्कल देण्यासाठी ‘भानगडी’ करणाऱ्या तलाठ्यांवर कारवाईचा आसूड उगारला जाणार आहे. तक्रार अर्जाच्या नावाखाली सातबारा नोंदी महिनोमहिने अडविणाऱ्या तलाठ्यांना प्रथम कारवाईचे लक्ष्य केले जाणार आहे.

पोलिसांतही मोठे बदल अपेक्षित

$
0
0
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पुणे पोलिसांत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. यावर्षी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ‘जनरल ट्रान्स्फर’ न झालेल्या नाहीत.

अपहरण प्रकरणी एकाला कोठडी

$
0
0
अडीच वर्षाच्या मुलीचे एक लाख रुपयांसाठी अपहरण केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. त्याला ११ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी महंतेश बसाप्पा तलवार (वय ३२, रा.केशवनगर, मुंढवा) याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.

‘महावितरण’कडून तक्रारींची दखल

$
0
0
‘महावितरण’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वीजग्राहक तक्रार निवारण दिनामध्ये दाखल करण्यात आलेल्या पाचपैकी चार तक्रारी तत्काळ निकाली काढण्यात आल्या.

शिवसेनेची भाकर ‘मावळा’त फिरणार?

$
0
0
मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तगड्या उमेदवाराच्या शोधात असताना शिवसेनेकडून उमेदवारीची ‘भाकर’ फिरविली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आयुक्त महेश पाठक यांच्या चौकशीची मागणी

$
0
0
राज्य सरकारने दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्याकडे इतर खात्यांचा कारभार सोपविणाऱ्या महापालिका आयुक्त महेश पाठक यांची चौकशी करावी, तसेच त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने राज्याचे मुख्य सचिवांकडे केली आहे.

निधी बक्कळ; तरीही हातावर हात

$
0
0
कमला नेहरू हॉस्पिटलसह पालिकेच्या इतर हॉस्पिटलमधील लिफ्टच्या दुरुस्ती-देखभालीसाठी गेल्या सहा महिन्यांत तब्बल एक कोटी रुपयांहून अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

प्रत्येक गुरुवारी ‘एलबीटी डे’

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरण्याबाबत, त्याची नोंदणी करण्याबाबत आणि त्याविषयी व्यापारी-व्यावसायिकांमध्ये असणाऱ्या शंकांचे निरसन करण्यासाठी प्रत्येक गुरुवारी ‘एलबीटी शंका निरसन दिवस’ आयोजित केला जाणार आहे.

दादा-बाबांमुळे रिक्त पदांचा बॅकलॉग

$
0
0
पालिकेतील भरतीसाठीच्या ‘सेवा प्रवेश नियमावली’वर अंतिम मान्यतेचे शिक्कामोर्तब ‘बाबा-दादां’च्या दरबारी अडकल्याने रिक्त पदांचा ‘बॅकलॉग’ वाढतच चालला आहे.

…अन् एका तासात मिळाले रक्त!

$
0
0
जिल्हा हॉस्पिटलमधील सरकारी रक्तपेढीचा १०४ हा क्रमांक डायल करताच अवघ्या एका तासाभरातच पेशंटला रक्त मिळाल्याचा अनुभव ‘ब्लड ऑन कॉल’ योजनेच्या पहिल्या दिवशीच आला.

‘पीएमपी’ खिळखिळीच

$
0
0
‘पीएमपी’ बसेसच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी दर वर्षी आठ ते नऊ कोटी रुपये खर्च होत असले, तरी बसेसच्या अवस्थेमध्ये सुधारणा होत नसल्याचे समोर आले आहे.

राजगड पोलिस स्थानकात गेल्या वर्षी गुन्ह्यांत वाढ

$
0
0
भोर तालुक्यातील राजगड पोलिस स्थानकामध्ये गेल्या वर्षी गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. या पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये (कार्यक्षेत्रात) ८७ गावे आहेत. २०१२-१३ मध्ये २१० गंभीर व १६४ किरकोळ गुन्ह्याची नोंद झाली आहे. या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे हे बलात्कार, चोरी यांसारखे आहेत.

टोलवसुली कंत्राटदारही ‘कॅग’च्या जाळ्यात?

$
0
0
दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील टोलवसुली करणारे कंत्राटदारही ‘कॅग’च्या जाळ्यात येऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. या कंत्राटदारांना ‘कॅग’चे ऑडिट बंधनकारक करावे, अशी मागणी काही स्वयंसेवी संस्थांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मंगळवारी केली.

माळशेज बस अपघाताला ठाणे नियंत्रकच जबाबदार

$
0
0
माळशेज घाटात झालेल्या एसटी बसच्या अपघाताला ठाणे विभागाचे नियंत्रक आणि व्यवस्थापक जबाबदार आहेत. प्रवाशांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेने’चे अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी केली आहे.

पालिकेच्या पार्किंगमध्ये ठेकेदारांची मनमानी

$
0
0
महापालिकेतर्फे शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात आलेल्या पार्किंगमध्ये ठेकेदारांची मनमानी सुरू असून वेगवेगळ्या पार्किंगमध्ये वेगवेगळे दर आकारण्यात येत आहेत. त्याशिवाय अस्वच्छता, अपुरा प्रकाश, लिफ्ट नसणे यासारख्या समस्या आणि कर्मचाऱ्यांची मनमानी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

धरणग्रस्तांच्या जमिनींवर धनदांडग्यांचा डोळा

$
0
0
धरणे बांधायची आणि त्या माध्यमातून कृषी क्षेत्राचा विकास घडवून आणायचा, असे धोरण सरकारने केवळ कागदावरच अवलंबले असल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत अद्यापही चालढकल केली जात असल्याचे दिसून येत आहे.

हिरो बनण्याच्या स्वप्नाने तो पोचला बालसुधारगृहात

$
0
0
‘मी फिल्म डायरेक्टर आहे. चाकणला ऑफिस टाकायचे आहे. त्यासाठी तुझ्याकडे पैसे किंवा सोने असेल तर दे. तुला हिरो बनवतो,’ असे आमिष सांगून एका ओळखीच्या अल्पवयीन मित्राला चोरी करण्यास प्रवृत्त करणाऱ्यास जुन्नर पोलिसांनी गजाआड केले.

कात्रज संगीत कारंज्याचा वाद विकोपाला

$
0
0
कात्रज येथील तलावात ‘संगीत कारंजे’ उभारण्यासाठी मनसेच्या नगरसेवकाने संपूर्ण निधी खर्च केल्याच्या पार्श्वभूमीवर उद् घाटनासाठी उपमुख्यमं‌त्री अजित पवार यांना बोलाविण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीने मनमानी करत मंजूर केला.

अपु-या चालकांमुळे हजार किमीचा फटका

$
0
0
चालकांच्या अपु-या संख्येअभावी दररोज हजार किलोमीटर अंतराच्या फेऱ्या रद्द करण्याची वेळ राज्य परिवहन महामंडळ प्रशासनावर (एसटी) येत असल्याचे समोर आले आहे.

‘अॅमिनिटी स्पेस’वर कचरा साम्राज्य

$
0
0
पुण्यातील पुढारलेला परिसर म्हणून पश्चिम भागाची ओळख निर्माण आहे. अनेक नागरी सुविधांची वानवा असून देखील पालिकेने ताब्यात घेतलेल्या अॅमिनिटी स्पेस बाबत कोणताही निर्णय होत नाल्याने या जागा तशाच पडून आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images